शुद्ध माडी (फोटोसकट)
लेखनप्रकार
नारळाचे झाड म्हणजे कल्पतरूच. त्याच्या पात्या, खोड, नारळ, त्याचे साल, करवंटी अगदी सगळ्याचाच वापर करता येतो. नारळ पाणी म्हणजे तर अमृतासारखेच. नारळाची उंच ऐटदार झाडे कोकण किनार पट्टीवर दाटीवाटीने मिरवताना दिसतात त्यामुळे कोकण किनारपट्टीवर बर्याच लोकांचे नारळ व नारळाच्या झाडापासून मिळणार्या इतर उत्पन्नांवर उपजीवीका चालते. नारळाच्या झाडाच्या पात्यांतील काड्यांपासून झाडू तयार होतो. झावळ्यांपासून चटई प्रमाणे झाप तयार करतात, नारळाच्या खोडाचा पुलासाठी उपयोग होतो. ही सगळी माहीती आपण अभ्यासक्रमात शिकतच असतो. पण नारळाच्या झाडापासून अजुन एक उत्पन्न्/पेय निघते ते म्हणजे माडी.
गेल्या मे महिन्यात आम्ही मुरुडला हवापालट करण्यासाठी गेलो होतो. मुरुडच्या समुद्रकिनार्यावर गाडीतून उतरलो. मुरुडच्या किनार्यावर असणार्या सगळ्याच हॉटेल्स्/वस्तीगृहांभोवती अगदी उंच उ ऐटदार नारळाची झाडे तोर्यात मिरवत आहेत. माझी नजर नेहमीच अशा झाडापानांकडे असल्याने मान उंचावल्या उंचावल्या मला नारळाच्या झाडावर बुजगावण्याप्रमाणे मडकी लटकलेली दिसली आणि प्रचंड गंमत वाटली.
माडी काढतात हे माहीत होते पण प्रत्यक्ष पाहण्याचा कधी योग आला नव्हता. माझ्या कॅमेर्याने मला लगेच हिंट दिली आणि आता ह्याची प्रक्रिया जाणूनच घ्यायची हे मनाशी ठरविले. पतीराजांना मनीची इच्छा प्रकट केली कारण त्यांची मदत लागणारच होती. आम्हाला जे हॉटेल मिळाले त्या मालकाला माडी बद्दल विचारले. त्याच्याकडून आनंदाची बातमी मिळाली ती म्हणजे सकाळी ७ ला माडी काढायला माणूस येतो तेंव्हा तुम्हाला प्रत्यक्ष पहायला मिळेल. माझा आनंद द्विगूणीत झाला आणि झोपतानाही मला समुद्र किनारी जाण्यापेक्षा माडी उतरवताना पहायला जायच आहे हा विचार मनात रेंगाळत होता.
सकाळी लवकरच उठून ६.३० वाजताच मिस्टर व माझी श्रावणी मिळून आम्ही बाहेर पडलो. रस्त्यावरचा मस्त गरम चहा आणि बिस्कीट असा किनार्यावर बसुन नाश्ता करत माडी उतरवणार्या माणसाची वाट पाहत बसलो. काही वेळातच हातात कोयता, कमरेला प्लॅस्टीकची कळशी बांधलेला माणूस त्या हॉटेलच्या आवारात आला आणि कुठेही न पाहता झप झप सरळ नारळाच्या झाडावर चढू लागला. माझी कॅमेरा काढण्याची घाई उडाली. कॅमेरा ऑन करे पर्यंत तो झाडाच्या शेंड्यावर चढला.
झाडावर लावलेल मडक काढल, त्यात साठलेल द्रव त्याने कळशीत काढल.
परत ते मडक दुसर्या ठिकाणी काहीतरी कापून वगैरे लावल आणि झपाझप परत खाली आला. मग माझ्या मिस्टरांनी त्याला सांगितले की आम्हाला ह्या माडीची माहीती हवी आहे कशी काढतात ती. मी झपाझप दिसतील ते फोटो काढतच होते. तो खुष झाला. असे पर्यटक कदाचीत त्याला क्वचीतच भेटत असतील. त्याने आमच्यासाठी त्याच्या मोलमजुरीच्या वेळेतला थोडा वेळ दिला आणि माडी तयार करण्याची पुर्ण प्रक्रिया सांगितली.
माडी तयार करण्यासाठी लागणारे काही साहित्य :
कोयता -चांगला धारदार असतो.
मडके - हे वर टांगण्यासाठी मातीचेच असते.
सांबर शिंग किंवा मजबूत काठी - सांबार प्राण्याची शिंग भरपुर टणक असते.
काटेसावरीचा कोंब - काटेसावरीच्या झाडाचा कोवळया फांदीचा सोललेला कोंब. हा खाताही येतो. त्याने मला त्यातील थोडा तुकडा खायलाही दिला. तशी काही विशेष चव नसते. पण ह्याला चिकटपणा असतो.
दोरी - पोय गुंडाळण्यासाठी
कळशी - माडी उतरवण्यासाठी
माड बाजला म्हणजे त्याच्या फुलांचा कोंब यायला लागला की माडी काढायची सुरुवात करता येते. माडीसाठी मडके शक्यतो संध्याकाळी लावतात. फुलोर्याचा जो कोंब असतो त्याला पोय म्हणतात.
ती पोय तयार झाली की पोय उघडू नये म्हणजे फुलू नये म्हणून तिला दोरीने घट्ट बांधण्यात येते. त्याच्या टोकाला कोयत्याने आडवी चिर देऊन टोकाकडचा भाग खालच्या दिशेने निमुळत्या आकारात कापला जातो जेणेकरून द्रव खालच्या बाजूला पाझरेल.
असे कापल्यावर त्या पोयवर सांबर शिंगने ठोकले जाते. त्यानंतर सावरीचा चिकट बोंड कापलेल्या भागावर फिरवतात. त्यामुळे पोयीतून माडीचा फवारा न उडता खालच्या दिशेने गळून मडक्यात पडते.
मग मडक्याचे तोंड पोयच्या टोकाला लाऊन मडके पोयला टांगले जाते. त्यामुळे रात्रभर माडाच्या पोयीतून माडीचा होणारा स्त्राव मडक्यात जमा होत असतो.
सकाळी सुर्योदय झाल्यावर माडी काढणारा व्यक्ती आपल्या कमरेला एक कळशी बांधतो. नारळावर चढून म़डक्यात जमलेली माडी आपल्या कळशीत ओततो. मडके बाजूला कुठेतरी अडकवून पुन्हा त्याच पोयला थोडी टोकाला चिर देतो, सांबर शिंगने ठोकतो, सावरीचे बोंड घासतो व मडके पुन्हा लावून ठेवतो. फक्त पुन्हा बांधण्याची गरज नसते. ही प्रक्रिया पोयीतून माडीचा स्त्राव होईपर्यंत म्हणजे जवळ जवळ एक महीना एका पोगीमार्फत चालू राहते.
ही पोगी संपत आली आहे तरी अजुन प्रक्रिया चालू आहे.
माडी काढणारा लगेच झपाझप नारळाच्या झाडावरून खाली येतो. जवळ जवळ अर्धी कळशी भरलेली माडी बाटल्यांमध्ये किंवा दुसर्या भांड्यामध्ये टाकुन पुन्हा सरसर दुसर्या माडावार तिच प्रक्रिया करण्यासाठी चढतो. ही प्रक्रिया दिवसातून तिन वेळाही करता येते असे म्हणतात.
ही माडी नंतर कोणाची पर्सनल ऑर्डर असेल तर त्यांना दिली जाते नाहीतर माडी विक्री केंद्रावर नेली जाते.
माडीबद्दल असा समज आहे की माडीने नशा चढते. पण ही समज चुकीची आहे. शुद्ध माडीने कधीच नशा चढत नाही उलट ती शित गुणाची असल्याने आरोग्यदायी असते. माडीला काही धंदेवाईक लोक नशा आणतात. त्यात चुना तसेच इतर नशेचे पदार्थ टाकून तिला मादक बनवतात. शुद्ध माडी मात्र गोड, साधारण ताडगोळ्याच्या पाण्यासारखी व आंबूस लागते. जर ही माडी अजुन ४-५ तास ठेवली तर मात्र त्याला गॅस चढायला सुरुवात होते. म्हणून झाडावरून काढल्यावर लगेच प्यावी.
माडाप्रमाणेच ताडाची ताडी, शिंदीची निरा काढली जाते. माडीमुळे कोकण किनारपट्टीच्या रहिवाश्यांना उद्योगाचे साधन मिळाले आहे. मुरुडला जागोजागी परवान्याची माडी विक्री केंद्रे आहेत. माडी काढणारा प्रत्येक माडाचे साधारण २५ रुपये घेतो. त्यालाही उपजीवीकेचे साधन मिळते. शिवाय माडाच्या मालकाला माडी विकून उत्पन्न मिळते. पण माडी काढल्यामुळे नारळाला नारळ मात्र लागत नाहीत. नारळाच्या उत्पादनासाठी वेगळी नारळाची झाडे शिल्लक ठेवावी लागतात.
एकंदर देवाची करणी आणि नारळात पाणी त्याही आधी देवाची करणी आणि पोय मध्ये पाणी म्हणायला हरकत नाही.

वाचने
21956
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
मस्त माहिती.. पण माडी नशीली
In reply to मस्त माहिती.. पण माडी नशीली by गवि
+१

माडी बद्दल मीच सांगु शकतो.
In reply to माडी बद्दल मीच सांगु शकतो. by संतोष दिवाडकर
लिव्हा की... मग.
गवि माझ कन्फ्युजन आता अजुन
In reply to गवि माझ कन्फ्युजन आता अजुन by जागु
नीरा ही एक जनरल टर्म आहे.
__/\__
जागुताई माहिती उत्तम. पण गवि
काव्यप्रेमी इरसाल धन्यवात.
जागुताई :)
मस्त माहिती ... आवडली
दिसले एकदाचे फोटो
मस्त माहिती जागुतै....
मस्त माहिती! अवांतर : आता
गावाला फेरी मारुन आल्या सारख
जागु ताई यांनी त्यांच्या
In reply to जागु ताई यांनी त्यांच्या by शुचि
नीरा मलाही आवडते. पण त्यांचे
In reply to नीरा मलाही आवडते. पण त्यांचे by रेवती
आता पुढच्यावेळेस मी घरून
In reply to आता पुढच्यावेळेस मी घरून by पक पक पक
याऽबया! हाटिलात ताट वाटी? आन्
In reply to याऽबया! हाटिलात ताट वाटी? आन् by रेवती
आज्जे,
जागुतै ,हा अनुभव मुरुड्लाच
In reply to जागुतै ,हा अनुभव मुरुड्लाच by पक पक पक
प्रतीसादात चुकुन माडी च्या
In reply to प्रतीसादात चुकुन माडी च्या by पक पक पक
ता चा मा केलाय.
In reply to ता चा मा केलाय. by रेवती
ता चा मा केलाय. केला नाय
In reply to ता चा मा केलाय. केला नाय by पक पक पक
पक*३ जी, मी तो दुरुस्त केलाय
In reply to पक*३ जी, मी तो दुरुस्त केलाय by रेवती
अरे हो खरच कि.....धन्यवाद
छानच. पण...
व्वा...व्वा....आज जागु
मस्त माहिती जागुतै नीरा एकदा
मस्त माहिती आणि फोटोहि सुंदर.
सौदागर, शलभ इ.
छान सचित्र माहिती!
वा... रसाळ धागा ! मी नीरा
सगळ्यांचे मजेशीर अनुभव आणि
सुरेख लेख..! लेख व
केरळात
जबर्या !