फॉल २००७
लेखनविषय:
असा गाफिल होऊन चालू नकोस
हे बघ, फक्त रंग बदलतायेत
माहितीये झाडांचे कसे पारे उडालेत
वाटतं पार कायापालट झालाय
असलं हे नेहमीचंच बरं-का
चांगलं हिरवं भरलं रान असतांना
रुसून सन्यासाची करायची सोंगं
मिरवायचे जरा भगवे-तांबडे कपडे
मग बर्फांचे फवारे लागले
थंडीनी चांगली जरब आणली
की येईल जरा डोकं ठिकाणावर
हळूच चढेल पुन्हा खराखुरा रंग
अरे सोंगं कधी टिकत नाहीत
मी कधीच फसलो नाही, सांगतो
तू ही जास्तं भाव देऊ नकोस
त्याचं हे असं नेहमीचंच आहे...
वाचने
5215
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
अंशुमानराव,
पानगळीचे वेगळे रूप आगळीच कल्पना
In reply to पानगळीचे वेगळे रूप आगळीच कल्पना by धनंजय
सहमत
In reply to पानगळीचे वेगळे रूप आगळीच कल्पना by धनंजय
हेच म्हणतो
फारच सुंदर कल्पना !
In reply to फारच सुंदर कल्पना ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सहमत आहे