दुधिया हलवा ---
साहित्य -- एक छोटा कोवळा दुधी भोपळा, एक लिटर दुध, दोन चमचे साजूक तूप,
पाच टे.स्पून साखर किंवा आवडीप्रमाणे, काजू - बदाम काप, थोडे बेदाणे, थोडीशी वेलदोडा पुड.
कॄती -- प्रथम भोपळ्याच्या साली काढून घ्या. खिसून घ्या. आता कढईमध्ये तूप घाला व त्यावर
भोपळा खिस घालून चांगला परतून घ्या व आता त्यामध्ये दूध घाला, गॅस बारीक करा, आता तुमचे काम फक्त येताजाता ते ढवळत रहाणे. तुमचे काम तुम्ही करु शकता, मिपावर येउन गप्पा मारु शकता.कारण हे तयार व्हावयास जवळ जवळ एक तास तरी जातो.
आता हे दुध आटत जाउन त्याचा छान खवा बनू लागतो. वेगळा खवा घालायची जरुरीच नाही.
दुध पुर्ण आटले की त्यात साखर, काजू - बदाम काप, थोडे बेदाणे, थोडीशी वेलदोडा पुड घालून पुन्हा
थोडावेळ परतुन घ्या.
हा झाला आपला दुधी हलवा तय्यार.
वाचने
5161
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
फोटो दिसत नाहीत.
जब्बरदस्त ,खतर्नाक पाककृती
In reply to जब्बरदस्त ,खतर्नाक पाककृती by पक पक पक
अरे दूध उतू जाऊ नये म्हणूनच
In reply to अरे दूध उतू जाऊ नये म्हणूनच by निवेदिता-ताई
धन्यवाद......
आहाहा फोटु आले वा वा
सचित्र हलवा.
कधी येऊ हलवा खायला? -
मस्त माझा आवडता
तो.पा.सु.
मस्त पा.कृ.
मस्तच दिसतंय.