गोळाबेरीज
गोळाबेरीज या चित्रपटाबद्दल समजल्यापसूनच प्रचंड कुतुहल मनात होतं. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पु. लं. नी अक्षरश। (विसर्ग कसा लिहितात प्लीज सांगा कोणीतरी) जिवंत करून सोडलेल्या व्यक्ती आणी वल्ली कशा रेखाटल्या असतील? हे सर्व विविध पात्रे एका कथानकात कशी गुंफली असतील? मातब्बर कलालारांचे सैन्य आपल्या मनातल्या या व्यक्तिरेखांना कितपत न्याय देऊ शकतील? असे प्रचंड औत्सुक्य मनात घेऊनच सिनेमाग्रुहात पाय ठेवला.
संपूर्ण महाराष्ट्राला मुखोद्गत असलेले पु. लं. चे लिखाण पडद्यावर उतरवण्याचा प्रयत्न म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच. असो.
चित्रपटाची सुरुवात होते ती भाईंच्या बालपणाच्या काळात, हरीतात्यांच्या प्रवेशाने. हरीतात्या मुलांना इतिहासातल्या गोष्टी सांगण्यात मग्न असताना पुर्ष्याचे आई वडील सूत्रधारासारखे मागे बोलताना दिसतात. (ही बाई संपूर्ण वेळ कोकणी का बोलताना दाखवली आहे, हे कोडं अजून उमगलं नाही.)
कालानुरूप, पु.लं.(निखिल रत्नपारखी) कॉलेजमध्ये जातात, तिथे त्यांना भय्या नागपूरकर, नंदा प्रधान (सुबोध भावे), व नाथा कामतच्या व्यक्तिरेखेशी साधर्म्य असलेले दोन मित्र (पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक) आदि भेटतात. त्यांचे कॉलेजच्या काळातील प्रसंग अधिक खुलतील असे वाटत असतानाच, काळ अजून पुढे सरकतो. पु.लं आता एका कॉलेजात प्राध्यापक झालेले असतात. तिथे सुनिताबाई भेटणे, युगुलगीत (सुंदर चित्रिकरण, गाणं मात्र लक्षात न राहण्याजोगे.), विवाह वगैरे.
पुढे पु.लं चा चित्रपट स्रुष्टीतिल प्रवास, कोकणातल्या ट्रिप्स, बेळगावातील वास्तव्य, इत्यादि प्रसंगांतून नामू परीट (शरद पोंक्षे), नारायण(आनंद इंगळे) अन्तू बर्वा(दिलीप प्रभावळकर), रावसाहेब(क्षितिज झारापकर), पेस्तनकाका(सतीश शहा), घर बांधणारा कुलकर्ण्या (प्रशांत दामले), चितळे मास्तर (मोहन आगाशे), बबडू(संजय नार्वेकर) इत्यादि पात्रं येत राहतात.
स्वत। पु.लं (यावेळी मनोज जोशी) कथाकथनात आपली जीवनकथा प्रेक्षकांसमोर मांडत आहेत अश्या पध्दतीने कथा पुढे सरकत राहते.
काही दिग्गज अभिनेत्यांचा सुंदर अभिनय, व पात्रांना एका कथानकात गुंफण्याचे कौशल्य या चित्रपटाच्या दोन जमेच्या बाजू.
विशेष लक्षात राहतात ते मोहन आगाशे, सुबोध भावे, आणी संजय नार्वेकर. या तिघांच्या कास्टिंगबद्दल दिग्दर्शकाला (क्षितिज झारापकर) अगदी वरचा सा द्यायला हवा. विशेषत।, पु.लं च्या तोंडून हज्जारदा ऐकलेले चितळे मास्तर मनात कोरलेले असूनही मोहन आगाशे चांगलीच छाप पाडतात. नार्वेकर, ओक, भावेंना या बाबतीत अंमळ अॅडव्हांटेज आहे.
दिलीप प्रभावळकर पण ठीकठाक. प्रशांत दामले अगदीच पाट्या टाकल्यासारखे वावरतात. हरीतात्यांच्या भूमिकेतला अविनाश नार्वेकर मात्र कमालीचा डोक्यात जातो.
कथाविस्तारात जरी सर्व पात्रांना पूर्ण न्याय देणे शक्य नाही हे मान्य केले, तरी काही पात्रं (उदा. भया नागपूरकर, नाथा कामत, पेस्तनकाका) अगदीच उरकल्यासारखी वाटतात. लखू रिसबूड ला देखील कॉलेजाअत दाखवून धमाल करता आली असती.
या प्रकारच्या प्रयोगाला पार्श्वसंगीत उत्तम असणे देखील फार गरजेचे असते. ती बाजू मात्र लंगडी पडली आहे. "इंद्रायणी काठी" व शेवटी येणारे "नाच रे मोरा" ही गाणी मात्र उत्तम जमली आहेत. जयतीर्थ मेवुंडी व मधुरा दातार या गुणी गायकांनी ती गायलीयेत देखील उत्तमच. "इथेच टाका तंबू" या सुंदर गाण्याचे आयटम साँग करण्याची अवदसा दिग्दर्शकाला का सुचली असावी देव जाणे. विनाकारण चित्रपटात आयटम साँग घुसवण्याचे हे पाप अक्षम्यच.
तांत्रिक बाबींबद्दल बोलावेसे चित्रपटात विशेष नाही. काही क्लोज अप्स तर इतके अंगावर येतात, की विचारुन सोय नाही. सतीश शहांच्या खांद्यावर बसून आपण चित्रपट पाहतोय की काय असे वाटते. बाकी काही तुरळक त्रुटी अहेत (म्हातार्या भाईंचा वर्गमित्र बबडू तरणाबांड, वगैरे.)
पु.लं बद्दलचे प्रेम, व चित्रपटाबद्दल कुतुहल वगैरे म्हणून बरेच पु.लं. भक्त हा चित्रपट पाहतील हे नक्की, पण फारश्या अपेक्षा न घेऊन बघायला जाणे हेच उत्तम.
(अवांतर : मराठी लिखाणाची फारशी सवय नसूनही "राजहंसाचे चालणे..." या पु.लं च्या उपदेशास शिरसावंद्य मानून, नव्हे, जीवनविषयक सूत्र मानून, चित्रपट परिचयाचा हा लहानसा प्रयत्न. तेव्हा, शुध्दलेखन, अथवा व्याकरणाच्या चुका झाल्या असल्यास निदर्शनास आणून देणे, ही नम्र विनंती. बाकी मि. पा. वरील दिग्गज लिहितीलच.)
वर्गीकरण
विसर्ग लिहिताना ":" (कोलन)
In reply to विसर्ग लिहिताना ":" (कोलन) by रामपुरी
अरे हो की.. शतशः धन्यवाद,
परीक्षण आवडलं
परीक्षण आवडले
परीक्षण आवडले.
पु.ल. वरच्या कलाक्रुतींची ऊंची.
In reply to पु.ल. वरच्या कलाक्रुतींची ऊंची. by तर्री
@पु.ल. वरच्या कलाक्रुतींची
छान परिक्षण... चित्रपट पाहिला
परिक्षण चांगले झाले आहे...
नक्की बघणार सिनेमा अमोल
छान परीक्षण
In reply to छान परीक्षण by पैसा
मान्य. पण हरीतात्या, बबडू
चित्रपट बघायची इच्छा आहे..
आत्ताच गोळाबेरिज या पिक्चरचे
In reply to आत्ताच गोळाबेरिज या पिक्चरचे by बालगंधर्व
बालगन्धर्व तुम्हाला हे टायपायचे होते ना !!!!
In reply to बालगन्धर्व तुम्हाला हे टायपायचे होते ना !!!! by इरसाल
हो मी तुम्हाला धन्यवाद देतो
In reply to हो मी तुम्हाला धन्यवाद देतो by बालगंधर्व
:-D
In reply to आत्ताच गोळाबेरिज या पिक्चरचे by बालगंधर्व
मुत्का बर्वे ? ?
श्रीरंगा
गोळाबेरीज? बाकी शून्य!!!!
In reply to गोळाबेरीज? बाकी शून्य!!!! by मस्त कलंदर
(माझ्या मते बरयतां हे गोवन
In reply to गोळाबेरीज? बाकी शून्य!!!! by मस्त कलंदर
अगदी पर्फेक्ट बोललात. सदोष
In reply to गोळाबेरीज? बाकी शून्य!!!! by मस्त कलंदर
चालायचेच..
In reply to चालायचेच.. by परिकथेतील राजकुमार
बाकी गोळाबेरीजची गंमत म्हणजे,
या चित्र्पटाने पार पार पर
मला माहिती नव्हतं की असा काही
In reply to मला माहिती नव्हतं की असा काही by पिलीयन रायडर
+१
एकंदर वरील काही प्रतिसाद
In reply to एकंदर वरील काही प्रतिसाद by गणपा
/-/
In reply to /-/ by वपाडाव
तुमच्या पदरच्या त्या दमड्या
In reply to एकंदर वरील काही प्रतिसाद by गणपा
+१
चित्रपट पाहून संताप संताप
In reply to चित्रपट पाहून संताप संताप by अप्रतिम
हा हा हा!!