आजची रात्र...

चाणक्य जे न देखे रवी...
सुटुनी चांदण्या रातीतून, पहाट शिरतसे नभात या तरूण आहे मात्र अजूनी, रात्र आजच्या क्षणांत या मनातले वादळ तुझ्या-माझ्या, उतरे मद्याच्या प्याल्यांत या एक एक घोट फिरूनी, काहूरतो शरीरात या न आहे न होती कधी, तमा लोकांची मला नाही तरी काय मिळाले, त्यांच्यासवे जगण्यात या दे शब्दमिठी मला तुझी, सोडू नकोस सैल जरा कैफ मला जगू दे जरा, आज अश्या धुंदण्यात या चार भिंतीं पलिकडे, थोपविलेस तू 'त्या' वणव्याला सखया आज राख होऊदे, जगावेगळ्या जळण्यात या आहेच चिंता उद्या पुन्हा, जगण्याची तुला मला बघ जराशी आहे अजुनी, रात्र आजच्या क्षणांत या
वर्गीकरण
लेखनविषय:

8 टिप्पण्या 1,861 दृश्ये

Comments

मिसळलेला काव्यप्रेमी नवीन

मस्त कविता!
आहेच चिंता उद्या पुन्हा, जगण्याची तुला मला बघ जराशी आहे अजुनी, रात्र आजच्या क्षणांत या
क्या बात! व्वाह!!

अमितसांगली नवीन

दे शब्दमिठी मला तुझी, सोडू नकोस सैल जरा कैफ मला जगू दे जरा, आज अश्या धुंदण्यात या.... आवडली......