अमराईतला निवडुंग,

ज्ञानोबाचे पैजार जे न देखे रवी...
डुबुक डुबुक डुबुक डुबुक, डराव डराव डराव डराव, काव काव काव काव, म्याव म्याव म्याव म्याव, तडतड ताशा, धडधड गाज, ढोल वाजतो मठ्ठ स्वरात, वृषभ त्वचा ही पॉवरबाज, वॄषोदर उतरे माडी आज, पंकज भार्या जगास तारी, मोहनमर्कट वन्दा भारी वृषणे ठेचा घाला दोरी, मंडुकरावही चाबुक मारी, पिवळा शेंबुड वाहे भळभळ, अश्वथामा करतो जळजळ, तरुणाईची बिभित्स सळसळ, गाभार्‍यातील पिसाट वळवळ, गुरुवर्यांना सुटते खाज, गुरुकुलातला नंगा नाच, ज्ञानरज्जुला पतंग माज, शरपंजरीवर मदीरा पाज, जगणे थोटे, सारे खोटे, नर्मदेतले दगड गोटे, लोचट कुत्रा पायही चाटे, जनमृत्युचे घालत खेटे, रामाला शरयूने गिळले, शामराव बाणाने निमले या सार्‍यातुन इतके कळले आपण मेलो जग बुडाले, डु....बु....क...., ड....रा....व...., का....व...., म्या....व...., लावत ठिगळे लंगोटीला, बुवा हसतो गुढ जगाला, पैजारबुवा,
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

14 टिप्पण्या 2,726 दृश्ये

Comments

ज्ञानोबाचे पैजार नवीन

In reply to by पक पक पक

अरेरे, गलतीसे मिष्टेक हो गया. सं.मं. ला विनंती त्यांनी योग्य तो बदल करावा. पैजारबुवा,

मिसळलेला काव्यप्रेमी नवीन

रचना आवडली.

वपाडाव नवीन

आमच्या एका आंजा मित्राची आठवण म्हणुन हा प्रतिसाद... सध्या ते कोमात आहेत.

चित्रगुप्त नवीन

वाहवा बुवा, फारा दिवसांनी काही जबरदस्त वाचायला मिळाले. सलाम.

पैसा नवीन

ही कविता वाचली नव्हती! मस्त आहे!