पिपात मेल्या ओले उंदीर
असे आणलेसंच कसे, बघितल्याविण
फुकट मिळाले म्हणुनी आणशी
न बघता तू, बुद्धिहीन
बीळ सोडुनी सांग कसे ते
पिपात (या) आले ओले होऊन?
दिवस सांडला बोंबलत फिरण्यात
या गिळायला, आता हातपाय धूऊन
अंगात ना काही शक्ती आहे,
डोक्यात ना कुणी युक्ती आहे.
पोरींवरती लहरी डोळे
फेकशी पण
मधाळ स्मित;
त्या ओठांवरचे, ते ही
बेकलाइटी, बेकलाइटी!
रागाने करीसी पिंप आडवे,
पिपात(ले) उंदीर पळाले! पळाले!
बा. सी. मर्ढेकर
------------------------------------------------------------
उंट - विंदा करंदीकर
क्षितिज नाचले वाळूभवती
वाळु बरळली, ’नाही, नाही.’
अशाच वेळी उंट उगवला;
आणि म्हणाला, ’करीन काही.’
अन मानेच्या बुरुजावरती
चढले डोळे अवघड जागी;
क्षितिज पळाले दूर दूर अन
वाळु जाहली हळूच ’जागी’.
रूप असे पाहुनी अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण.
उंट चालला वाळूवरुनी
वाळु म्हणाली, ’आहे, आहे.’
...खय्यामाने भरले पेले;
महंमदाने रचले दोहे.
हा यात्रेकरु तिथे न खळला.
निळा पिरॅमिड शोधित जाई!
तहानेसाठी प्याला मृगजळ;
भूक लागता तहान खाई.
निळा पिरॅमिड दिसला का पण?
...खूण तयाची एकच साधी...
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी.
---------------------------------------------------------------------------
वेडी....... विंदांची कविता......
एका ढगाला कुशीत घेऊन झोपली,तेव्हा तिला गर्भ राहिला.
पुढे सर्व सुरळीत झाले.आपल्या घरातील मातीचे मडके
मनमुराद फोडून ती देहान्ताच्या यात्रेला निघाली.
वाटेत तिला गाढव भेटले,तिने त्याची समार्म्भपूर्वक पूजा केली.
धुपाटण्यांतला उरलासुरला धूप कनवटीला लावून ती म्हणाली,
"ह्याचीसुद्धा राख होती तर कोणाला काय सांगणार होत्यें?
पण दैव शिकंदर आहे म्हणून कुत्र्यासारखे पुढें जाते."
नंतर तिने वडाची पाने पिंपळाला लावली;आणि म्हणाली,
"आता मी कूणाचे काही लागत नाही,पौर्णिमीवढेहि".
पुढे सर्व सुरळीत झाले(हे मागे सांगितलेच आह.े)
वेडीला वीज झाली;आपले स्तन विजेला देऊन
वेडी आपली पुढे गेली;वाटेमध्ये विदूषक भेटला;
राजा भेटला,राणी भेटली;’अ’ भेटला,’ब’ भेटला;
पण वेडी शहाणी होती;तिने कोणालाच ओळखले नाहीं.
------विं. दा. करंदीकर.
वाचने
11193
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
रस्त्यात कोणसा आंधळा गातो -
चौकटराजांना विचारा.
बेकलाइटी स्मित
असा अर्थ सांगण्यात काय अर्थ
वर दिलेल्या तिन्ही
धन्यवाद.
पास...
या बद्द्ल थोडेसे लोकसत्ता वर वाचायला मिळेल
माझ्या वाचण्यात फार्फार
ती वरची 'पिपात' पण बा. सीं. चीच आहे काय? कुठून घेतली?
पंकज क्षीरसागर धन्यवाद या
यक्कु क्षीरसागरांनी दिलेली
मी काय म्हणतो.. केवळ
In reply to यक्कु क्षीरसागरांनी दिलेली by सांजसंध्या
हं.....
In reply to मी काय म्हणतो.. केवळ by गवि
केवळ कवितेच्या शीर्षकाने ती
वेडी या कवितेचा अर्थ
शहर
-१ असहमत
In reply to शहर by अनुप ढेरे
हम्म
In reply to -१ असहमत by परिकथेतील राजकुमार
अनुपजी असं वाटतंय..
कसं वाटतंय?
In reply to अनुपजी असं वाटतंय.. by सांजसंध्या
हम्म..
In reply to कसं वाटतंय? by धन्या
बघा काही मिळतं का
डॉ. छान चर्चा आहे ती
In reply to बघा काही मिळतं का by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा. डॉ. नीं दिलेल्या
बोंबला !
In reply to प्रा. डॉ. नीं दिलेल्या by यकु
हे म्हणजे हर्षद मेहताला
In reply to बोंबला ! by परिकथेतील राजकुमार
अगदी
In reply to हे म्हणजे हर्षद मेहताला by धन्या
____/\____ !!! बास..
In reply to अगदी by परिकथेतील राजकुमार
आम्ही जे काही केलंय ते
In reply to ____/\____ !!! बास.. by यकु
?
In reply to आम्ही जे काही केलंय ते by धन्या
?
In reply to आम्ही जे काही केलंय ते by धन्या
गैरसमज होतोय...
In reply to ? by परिकथेतील राजकुमार
क्या बात है !
In reply to गैरसमज होतोय... by धन्या
काही प्रतिक्रियांबद्दल न
जरा ईकडे लक्श