मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी निघालो हो कळफलक घेऊन..

परिकथेतील राजकुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मी निघालो हो कळफलक घेऊन हो रस्त्यावर हो मार्गावर ओ काही संस्थळ आली.. मी जिलबी पाडून घेतली.. देवालाच माहिती नक्की कोणती कविता होती जे न देखे मध्ये भावानुवाद करून घेतला एक संस्थळ आले मी काथ्या पण कुटून घेतला.. त्या संस्थळावर मला ती भेटली तिला पाहून माझी सटकली तिच्या कवितेत लैला दिसली मी मजनू बनून आलो रसग्रहण करून आलो सगळ्या निंदा आणि नालस्त्या मी फाट्यावरती मारून आलो ओ काही संस्थळ आली.. मी जिलबी पाडून घेतली.. मग एकदा संपादक आला धाग्यावरती काठ मारून गेला काय माहिती कोण होता मला मात्र कंपूबाज वाटला मी अन्यायाला वाचा फोडली अजून एक जिलबी पाडली जिलबीने पुन्हा युद्ध पेटली ओ काही संस्थळ आली.. मी खाज भागवून घेतली.. लाजले मग सदस्यही स्वतःच्या थोबाडीत मारून त्यांनी घेतली मी देखील टाळी वाजवली संपादकही मागे हटले मला भुक्कड ते समजले मी लेखनकंडू चालूच ठेवले.. एकदम वादळ आले.. माझे खातेच उडाले नवीन आयडी काढली.. मी पुन्हा जिलबी पाडून घेतली.. डायरीयाच्या आठवणी विसरता विसरत नाहीत. त्या रोगाचीच एक झलक रुग्णाने दाखवली आहे. रुग्ण ? पाहा ओळखता आला तर! हे प्रिस्क्रिप्शन मात्र माझेच आहे.

वाचने 10212 वाचनखूण प्रतिक्रिया 41

स्पा Wed, 04/18/2012 - 11:58
=))=))=))=))=))=))=))=))=))=)) =))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=)) हसून हसून सदेह वैकुंठास गमन केल्या गेले आहे

In reply to by स्पा

पिवळा डांबिस Wed, 04/18/2012 - 12:16
सदेह वैकुंठास गमन केल्या गेले आहे पण गमन करण्यासाठी 'एअर पौराणिक'च वापरल्या गेली आहे ना? मग काही हरकत नाही!!!! नायतर मिपाकर उगीचच रागवायचे!!! :) बाकी परा, जिलबी कडक पडली आहे.... इतकी की जिलबी पाडतांना तू मस्त गांजाभरी चिलीम लावली असावीस असं चित्र डोळ्यापुढे उभं राहातं आहे!!! :)

कवितानागेश Wed, 04/18/2012 - 12:08
विखरी, जळजळीत सत्य मांडणारी भयवाह वेदनादायी वीररसपूर्ण श्रुंगारीक कविता! :D लाजले मग सदस्यही स्वतःच्या थोबाडीत मारून त्यांनी घेतली अत्यंत विदारक अनुभवांची आठवण झाली.... ;)

In reply to by कवितानागेश

चौकटराजा Wed, 04/18/2012 - 17:03
विदारक अनुभव कोणता? दोन दे दोन घे इतपत ठीक आहे . पण विदारक अनुभव का यावा या आनंद दायी स्थळावर ? जरा मला व्यनि करून तरी सांगा ना !

In reply to by कवितानागेश

प्रीत-मोहर गुरुवार, 04/19/2012 - 08:38
माउ माउ अग काय एकेक प्रतिक्रिया... जान लोगि क्या? बाकी परा ही गझल थोड्वी मीटरात बसली नाहीये. थोडा प्रयत्न करुन सुधारवु नक्कीच शकशील. ;)

नंदन Wed, 04/18/2012 - 12:51
गझलेचा अनुवाद सुरेख वठला आहे! श्री. परा यांनी 'इस्कूल के टैम पे, आना गोरी डैम पे' [पाठशाळेच्या समयासी, ये ग गौरवर्णीये धरणासी] ह्या भावविभोर गीताचाही मराठीत अनुवाद करावा, अशी त्यांना विनंती करतो.

In reply to by नंदन

रमताराम Wed, 04/18/2012 - 18:47
[पाठशाळेच्या समयासी, ये ग गौरवर्णीये धरणासी] मेलोऽऽ. हा प्रकार मूळ गीताला उगाचच सभ्य पातळीवर आणण्याचा, सबब दवणीय आहे. सबब श्री. नंदन दवणे, हा प्रकार तुम्हालाच अधिक चांगला जमेल. घ्या मनावर.

स्मिता. Wed, 04/18/2012 - 13:13
आपली प्रेरणा 'गदर' सिनेमातल्या 'मै निकला गड्डी लेके...' हे गीत आहे ना. बरोब्बर ओळखले की नाही. बाय द वे, मागे तुम्हाला भावनुवादाकरता काही गाणी सुचवली होती, त्याची वाट बघत आहे. काये ना, मला काव्याचा आस्वाद मातृभाषेत घ्यायला जास्त आवडते.

मृत्युन्जय Wed, 04/18/2012 - 13:22
मेल्या नक्की कोणाबद्दल लिहिलेस ते तरी सांग. सध्या मला किमान १० आयडींबद्दल संशय आहे. साले हे डु आयडी आमचेच का मिळत नाहित फक्त. बाकी कविता वाचुन मी खुर्चीवरुन खाली पडलो आहे.

पैसा Wed, 04/18/2012 - 13:35
वाचनखूण साठवणार आहे. फक्त तो कोण ते सांग!

सूड Wed, 04/18/2012 - 14:33
मा. परा हे काही नीट जमलेले नाही. मला यमक, अलंकार वृत्ताचे उत्तम ज्ञान आहे. तुम्ही माझ्याकडे शिकायला येऊ शकता. हे मी परा माझ्या घरापासून एक तासाच्या अंतरावर राहतो म्हणून सांगतो आहे. मलाही तितकंसं येत नव्हतं, एका भिकार कवीकडे मी दोन वर्ष त्यासाठी शिकत होतो. शेवटी कवीच्या खालच्या फ्लोअरला राहणार्‍यांनी कवीची मांडी पोखरली, पण मांडी पोखरली तरी शिकवायचा हेका त्याने सोडला नाही. (हेकटराजा)

In reply to by सूड

मला यमक, अलंकार वृत्ताचे किती उत्तम ज्ञान आहे ते माझ्या क्षेत्रातील लोक जाणतातच. लवकरच माझ्या 'मी बप्पीदा आणि हिमेश ' ह्या लेखातून मी ते सविस्तर लिहिनच.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय Wed, 04/18/2012 - 15:14
या कवितेत यमक अलंकाराच्या चुका नसतील तुझ्या मते तर तुझ्या पद्याच्या सेन्स ला व ज्ञानाला माझाच त्रिवार दंडवत ! न ही ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते विद्या विनयेन शोभते मरा

In reply to by इरसाल

सूड Wed, 04/18/2012 - 18:11
ही भाषा नाईलाज म्हणून , मनात चरफडत सत्य मानावं लागणारे वापरतात. अर्थात अज्ञांस सांगणे न लगे. नौरा(नौटाकराजा)

In reply to by सूड

चौकटराजा Wed, 04/18/2012 - 18:31
नौटाकराजा हे आपले टोपण नाव आपल्याला साजेसेच आहे. त्यामानाने हेकटप्रजा हे मी घेतलेले नाव फारसे साजेसे वाटत नाही कारण प्रजा अनेकानी बनते राजा एकच असतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

चौकटराजा Wed, 04/18/2012 - 18:36
या लेखाची वाट पहात आहे.धाग्याची मी वाट लावणार नाही की त्याला वात लावणार नाही .पण लेखातच सूचना कृपया करू नये अशी पुणेरी पाटी लावल्यास आभारी होईन. हेलदी धाग्याची मलाही आवड आहे .

In reply to by सूड

स्पा Wed, 04/18/2012 - 14:39
वा सुडोबा चांगलीच विनम्रता दाखवलीत मी एक काय सूचना केलीत.. तुम्ही कंपू घेऊन अंगावरच आलात.. हो आता वयोमानानुसार कुरापतींना मीच सुरुवात केलेली हे विसरलो.. तो भाग अलाहिदा पण आता तुमच्या पिढीने तरी "साठी बुद्धी नाठी" हि म्हण समजून घ्यायला हवी न.. -- ब्यांड बाजा

In reply to by सूड

चौकटराजा Wed, 04/18/2012 - 17:10
परा, अभिप्राय म्ह्टला की तो दोन्ही प्रकारे येणार पण एखाद्या सूचनेचा बाउ करून धागा हायवेकडून उकिरड्यात नेण्याची संवय आम्हास आहे. ज्यास धागा लिहिलेला असतो त्याचे म्हणणे असे असू शकते ना की सूचना मान्य आहे/नाही. बस मिटला प्रश्न .पण आमची ही प्रजा भलतीच समजूतदार नाही बरं .हा राजकुमाराकरवी राजाला इशारा आहे आपली हेकटप्रजा

सहज Wed, 04/18/2012 - 14:39
फेसबुक व फोरमच्यासाठी बनवलेला कळफलक नुकताच पहाण्यात आला होता. चालू द्या.