मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गीतगुंजन - १४ : I Don't Wanna Miss A Thing -> Aerosmith

प्रास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हे गाणं लिहिलंय 'डायान वॉरन' हिने. अनेक अ‍ॅकॅडमी अवॉर्ड्स, गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स आणि ग्रॅमी अवॉर्ड्स नॉमिनेशन्स मिळवलेल्या आणि त्यापैकी गोल्डन ग्लोब आणि ग्रॅमी जिंकलेल्या या गीतकर्तीनं 'आर्मागेडॉन' नावाच्या चित्रपटासाठी हे गाणं लिहिलेलं.
डायान वॉरन
पृथ्वीवर धुमकेतूच्या माध्यमातून मोठे अशनीचे तुकडे आपटून ती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाल्यावर त्या धूमकेतूला अंतराळातच अणुबाँबने नष्ट करण्याची योजना आखली जाते आणि त्यासाठी धूमकेतुच्या पृष्ठभागावर भोक पाडण्यासाठी समुद्रामध्ये तळाशी तेलासाठी खोदकाम करणार्‍या एका धाडसी माणसावर ही जवाबदारी टाकण्यात येते. या माणसाची मुलगी त्याच्या सहकार्‍यावरच प्रेम करत असते. तिचे वडिल आणि प्रियकर दोघेही या मोहिमेवर जातात आणि त्यांच्यापैकी कदाचित कोणीही परत येऊ शकणार नाही याची सर्वांनाच जाणीव असते. या परिस्थितीत त्यांच्या भावविश्वासंबंधी सदर गाणं लिहिलं गेलं आहे.
आधी हे गाणं 'यू २' नावाचा ग्रूप सादर करणार होता पण काही अपरिहार्य कारणामुळे ते शक्य न झाल्याने त्याचं सादरीकरण 'एरोस्मिथ'ने केलं. या चित्रपटाची नायिका 'एरोस्मिथ'चा लीड सिंगर स्टीव्ह टायलरची मुलगी लिव्ह टायलर आहे आणि गाण्यात एका वडिलांचं आपल्या मुलीवरचं प्रेम दाखवणारं गीतलेखन असल्याने एकूणच या गाण्याला एक निराळं परिमाण मिळाल्यासारखं झालेलं आहे.
स्टीव्ह टायलर आणि एरोस्मिथनी हे गाणं जबरदस्त सादर केलं आहे. पदार्पणातच हे अमेरीकेत बिलबॉर्ड काऊण्टडाऊनमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलं. 'एरोस्मिथ'चं २८ वर्षांनंतर गाणं टॉप १० मध्ये आलं. जगभरात अनेक देशांमध्ये हे अनेक आठवडे टॉपवर राहिलं होतं. या हार्ड रॉक गाण्याचा आनंद घ्या.....
हे गीत - I could lie awake just to hear you breathing Watch you smile while you are sleeping Well you're far away dreaming I could spend my life in this sweet surrender And just stay here lost in this moment forever Well, every moment spent with you Is a moment I treasure [Chorus] I don't wanna close my eyes I don't wanna fall asleep 'Cause I'd miss you, babe And I don't wanna miss a thing 'Cause even when I dream of you The sweetest dream will never do I'd still miss you, babe And I don't wanna miss a thing Lying close to you Feeling your heart beating And I'm wondering what you're dreaming Wondering if it's me you're seeing Then I kiss your eyes and thank God we're together And I just wanna stay with you Just stay in this moment forever, forever and ever [Chorus] I don't wanna miss one smile I don't wanna miss one kiss Well, I just wanna be with you Right here with you, just like this I just wanna hold you close Feel your heart so close to mine And stay here in this moment For all the rest of time [Chorus: x2] Don't wanna close my eyes Don't wanna fall asleep, yeah I don't wanna miss a thing गीतगुंजन १३ आणि गीतगुंजन १२ (छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

वाचने 3092 वाचनखूण प्रतिक्रिया 4

गवि Mon, 02/06/2012 - 14:28
वा.. मस्त परिचय. एरोस्मिथला या मालिकेत घेऊन तू खर्‍या अर्थाने व्हर्सटाईल केलीस ही मालिका.. :) लिव्हिंग ऑन द एज, क्राइन्' , अमेझिंग वगैरे गाण्यातून एरोस्मिथने पुढे आणलेल्या कोवळ्या षोडशवर्षीय गुलाबी गोड गोड अ‍ॅलिशिया सिल्व्हरस्टोनला विसरु म्हटलं तरी विसरता येत नाही. अमेझिंग, क्राइन्' वगैरेचे ते कानशिलं गरम करणारे व्हिडीओ कॉलेजच्या वयात पाहिलेले.. जबरदस्त बोल्ड आणि निव्वळ अविस्मरणीय.. ह्म्म.... विशेषतः पुलावरुन उडी मारल्यावर लटकताना तिची ही अदा.. हाय.. जियो..

वपाडाव Mon, 02/06/2012 - 20:51
एरोस्मिथचं हे एक गाणं आपल्याला लै आवडतं... त्याचे शब्द भयानक भारी आहेत... एकुणच एकदा ऐकुन बघा... http://www.youtube.com/watch?v=z3pTwIiz_jM वि.सु = हा व्हिडो चुकला असेल तर सांच्याला बदलुन नवा अपलोडवतो. कुणी उपप्रतिसाद देउ नका प्लीज.