मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ४)

जागु · · कलादालन
५१) मद्रास कारपेट / मशिपत्री ५२) कुयली ५३) शेरल ५४) रुई ५५) धामण ५६) पळस ५७) वनई/निगडी ५८) उक्षी ५९) भांबुर्डा/भामेड्डा/गंगोत्र ६०) गुलाबी सोनकुसुम ६१) लाजाळू /Touch me not ६२) नोनी ६३) पर्णगुंफी ६४) सोनेरीला ६५) तांबा/Common Leucas 66) कळलावी/नागदौणा/ Glory Lily ६७) Iberian Star Thistle ६८) कांडोळ ६९) पिवळी घाणेरी ७०) उंदीरमारी
लेखनविषय:

वाचन 11161 वाचनखूण प्रतिक्रिया 18

In reply to by गणपा

प्यारे१ Fri, 12/16/2011 - 15:33
>>>>(हल्ली लाजाळूचं झाडं दिसेनासं झालय.) हळूवारपणा असावा लागतो गणपा त्याला. ;) फुलं मस्तच. -प्यारे 'फूल'. ;)

स्वैर परी Fri, 12/16/2011 - 14:29
जागु ताई, मला न तुमचा फार्फार हेवा वाटतो! :) हि तुमच्या माहेरच्या बागेतली फुले आहेत का??

इरसाल Fri, 12/16/2011 - 14:31
ढयान ट ढयान...................... पुन्हा एकदा....... अतिशय आवडले.पिवळा रंग घाणेरीचा काय सही आहे !!!!

जागु Fri, 12/16/2011 - 15:12
गणपा, वल्ली, जाई, इरसाल धन्यवाद. परी ती फुले मी जिथे कुठे जाईन तिथे कॅमेर्‍यात टिपली आहेत. त्यात माहेर-सासर-कोकण अशी ठिकाणे आहेत.

व्वा व्वा जागु ताई...खुप मजा आली फुलं पहातांना...काही नावं सुद्धा किती मजेशीर आहेत...मला एका वेळी एकाच जागी ही सगळी फुलं मिळाली ना,तर रांगोळी काढायला काय बहार येइल..! रानात जाउनी मी होइन या फुलांचा सहवास देवतांच्या बागेतल्या मुलांचा... किती रंगरुप त्यांचे व्हावे मनात गोळा भरगच्च रानराइ वाटे ही सांब भोळा मी एकटाच त्यांची बांधेन देवळेही परि मुळ तत्व त्यांचे आहेच देवळे-ही राना मधेच देव मानायचाच झाला रानामधुन फुलता तो रान रान झाला त्याचीच रूपकेही त्याने प्रतीत केली आंम्ही खुळ्या जनांनी भक्तीत सोय केली सारे अखेर त्याचे त्याचेच फक्त आहे मी कोणता स्वयंभू...? त्याचे निमित्त आहे... वेडाहि मीच थोडा देवाजिच्या मुलांचा वेडास वेढणार्‍या रानातल्या फुलांचा... @-अतिशय अवडणार्‍या रानफुलांना-एका रानमुलाकडुन अर्पण

In reply to by अत्रुप्त आत्मा

नरेंद्र गोळे गुरुवार, 05/03/2012 - 17:23
वा! समर्पक कविता. जेवढी सुंदर फुले तेवढेच वर्णनही मनस्वी! रानफुलांचे एवढे वेड लागत असेल तर "अत्रुप्त आत्मा" व्हायलाही हरकत नाही.

स्मिता. Fri, 12/16/2011 - 17:36
जागुताईचा रानफुलांचा धागा म्हटल्यावर उत्साहात उघडला आणि सार्थक झालं. या चित्रमालिकेत अनेक नवनवीन फुलं बघायला मिळत आहेत. या सर्व रान फुलांची नावं कशी ठाऊक होतात?

दीपा माने Sat, 12/17/2011 - 06:17
सुंदर छायाचित्रे! जागु तुझ्यातल्या निसर्गाच्या वेडामुळेच तु ही छान छायाचित्रे घेऊ शकलीस. सुंदर कविता! अतृप्त आत्मा तुमच्या कवितेतला आध्यात्मिक पाया मनाला भावला.

जागु Sat, 12/17/2011 - 23:08
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. ह्या फुलांची काही नावे मला फ्लॉवर्स ऑफ इंडीया ह्या साईटवरून मिळाली. उंदीरमारीचे झाड आसपास असल्यास उंदरांची पैदास कमी होते. काही शेतकर्‍यांनी उंदरापासून संरक्षण होण्यासाठी ह्या झाडांची कुंपणाला लागवड केलेली नोंद आहे. कळलावी ह्या वेलेचा उपयोग औषध म्हणून गरोदर स्त्रीला बाळंतीण होण्यासाठी कळा लवकर येण्याकरीता केला जातो. अतृप्त आत्मा खुप सुंदर कवीता रचलीत. फुलांना न्याय दिलात.