INDIA UNBOUND
In reply to मस्त.!! by चेतनकुलकर्णी_85
In reply to प्रकाश टंडन by Ravindra
In reply to मस्त ओळख by पैसा
दोन्ही घटना बंगालमधल्याच! म्हणजे उद्योगांना वातावरण पोषक आहे असंही म्हणता येणार नाही.याशिवाय अजुन एक घटक म्हणजे इथला कामगार वर्ग. प्रचंड विरोधाभास इथे दिसून येतो. काम मिळेपर्यंत कितीही पगारावर काम करायला हे लोक तयार होतात. पण एकदा का कामावर ठेवले तर काम कसे टाळता येईल हेच बघतात. अख्खी युनियन त्यासाठीच लढते. याचा अतिरेकही इतका होतो की 'काम करा' म्हणून मागे लागणार्या फोअरमन/इंजिनीअरला जीवे मारायच्या धमक्याही दिल्या जातात. अश्या स्थितीत उत्पादकता कशी येणार??
In reply to मस्त ओळख by पैसा
१९९१ ते २००० मधे तेव्हा जरी आशेचा किरण दिसला होता, तरी आताची परिस्थिती मात्र इतकी चांगली दिसत नाही.याच्याशी सहमत आहे. सरकारला करवसुलीसाठीसुद्धा एकसमान धोरण ठेवणे जमत नाहीये त्यामुळे करवसुली कोर्टकज्जांमध्ये अडकली आहे. त्यात अजूनही समाजवादाच्या नावाखाली अन्नवितरण व्यवस्था मोडकळीला आलेली असताना अन्नसुरक्षा योजनेसारख्या महागड्या योजना काढल्या जात आहेत. इंदिरा गांधींप्रमाणेच सोनिया गांधींच्या इच्छेपुढे मनमोहन सिंगांसारखा बुद्धिमान माणूस विनाकारण झुकतो आहे. बाकी शेतमालाच्या आयात-निर्यातीबद्दलचे आणि किंमतींबद्दलचे निर्णय तर ब्रह्मदेवालाही समजणे अवघड आहे तिथे आपला काय पाड? सुरु केलेल्या सुधारणा पूर्णत्वास न नेल्याने मुक्त अर्थव्यवस्थेचा फायदा गरीबांपर्यंत झिरपलाच नाहीय. जो काही अर्धवट फायदा झालाय तो आधीच सुस्थितीत असलेल्या वर्गाने उपभोगला आहे. असो. हे लवकरच बदलेल अशी आशा. पण एकदा स्वतःला वाघ न म्हणता हत्ती म्हटलं की कितीही डुलत डुलत चाला, काय फरक पडतो? अभिप्रायाबद्दल यकु,पैसाताई, प्रास आणि अन्या यांचे आभार!
In reply to मस्त ओळख by पैसा
इकम टॅक्सचं सरकारला व्यक्तींकडून उत्पन्न थोडं असलं तरी मध्यमवर्गीयांना त्यातून सुटका मिळत नाही, त्याचवेळेला कॉर्पोरेट्स वेगवेगळ्या मार्गाने कर कसा चुकवता येईल हे पाहून आपला नफा वाढवत असतात.नोकरी करणारे किती कर भरतात आणि स्वतःचा बिझनेस असलेले किती कर भरतात याची तुलना केली तर ते का हे समजून येईल. स्वतःचा बिझनेस असलेले लोक अनेकदा स्वतःच्या गरजेसाठी घेतलेली एखादी गोष्ट बिझनेससाठी असे दाखवून त्यावर depreciation benefits घेऊ शकतात. उदाहरणार्थ स्वतःच्या वापरासाठी घेतलेला संगणकही बिझनेसच्या नावावर विकत घेतला तर संगणकासाठी असलेला दरवर्षी ६०% घसारा दाखवून खर्च वाढवून दाखविता येतो. अशा अनेक पळवाटा आहेत. म्हणजे कागदोपत्री नफा कमी म्हणजे करही कमी. नोकरदारांना असे करता येत नाही म्हणून ते जास्त कर भरतात. आणि बहुतांश वेळा या पळवाटांच्या बाबतीत कायदा तोकडा पडतो.म्हणजे वरच्या उदाहरणात म्हटल्याप्रमाणे एखादा संगणक नक्की स्वतःच्या वापरासाठी घेतला की बिझनेसच्या वापरासाठी घेतला हे नक्की सिध्द कसे करणार?
बँकांचे घराच्या कर्जाचे दर ११/१२ टक्के असतात, त्याचवेळेला कॉर्पोरेट्सना मात्र ६/७ टक्के दराने कर्ज सहज उपलब्ध असतात.सध्याच्या काळात नक्की कोणत्या कॉर्पोरेट्सना ६/७% दराने कर्ज मिळते? मी एका बॅंकेत कंपन्यांना कर्ज मंजूर करायच्या विभागात कामाला आहे.तिथे तरी मी कमितकमी व्याजाचा दर बेस रेट+२.५% म्हणजे १३% बघितला आहे. जर कंपन्यांनी External Commercial Borrowing केले म्हणजेच परदेशातून परकीय चलनात कर्ज घेतले तर व्याजाचा दर बराच कमी असतो. पण असे कर्ज घेण्यापूर्वी रिझर्व्ह बॅंकेची परवानगी लागते आणि कंपनीचे नाव चांगले नसेल तर परदेशातही त्या कंपनीला कर्ज द्यायला परदेशी बॅंक तयार होणार नाही. तसेच परदेशातून घेतलेल्या कर्जावर परतफेडीच्या वेळी विनिमय दरात होणाऱ्या चढ-उतारांचा पण परिणाम होतो.
In reply to इकम टॅक्सचं सरकारला by क्लिंटन
In reply to इकम टॅक्सचं सरकारला by क्लिंटन
In reply to कमी दर by पैसा
दुसर्या एका खाजगी बँकेने आमच्या डिपॉझिट तारणावर त्याना ७% (होय. ७%ने) कर्ज मंजूर केलं!!कमाल आहे. पण ही गोष्ट झाली गेल्या वर्षीची. मार्च २०१० पासून व्याजाचे दर १२ वेळा वाढले आहेत. आणि सगळ्याच कंपन्यांना सध्याच्या काळात (व्याजाचे दर वाढलेले असताना) ६-७% ने कर्ज मिळते असे नक्कीच नाही ना? :)
In reply to दुसर्या एका खाजगी बँकेने by क्लिंटन
In reply to सरसकट नाही by पैसा
In reply to समाजवादी धोरणे by क्लिंटन
ती धोरणे राबविणे ही त्या काळाची बऱ्याच अंशी गरजही होतीहे मान्य करायला काहीच अडचण नसावी पण त्याच वेळी Wage Goods Theory सारख्या पर्यायांकडे दुर्लक्ष करण्याचे काहीच कारण नव्हते. धोरणे अवलंबली यात चूक नाही पण त्यांची अंमलबजावणी नीट होत नाहीय हे पाहूनही केवळ हट्टाने किंवा राजकीय फायद्यासाठी ती रेटत राहणे हे चूकच नव्हते काय? कोकाकोलाचे उदाहरण मला तरी पटले नाही. टेलिकॉम क्रांती घडवताना सॅम पित्रोदांनी टेलिफोन सेवा दूरवर कशी पसरवली? गावा-गावातल्या दुकानदारांकडे कॉईनबॉक्स सुरु करून खूप कमी वेळात देशभर ही सेवा पुरवली गेली, तसेच कोकाकोलालाही करणे शक्य होते. पारलेसारख्या कंपन्यांनी ते करून दाखवलेही. बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यावर सरकारने शाखा वाढवल्या हे योग्यच झाले परंतु मुक्त अर्थव्यवस्था असती तर बँकांची गरज तशीही वाढलीच असती आणि गरजेप्रमाणे शाखा निघाल्याच असत्या. सरकारने अवाढव्य खर्च करण्यापेक्षा योग्य ते प्रोत्साहन आणि नियंत्रण यंत्रणा निर्माण केली असती तरी भागले नसते काय?
In reply to समाजवादी धोरणे by क्लिंटन
पण त्यावेळी [स्वातंत्रय मिळाल्यनंतरच्या काळात] खाजगी उद्योगाची स्थिती मुळात मोठी गुंतवणुक करण्यासारखी नव्हती. म्हणूनच नेहरूंनी पुढाकार घेऊन सरकारी कंपन्या विविध उद्योगांमध्ये आणल्या.खाजगी उद्योनांना काही इन्सेन्टिव्ह्स देऊन मोठे उद्योग उभारता आले नसते का? प्रत्येक बाबीत सरकारचे अस्तित्व आपणास घातक ठरले आहे का?
In reply to स्वातंत्र्यानंतर by प्रदीप
खाजगी उद्योनांना काही इन्सेन्टिव्ह्स देऊन मोठे उद्योग उभारता आले नसते का?हो काही प्रमाणात हे करता आलेच असते.तरीही सरसकट सगळ्या क्षेत्रांमध्ये हे करायला भांडवल, तांत्रिक ज्ञान, उपयुक्त resources ची टंचाई या सगळ्या गोष्टी आडव्या आल्या असत्या हे नक्की. वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मी समाजवादी/साम्यवादी अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता नक्कीच नाही. अनेकांचे मत असते की नेहरूंच्या धोरणांनी पूर्ण वाट लावली आणि ते पूर्णपणे समर्थनीय नाही असे मला वाटते.
प्रत्येक बाबीत सरकारचे अस्तित्व आपणास घातक ठरले आहे का?हो परत एकदा लिहितो. १९४७ मधील परिस्थितीनुसार कदाचित ती धोरणे अवलंबणे ही काळाची गरज होती. पण तीच धोरणे अगदी १९९१ पर्यंत कायम ठेवायला हवी होती का, ती आधी बदलता आली नसती का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला लागणारी उपयुक्त माहिती माझ्याकडे नाही. म्हणून ४४ वर्षे का लावली या बद्दल काहीच लिहित नाही. आजही अनेक उद्योगांमध्ये सरकारचे अस्तित्व आहे आणि सरकारी उद्योगांमध्ये असलेला गलथानपणाही आहे. त्याचे अजिबात समर्थन नाही.
In reply to उत्तम ओळख. by जयंत कुलकर्णी
लायसेन्स राज मुळे खाजगीत कारखाने निघत नव्हते हेही खरे आहेसुरवातीच्या काळात लायसेन्स राज असणे ही पण एक गरज होती. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतात नैसर्गिक साधन-सामुग्री भरपूर होती पण त्यातील tapped resources खूपच कमी होते. तेव्हा परमिट-कोटा-लायसेन्स ठेऊन "रेशनिंग" करणे ओघाने आलेच. आणि हे resource tap करायची क्षमता खूपच कमी खाजगी उद्योगांमध्ये होती तेव्हा सरकारने पुढाकार घेऊन ते काम करायचा प्रयत्न केला हे एका प्रतिसादात म्हटलेच आहे. आता हे लायसेन्स राज कधीतरी काढून टाकणे गरजेचे होतेच. पण ते नक्की कधी करणे योग्य झाले असते (५/१०/२०/३० की प्रत्यक्षात लागली तेवढी ४४ वर्षे) यावर भाष्य करायला माझ्याकडे पुरेशी माहिती नाही तेव्हा त्यावर काहीही लिहित नाही.
त्या काळातील भारतीय उद्योजक गुंतवणूक करायला तयार नव्हते किंवा त्यांची तशी परिस्थिती नव्हती हे म्हणणे धाडसाचे होईल. बरेचसे खाजगी उद्योगच सरकारने ताब्यात घेतले.दोन मुद्दे: सरकारने बरेच खाजगी उद्योग ताब्यात घेतले हे बरोबर आहे पण त्यातले किती उद्योग भारतीय मालकीच्या कंपन्यांच्या ताब्यात होते (आणि किती उद्योग ब्रिटिश कंपन्यांच्या ताब्यात होते) हे पण बघायला हवे. दुसरे म्हणजे आज खाजगी क्षेत्रातील उद्योग सरकारी कंपन्यांपेक्षाही जास्त पैसा बाजारातून उभा करून काहीही करू शकतात पण त्या काळी तशी परिस्थिती नव्हती.त्यामुळे उद्योगधंद्यांची वाढ झपाट्याने व्हायला खाजगी उद्योगांना भांडवलाची समस्या नक्कीच आली असती. तसेच स्टीलसारख्या काही उद्योगात तांत्रिक ज्ञान उपलब्ध होते (तरीही भिलाई कारखान्यासाठी रशियनांना बोलवायला लागले ही गोष्ट वेगळी) पण तीच परिस्थिती सगळ्या उद्योगांमध्ये होती का?तेव्हा सरकारने पुढाकार घेऊन सुरवातीच्या काळात उद्योग काढले हे चांगलेच झाले.
In reply to लायसेन्स राज मुळे खाजगीत by क्लिंटन
In reply to क्लिंटन, ////सुरवातीच्या by जयंत कुलकर्णी
सरकारने हे जे पुढाकार घेऊन काम केले त्याचे कारण नुसते एवढेच नव्हते, लोकांना नोकर्या देऊन खूष ठेवणे हाही त्यातील एक उद्देश असावा. (जो अजूनही बंगाल मधे असतो).अर्थातच. मी स्वतः समाजवादी /साम्यवादी आर्थिक विचारांचा अजिबात पुरस्कर्ता नाही. ज्या शिक्षणसंस्थेला epitome of capitalism असे म्हणता येईल अशा एका शिक्षणसंस्थेत माझे शिक्षण झाले आहे आणि बहुतांशी तेच विचार माझेही आहेत. माझ्या प्रतिसादाचा उद्देश हा की सध्या नेहरूंच्या आर्थिक धोरणांवर टिका करणारे बरेच लोक असतात. माझ्या मते ती टिका १००% समर्थनीय नाही कारण त्या परिस्थितीत उपयुक्त Resources ची टंचाई असताना नेहरूंच्या सरकारने त्या परिस्थितीतून मार्ग काढायला योग्य तेच केले.
बजाजवर जास्त वाहनांचे उत्पादन केल्याबद्दल सरकारने खटला भरला होता.बहुतेक सर्वच उद्योगांना उत्पादनाचा कोटा ठरवून दिलेला होता. याचे कारण परत तेच-- उपयुक्त Resources ची टंचाई. समजा देशात १०० एकक स्टील, १०० एकक वीज आणि १०० एकक इतर Resources आहेत आणि सगळ्या उद्योगांना आहेत त्याच Resources मध्ये भागवून घ्यायचे आहे. या परिस्थितीत जर बजाजने त्यांना ठरवून दिलेल्या १० पेक्षा जास्त एकक स्टील/वीज वापरली तर त्याचा अर्थ इतर उद्योगांना तेवढे Resources कमी आणि त्या उद्योगांवर परिणाम होणार! कोटा पध्दतीचे मागचे rationale हे होते. आता प्रत्यक्ष बजाजविरूध्दचा खटला नक्की कधी भरला, त्यावेळी कितपत टंचाई होती याची माहिती मला नाही. पण १९४७ नंतरची टंचाई लक्षात घेता कोटा पध्दत आणणे आता वाटते तितके वाईट नव्हते एवढाच माझा मुद्दा आहे. आता तीच धोरणे किती वर्षे राबवायला हवी होती? १९९१ पूर्वीच ती मोडीत काढता आली असती का किंवा मोडीत काढायला हवी होती का या प्रश्नांची उत्तरे द्यायला लागणारी माहिती माझ्याकडे नाही म्हणून त्यावर भाष्य करत नाही.
मी सरकारी उद्योगाच्या विरूद्ध नाही पण त्यांना अवाजवी मदत करण्याच्या जरूर विरोधी आहे आणि पूर्वीच्या धोरणांचा तो अविभाज्य घटक होता.हो बरोबर. आता भारतातील खाजगी उद्योग समर्थ असताना आणि पूर्वीची टंचाईची परिस्थिती आता नसताना (किंवा असेल तर खाजगी उद्योग आयातीद्वारे समस्या सोडवू शकायच्या परिस्थितीत असताना) सरकारने अजूनही सगळ्या उद्योगांमध्ये स्वतः राहायला पाहिजे असे नक्कीच नाही.
उद्योग कोणाच्या मालकीचे आहेत याचा याच्यात कुठे संबंध आहे हे कळाले नाही.अनेकदा नेहरूंवर टिका करणारे म्हणतात की त्यावेळीच खाजगी क्षेत्राला पुढे आणायला हवे होते. नाहीतरी अनेक लहानसहान खाजगी कंपन्या सरकारने सुरवातीच्या काळात ताब्यात घेतल्याच होत्या तेव्हा पाहिजे तितकी capability खाजगी उद्योगांकडे होती असेही म्हटले जाते. तेव्हा हे उद्योग भारतीयांचेच होते की इंग्रजांचे होते हा प्रश्न उभा राहतो. म्हणजे जर उद्योगांचे key knowledge इंग्रज मालकांकडे असेल आणि ते मालक १९४७ नंतर त्यांच्या देशात निघून गेले तर अशा खाजगी कंपन्या पुढे किती टिकणार हा प्रश्न होताच. तेव्हा सरकारने ज्या कंपन्या ताब्यात घेतल्या त्यापैकी किती ब्रिटिश गेल्यानंतरही तगू शकतील अशा होत्या? दुसरे म्हणजे संपूर्ण देशात उद्योगांची वाढ करायला लागणारे स्केल त्यांच्याकडे होते का? तिसरे म्हणजे फायनान्शियल मार्केट आजच्याप्रमाणे तेव्हा पुढारलेले नव्हते. तेव्हा अशा खाजगी उद्योगांना एका ठराविक मर्यादेनंतर भांडवलाची समस्या आलीच असती . भारत सरकार इतर देशांकडून किंवा World Bank सारख्या संस्थांकडून पैसे कर्जाऊ अधिक सहजपणे मिळवेल पण खाजगी कंपन्यांना ही मर्यादा होती. अशा अनेक गोष्टींचा विचार करता सुरवातीच्या काळातले सरकारचे धोरण-- महत्वाचे उद्योग सरकारच्या ताब्यात हे तितके वाईट नव्हते असे लक्षात येईल.
In reply to स्पष्टीकरण by क्लिंटन
In reply to Got your point. पण मला वाटते by जयंत कुलकर्णी
काही चुका धाडस दाखवून कबूल करायला लागतील.सहमत आहे. नाहीतर यशापयशाचं मूल्यमापन कसं करायचं? सगळ्या चांगल्या गोष्टींबद्दल कौतुक पाहिजे तर चुकांची जबाबदारी घ्यायचीही तयारी पाहिजेच ना.
In reply to Got your point. पण मला वाटते by जयंत कुलकर्णी
In reply to एक फार चांगले पुस्तक by रघुपती.राज
या पुस्तकाकडून 'ऐतिहासिक' पुस्तकाप्रमाणे अपेक्षा बाळगणे योग्य नाही.येथे लेखकाचा भर आर्थिक मुद्दे व त्या अनुशंगाने येणारी सामाजिक धोरणे यावर आहे. त्यामुळे "फाळणी आणि पाक पुरस्कृत दहशतवादाचा उल्लेख मात्र कुठेच दिसत नाही"असं कसं? प्रत्येक पुस्तकात फाळणी आणि पाक पुरस्कृत दहशतवादाबरोबरच नेहरू कसे नेभळट होते, त्यांनी काश्मीर प्रश्नाचा कसा विचका केला, मुस्लिमांचे मतासाठी कसे लांगूलचालन केले जाते याचा उल्लेख नसेल तर कसे चालेल?
In reply to सहमत १००% by चेतनकुलकर्णी_85
मस्त.!!