Skip to main content

म्हणून..

गवि यांनी या दिवशी प्रकाशित केले.
काही नाही रे भेंचोत.. आमचं नुसतं फ्रेंडलीये.. असं सगळ्या गँगला म्हणत म्हणत आणि आतल्या आत मोहरत जे काही केलं तेव्हाही व्हॅलेंटाईन डे येऊन गेले असणार बरेच.. लक्षात आलं नाही.. आमचं कॅलेंडर वेगळंच होतं.. म्हणून.. तेव्हाही सुरुवात झाली होती.. ग्रीटिंग कार्डांची चार्पाच दुकानं फोडायला.. पण फरक पडला नाही.. कारण ग्रीटिंग घ्यायचं नव्हतंच.. ग्रीटिंगबिटिंग कशाला.. भावनांचं प्रदर्शन नुसतं.. म्हणून.. चॉकलेटं.. हार्टशेपची नव्हती.. तिला दिलं होतं मी.. रावळगाव मला वाटतं.. अन तिनंही मला.. कॉफी बाईट.. रॅपर पडून आहे कपाटात खास कप्प्यात.. ठेवून उपयोग नसला तरी फेकायचं कुठे.. म्हणून.. दोन फेब्रुवारींच्यामधे पाऊस येतोच.. तेव्हाही यायचाच.. कानात गप्पकन दडा बसेस्तो भिजलो.. कधीकधी तर चक्क तिच्यासोबतही.. कॉलेज चुकवून.. करियरची कधी शाट पर्वा नव्हती...तिलाही..मलाही.. म्हणून... त्या वेळच्या त्या घरच्या त्या बागेत लाल गुलाब होता तिज्यायला..वास अजून नाकात.. पण तोडला कधीच नाही.. सगळे आपोआप कोमेजू दिले.. तोडून कशाला कोमेजवायचे.. म्हणून.. शहराच्या नावावरुन अमेरिका की ऑस्ट्रेलिया कळत नसलं तरी कुठेतरी ती आहे.. कुठेतरी आहे तशीच फेसबुकवरही.. पोराचे हॅलोवीन की थँक्सगिव्हिंगचे फोटो अपलोडवत.. मीही टाकलेत मारुति आल्टो घेतली तेव्हाचे.. आली होती तिची फ्रेंड रिक्वेस्टही.. "नॉट नाऊ" क्लिक केलं.. "नेव्हर"चं बटण नव्हतं.. म्हणून..
प्रास

आयला गवि, काय लिहितोयस रे.... आज सॉलिड मुहूर्त जमलाय मिपावर. सकाळी सकाळी मधुबाला दर्शन, त्यानंतर श्रामोंचा रामदासकाकांवरचा लेख, त्या पूजा पवारांची व्हॅलेन्टाईनच्या पावसातली गोष्ट आणि तुझं टोटल व्हॅलेन्टाईनी स्वगत..... अन्या म्हणतो तेच खरंय, च्यायला, आज मिपाकरांचा जीव घेणारेत तुम्ही लोकं..... मुक्तक झकास उतरलंय हे वेगळं सांगायला नकोच.
14/02/2012 - 15:22 Permalink
पक पक पक

वा! गवि खुप छान !! मस्त लिहील आहे मनोगत... दोन फेब्रुवारींच्यामधे पाऊस येतोच.. तेव्हाही यायचाच.. कानात गप्पकन दडा बसेस्तो भिजलो.. कधीकधी तर चक्क तिच्यासोबतही.. कॉलेज चुकवून.. करियरची कधी शाट पर्वा नव्हती...तिलाही..मलाही.. म्हणून... फारच भारी वाटल वाचायला....एक्दम रियल ,
14/02/2012 - 15:24 Permalink
चिगो

In reply to by धमाल मुलगा

>>झाला का बल्ल्या? गप ऽ किनी फुटलो की राव.. काय हे? गवि बिचारे हळुवार होऊन लिहीताहेत, आणि तुम्ही काड्या घाला साल्यो.. गवि, मुक्तक आवडलं.. (भिजलेला) चिगो
15/02/2012 - 17:25 Permalink
गवि

................... ..लेखक कवी किंवा निवेदक याने "ब्लॉक युजर" असं बटण का दाबलं नाही अशी शंका येऊ शकते.. आणि विचार केल्यावर ती दूरही होऊ शकते..
14/02/2012 - 15:57 Permalink
मन१

In reply to by गवि

* काहीतरीच्चे नुस्तं... मुळात सदर इसमाने फेसबुक अकाउंट हेच तिच्याकडून येणार्‍या फ्रेंड रिक्वेस्टच्या आशेने काढलेले नाही कशावरून? आधी स्वतःहून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची हिम्मत झाली नाहिच, उलट जेव्हा खरोखर रिक्वेस्ट दारी चालत आली तेव्हा तिचा स्वीकार करण्याचीही हिम्मत झाली नाही. मानवी मन हे असं घोटाळ्याचच का असतं हे (असलाच तर/ मानवाने निर्माण केलेला)देव जाणे. *
14/02/2012 - 23:10 Permalink
मिसळलेला काव्यप्रेमी

...............!!! __/\__
14/02/2012 - 16:20 Permalink
आकाशी नीळा

In reply to by विजय नरवडे

___/\___
29/02/2012 - 09:34 Permalink
प्यारे१

गवि........ आम्हाला खूप शोधूनही चेपु/ ऑर्कुट (हॅहॅ)वर सापडत नाहीए. तुम्ही नशीबवान! :) आम्ही काय क्रावं ब्रं? :(
14/02/2012 - 17:21 Permalink
विश्वनाथ मेहेंदळे

In reply to by प्यारे१

अज्ञानात सुख असते भाऊ. कशाला शोधता? नका शोधू. वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे एक खुबसुरत मोड देकर छोडना अच्छा !!!
29/02/2012 - 17:42 Permalink
दादा कोंडके

कमीत कमी शब्दांत भावना पोहचवण्याच कसब!
14/02/2012 - 17:27 Permalink
कोल्हापुरवाले

आली होती तिची फ्रेंड रिक्वेस्टही.. "नॉट नाऊ" क्लिक केलं.. "नेव्हर"चं बटण नव्हतं.. ................................... लयच भारी राव ....१दम घुसलच्..
14/02/2012 - 17:37 Permalink
रमताराम

गविशेट एक नंबर. (शैली ढसाळ - ढिसाळ नाही ! - वाटली. ;) )
14/02/2012 - 18:18 Permalink
मी-सौरभ

डोळे पाणावले गवि: कुठं फेडाल ही पाप..????
14/02/2012 - 18:21 Permalink
अत्रुप्त आत्मा

त्या वेळच्या त्या घरच्या त्या बागेत लाल गुलाब होता तिज्यायला..वास अजून नाकात.. पण तोडला कधीच नाही.. सगळे आपोआप कोमेजू दिले.. तोडून कशाला कोमेजवायचे.. म्हणून.. __/\__ __/\____/\__ __/\____/\__ __/\____/\__ __/\____/\__ __/\____/\__ __/\__
14/02/2012 - 19:28 Permalink
धमाल मुलगा

पण आपण सालं होतोच असं निर्लज्ज, की ही अशी हवीहवीशी हुरहुर कधी फारशी दाटलीच नाही. कदाचित एखाद्या आनंदाला मुकलो बहुतेक. पण आपलं म्हणजे सालं कसं, '...फिर मुहल्ले में हेमा आयीऽऽऽ...' सालं वासुनाका जगणार्‍यांना काय किंमत कळावी ह्या हुरहुरीची. काय बोलता?
14/02/2012 - 20:23 Permalink
५० फक्त

In reply to by धमाल मुलगा

+१००, कालेजात बाकी लोकांना शॉक देण्यातच दिवस गेले,आणि नंतर पैशाच्या मागं लागलो, ह्या असल्या हुरहुरी वगैरे जाणवु द्यायच्या भानगडीच पडलो नाही कधी. ही गोष्ट आणि मा.पुजा पवारांचे लेख वाचताना काहीतरी राहुन गेलंय हे जाणवलं, (तसं तर कुठल्याही पवारांकडं पाहिलं की काहीतरी राहुन गेलंय हे जाणवतंच ) थोडा वेळ, पण नंतर ती जाणीव देखील मागं पडली. आणि आता तर काउंट डाउन सुरु केलंय, फेसबुकवर बरेच जण भेटलेत, सगळ्यांनी फ्रेंडशिप अ‍ॅक्सेप्ट केलीय, महिनाअखेरला भेटणार आहोत, त्याची तयारी सुरु आहे, दहा दिवसात पोट ३-४ इंच आत घेण्यासाठी काही उपाय आहे का कुणाकडे, नंतर पुन्हा वाढलेलं दिसलं तरी चालेल.
15/02/2012 - 12:32 Permalink
प्रास

In reply to by ५० फक्त

दहा दिवसात पोट ३-४ इंच आत घेण्यासाठी काही उपाय आहे का कुणाकडे, नंतर पुन्हा वाढलेलं दिसलं तरी चालेल.
हे का नाही ट्राय करून बघत? बहुतेक तुमच्या अपेक्षेप्रमाणे परिणाम होईल ;-)
15/02/2012 - 14:47 Permalink
शुचि

काही नाही रे भेंचोत.. आमचं नुसतं फ्रेंडलीये.. असं सगळ्या गँगला म्हणत म्हणत आणि आतल्या आत मोहरत जे काही केलं तेव्हाही व्हॅलेंटाईन डे येऊन गेले असणार बरेच..
एक नंबरी!!!!!!! =)) =)) =))
14/02/2012 - 21:40 Permalink
श्रीरंग

"रॅपर पडून आहे कपाटात खास कप्प्यात.. ठेवून उपयोग नसला तरी फेकायचं कुठे.. म्हणून.." क्लास!
14/02/2012 - 23:31 Permalink
पिवळा डांबिस

ग्रीटींग.....आमच्या वेळेस त्याचं प्रस्थ नव्हतं..... चॉकलेट.... कॅडबरी एक्लेयर्स! पाऊस... भिजणं...कॉलेज चुकवून.... आयला डिट्टो!! मरीन ड्राईव्ह!!! लाल गुलाब... त्याकाळी परवडत नव्हते!!! अमेरिका की...कुठेतरी ती आहे.... हो, खरंय!! आली होती तिची रिक्वेस्टही.... होय, डिनरला जायचंय आज!!!! काही नाही रे भेंचोत.. आमचं अजूनही नुसतं फ्रेंडलीये..... :)
15/02/2012 - 00:27 Permalink
चाणक्य

गवि तुम्ही भारी लिहिता (जस काय माझ्या प्रमाणपत्रावाचुन अडलंच होतं सगळ). या लिखाण बद्दल म्हणाल तर मला याची शैली आवडली. वेगळीच आहे. आणि हो... झालं गेलं विसरून जा आता (ह. घ्या.)
15/02/2012 - 12:07 Permalink
मेघवेडा

गविशेट - गॅरी सोबर्स, रवि शास्त्री, हर्शल गिब्ब्स, युवराज सिंह इ. लोकांच्या पंक्तीत जाऊन बसलात हे जे काही लिहिलंय त्याद्वारे! आवड्याच.
15/02/2012 - 15:00 Permalink
विजुभाऊ

हल्कट साल्या का उगाच छळ करतोस.... रॅपर फेकून द्यायचे धाडस नसते................ ज्यांचे असते ते रॅपर साठवूनच ठेवत नाहीत
15/02/2012 - 15:25 Permalink
तर्री

लेख म्हणून वाचू लागलो तर वाचता वाचता त्याची कविता झाली की हो ग.वि. शेट ! * ह्या लेखातील पात्राशी कोणा व्यक्तीचा सम्बध असला तर आपली साली सहानुभूती , नसला पार तुम्हाला "परकाया" प्रवेश करण्याची हातोटी लाभली आहे. लेखणी जोरात प्रसावावी .
15/02/2012 - 16:29 Permalink
चौकटराजा

पोराचे हॅलोवीन की थँक्सगिव्हिंगचे फोटो अपलोडवत.. मीही टाकलेत मारुति आल्टो घेतली तेव्हाचे.. आली होती तिची फ्रेंड रिक्वेस्टही.. "नॉट नाऊ" क्लिक केलं.. "नेव्हर"चं बटण नव्हतं.. म्हणून.. गवि , आएशपाथ सांगतो आपली कथा याच्या एकदम उलटी ! आपली एक फ्रेंड रिक्वेस्ट ही काय ? तिला पण "णॉत णाउ" च्यायला ....आपला कावळा कधीच शिवणार नाही. पोरानो तो कार्यक्रमच करू नका बाबानो !
29/02/2012 - 21:23 Permalink