सामना ६४ घरांच्या राजेपदाचा!!
आनंद तिसर्यांदा विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत आहे तर बोरिस त्याच्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या इतका जवळ प्रथमच पोचलेला आहे. त्यामुळे बोरिस हा अतिशय उत्साहात आणि कमालीच्या तयारीनिशी स्पर्धेत उतरणार हे नक्की. त्यामानाने आनंदला तिसरे विजेतेपद मिळवणे ही गोष्ट किती चालना देऊ शकेल हा अनेक बुद्धीबळ तज्ञांच्या मते प्रश्न आहे. या सामन्याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे दोन्ही खेळाडू वयाची चाळीशी पार केलेले आहेत म्हणजे विशीतल्या तरुण खेळाडूंचे पेव बघता 'म्हातारेच' म्हणायला हवेत. ते काहीही असो आपला पाठिंबा तर लाडक्या आनंदलाच आहे हे नक्की!
चला, दोन्ही खेळाडूंची ओळख करुन घेऊयात.
बोरिस गेलफंड -
जन्माने बेलोरशियन आणि नागरिकत्त्वाने इस्रायली असलेला बोरिस असामान्य प्रतिभावान खेळाडू आहे. वयाच्या सतराव्या वर्षी रशियन जेतेपद आणि दोन वर्षांनी जागतिक कनिष्ठ विजेतेपद मिळवणारा बोरिस १९९६ साली कँडिडेट मॅचेसमध्ये उपांत्य सामन्यात अनातोली कार्पोवकडून पराजित झाला. त्यानंतर पुन्हा एकदा २००७ मध्ये व्लादिमीर क्रामनिकने त्याला पराभूत करुन आनंदचा प्रतिस्पर्धी म्हणून नाव निश्चित केले. शेवटी २०११ च्या कँडिडेट्स स्पर्धेत बोरिसने आपल्या अतिशय चिवट खेळाने गाटा काम्स्की आणि अलेक्झांडर ग्रिश्चुकसारख्या तरुण रक्ताच्या खेळाडूंना नमवून बाजी मारली. असा त्याचा २०१२ च्या स्पर्धेपर्यंतचा प्रवास आहे. खेळाच्या भाषेत ज्याला 'नर्व्ज ऑफ स्टील' म्हणतात तशा प्रकारचा कणखरपणा आणि अत्यंत चिवट मनोवृत्ती ही बोरिसची शक्तिस्थाने आहेत.
मागल्या आठवड्यातच त्याची एक मुलाखत झाली. त्यावेळी त्याला विचारले "सध्याच्या तरुण खेळाडूंच्या जमान्यात तू किंवा आनंदसारखे जुने खेळाडू टिकून राहण्याचे कारण तुला काय वाटते?"
बोरिसने दिलेले उत्तर विचार करायला लावणारे आहे. तो म्हणतो "आम्ही जुन्या पद्धतीने बुद्धीबळ शिकलो. खेळाचा सखोल अभ्यास करण्याचे तंत्र हे स्वतः विचार करुन उत्तरे शोधण्यात आहे. सध्याच्या पिढीतल्या बहुतांश खेळाडूंचे पान संगणकाशिवाय हलत नाही. विशिष्ठ परिस्थितीत संगणक काय चाली करेल हे बघून त्यानुसार डावपेच आखण्याचे धोरण हे त्यांच्या बुद्धीबळाच्या मूलभूत व्यासंगावर परिणाम करते आहे असे मला वाटते. संगणकाचे फायदे जरुर आहेत परंतु त्यांचा वापर हा मर्यादित परिघातच करायला हवा अन्यथा तुम्ही तुमची विचारशक्ती मर्यादित करता."
बुद्धीबळाचे डावपेच नुसते माहीत असून उपयोग नाही तर प्रत्यक्ष सामन्याच्या वातावरणात अतिशय तणावाच्या स्थितीत, मनोधैर्य टिकवून चिवटपणाने खेळ करणे हे गरजेचे असते अन्यथा तुम्ही डाव आणि पर्यायाने सामना गमावता.
पांढर्या मोहोर्यानी खेळतांना डी४ ही बोरिसची आवडती खेळी आहे तर काळ्याने खेळताना तो नॅ़जडॉर्फ सिसिलियन, पेट्रॉफ बचाव, स्लाव बचाव आणी राजाचा भारतीय बचाव (किंग्ज इंडीयन डिफेन्स) यावर भर देतो. अत्यंत सशक्त पोझीशनल अवेअरनेस आणि कमितकमी चुका करण्याची प्रवृत्ती ही त्याची वैशिष्ठ्ये आहेत.
बोरिस हा वाद निर्माण करणारा खेळाडू नाहीये. पण तो अतिशय नाट्यपूर्ण चेहरे आणि हालचाली करतो. त्याच्या भावना त्याला सहजासहजी लपवता येत नाहीत. वानगीदाखल पहा ही मुद्रा!
आनंद त्याच्याबद्दल काय म्हणतो पहा. "बोरिस उच्च दर्जाचा खेळाडू आहे. मी आणि तो १९८९ पासून एकमेकांशी खेळतो आहोत. एकमेकांचा खेळ चांगलाच ओळखून असलो तरी यावेळी बोरिस काही वैशिष्ठ्यपूर्ण तयारीने येणार हे नक्की. बुद्धीबळ रसिकांसाठी एक उत्कंठापूर्ण सामना देण्यात आम्ही दोघेही यशस्वी होऊ अशी आशा आहे."
------------------------------
आनंद विश्वनाथन -
२००८ साली व्लादिमीर क्रामनिकला हरवून प्रथम आणि २०१० साली वॅसेलीन टोपालोवला धूळ चारुन द्वितीय जगज्जेतेपद कमावणारा आनंद आता तिसर्यांदा स्पर्धेत आहे ही बाबच आनंद देणारी आहे.
वयाच्या सहाव्या वर्षी बुद्धीबळातला श्रीगणेशा आपल्या आईकडून गिरवणारा आनंद अत्यंत वेगाने खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. 'ब्लिट्झ किड' म्हणूनच तो ओळखला जायचा. अजूनही जलदगती बुद्धीबळात त्याच्या तोडीला असलेले मोजकेच खेळाडू आहेत. २००३ - २००९ अशी ७ वर्षे तो जलदगती चँपियन होता.
अत्यंत वेगवान खेळ्या आणि उच्च दर्जाची टॅक्टिकल समज ही आनंदची शक्तिस्थाने आहेत. घोड्यांचा अतिशय कल्पक वापर हा देखील त्याच्या अनेक डावांचे वैशिष्ठ्य ठरलेला आहे.
शांत आणि निगर्वी असलेला आनंद देखील वादात पडत नाही. प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे त्याची हेटाळणी करणे असले उद्योग तो कधीही करत नाही. संयमी असल्याने फारसा भावनांच्या आहारी जाताना दिसत नाही. चेहेर्यावरही चुकीच्या खेळीचा पश्चाताप तो सहजासहजी दिसू देत नाही. जगज्जेतेपदासारख्या सर्वोच्च स्पर्धातून तुमची ही वैशिष्ठ्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरतात. तो मुलाखतीही अतिशय प्रसन्न चेहेर्याने आणि स्पष्ट विचाराने देतो. त्याची उत्तरे सहजासहजी तुमच्या हाती काहीही वादग्रस्त लागू देत नाहीत.
बोरिसने केलेले आनंदचे कौतुक "आनंदची स्मरणशक्ती अफाट आहे. अत्यंत वेगाने विचार करुन खेळणे हे त्याचे बलस्थान आहे. आनंदशी खेळणे हे सोपे काम नाही पण मी त्याचे कच्चे दुवे शोधून काढेन आणि त्याचा फायदा उठवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन."
-----------------------------
स्पर्धा कशी होणार आहे?
१० मे स्पर्धेचे उद्घाटन होईल.
११ व १२ मे डाव १ व २ मग एक विश्रांतीचा दिवस, पुन्हा दोन डाव मग एक विश्रांती अशा प्रकारे २४ मे पर्यंत पहिले १० डाव खेळले जातील.
त्यानंतर ११ वा आणि १२ वा डाव हे दोन्ही मधे एकेक दिवस ठेवून खेळले जातील.
१२ डावांच्या अखेरीस जर ६-६ गुणांची बरोबरी असेल तर ३० मे रोजी टाय ब्रेकर खेळला जाईल. त्यात २५ मिनिटांचे ४ डाव खेळले जातील प्रत्येक दोन डावांच्या मध्ये १० मिनिटांची विश्रांती असेल. तरीही निर्णय झाला नाही तर ५ मिनिटांचे २ डाव एकूण ५ वेळा (म्हणजे एकूण १० डाव) खेळले जातील, तरीही निर्णय झाला नाही तर 'सडन डेथ' डाव होईल.
फिडेच्या संकेतस्थळावर सामन्यासंबंधी सर्व माहिती दिलेली आहे. २८ पानी नियमावली देखील वाचून बघावी. किती गोष्टींचा विचार केला आहे हे बघून मजा वाटते!
मॉस्कोच्या स्थानिक वेळेनुसार पहिल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता उद्घाटन सोहोळा आहे.
११ तारखेला पहिला डाव दुपारी ३ वाजता सुरु होईल. (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता. चुभूदेघे.)
स्पर्धेसाठी नायजेल शॉर्ट, यान टिम्मान, व्लादिमिर क्रामनिक, पीटर स्वीडलर, पीटर लेको असे ग्रँडमास्टर्स कॉमेंटरी करायला हजर असणार आहेत.
विजेत्याला १५ लाख डॉलर्स आणि उपविजेत्याला १० लाख डॉलर्स अशा घसघशीत रकमांची बक्षिसे आहेत!
पुढील संकेत स्थळांवर सामने थेट प्रक्षेपित केले जातील काही ठिकाणी फक्त पट आणि चाली बघायला मिळतील तर काही ठिकाणी पट आणि प्रत्यक्ष खेळाडू खेळताना बघायला मिळतील. रसिकांनी त्या त्या संकेतस्थळावर जाऊन खात्री करून घ्यावी. अजून इतरही संकेत स्थळे नक्कीच असतील त्यांचाही जालावर शोध घ्यावा.
http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012
http://www.anand-gelfand.com/
http://moscow2012.fide.com/en/
मला डावांचे विश्लेषण देणे कितपत शक्य होईल माहित नाही परंतु मी थोडेफार लिहिण्याचा जरून प्रयत्न करेन. निदान ज्या डावांचे निकाल लागले आहेत (अनिर्णीत नाहीत) अशांचे तरी विश्लेषण देईन असे म्हणतो.
तर अशा रीतीने या महा सोहळ्याला आता दोनच दिवस बाकी आहेत. चला आनंदाला शुभेच्छा देऊयात आणि महासोहळ्याची तयारी करू यात!
(आनंदी)चतुरंग
सर्व प्रकाशचित्रे आंजावरुन साभार.In reply to आता मेजवानीच! धावत्या by ऋषिकेश
In reply to मस्त! by पैसा
रशियन, भारतीय आणि इस्रायली राष्ट्रगीतं वाजली आणि दोघांनी चार शब्द बोलले.
त्यानंतर आनंदने "टॉस" जिंकला आणि उद्या होणार्या पहिल्या सामन्यात तो पांढर्या मोहर्यांनी खेळेल हे निश्चित झाले!
ही चांगली सुरुवात झाली असे मानायला हरकत नाही.
अधिक प्रकाशचित्रे इथे बघता येतील.
http://photo.chessdom.com/index.php?cat=10038
-रंगाIn reply to ताज्या बातमीनुसार by चतुरंग
In reply to लाईव by रमताराम
In reply to पहिला डाव सुरु झाला by चतुरंग
In reply to रंगा by रमताराम
In reply to ए२ by चतुरंग
In reply to पण by रमताराम
In reply to स्ट्राँग पोझिशन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to स्ट्राँग पोझिशन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to नाही सध्या by चतुरंग
In reply to हा आलोच. डाव आज बराच वेगाने by चतुरंग
In reply to बरे सापडले by रमताराम
In reply to पांढर्या मोहर्याने सुरुवात by चतुरंग
In reply to >>>>>> बोरिस गहन विचारात by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to http://www.chessdom.com/anand by रमताराम
In reply to पांढर्या मोहर्याने सुरुवात by चतुरंग
In reply to डावाच्या सुरुवातीपासून पटावर by चतुरंग
In reply to बोरिसला by चतुरंग
In reply to पोझीशन इंटरेस्टिंग आहे. आता by चतुरंग
In reply to बोरिसने त्याचा घोडा डी ४ by चतुरंग
In reply to आनंद कधी नव्हे by चतुरंग
In reply to हम्म by रमताराम
In reply to त्यांचं मरू दे by रमताराम
In reply to बोरीस जसा या कोप-यातून त्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हो आता अंतिम टप्प्यातली by चतुरंग
In reply to कदाचित by रमताराम
In reply to कदाचित by रमताराम
In reply to अखेर by रमताराम
In reply to बोरिसला काही फारशी आशा दिसत by चतुरंग
In reply to बरोबरी! by रमताराम
In reply to तसा डावातून by चतुरंग
In reply to ते मान्य हो by रमताराम
In reply to एकूण फारसा रंगतदार झाला नाही by चतुरंग
सुंदर