उफ़्फ़... ये गालिब - १
गालिब हे एक अजब रसायन होते, खुप थोड्या शब्दात खुप काही सांगून जायचा. वयाच्या अकराव्या वर्षापासून गालिबने लिहायला सुरवात केली. त्याच्या शायरीची मुळ भाषा उर्दु, पण घरामध्ये पर्शियन आणि फारसीही बोलली जायची, त्यामुळे त्या भाषांचाही प्रभाव त्याच्या शायरीवर दिसतो. आज त्याच्या सर्व भाषांमधील शायरीचे जवळपास सर्व अशियायी भाषांमधले भाषांतर उपलब्ध आहे. इंग्रजीमध्ये तर विपुल प्रमाणात लिहीले गेले आहे. आणि त्याचे कारण अगदी स्पष्ट आहे. गालिबच्या रचनांशी प्रत्येकजण कुठुन ना कुठुन जोडला जातो. त्याची शायरी फक्त प्रेम या विषयावर नाहीये, तर तत्त्वज्ञान, रोजच्या जिवनात येणारे साधे साधे प्रसंग आणि अगदी भावभावनांचा कल्लोळ यावरही त्याची शायरी तेवढीच प्रभावी आहे.
विरहात जळणार्या प्रेमविराची कैफियत मांडणे हि तर गालिबची खास हातोटी. हा एक शेर पहा:
(क्रमशः)
वो फिराक़ और वो विसाल कहाँ | वो शब-ओ-रोज-ओ-माह-ओ-साल कहाँ ||फिराक़ म्हणजे फारकत, विसाल म्हणजे मिलन. गालिब म्हणतो, आता ते भेटणे नाही, दुरावणे नाही, त्यामुळे विरहाची गोड हुरहुर पण नाही, मिलनाची मस्ती नाही, आता ते ना दिवस राहिले, ना रात्र, ना महिने, ना वर्ष. म्हणजे संपूर्ण फारकत झाली आहे आणि आता परत मिलन होण्याची शक्यताही दुरावली आहे. स्व:ताबद्दल त्याने काही दोन-चार शेर असे लिहीले आहेत कि, त्याचे व्यक्तिमत्व एकदम नजरेसमोर उभे राहते:
है और भी दुनियामें सुखनवर बहोत अच्छे | कहते है के गालिब का है अंदाज-ए-बयाँ और ||हा शेर माहित नसलेला शायरीचा दिवाना सापडणे विरळाच!
शायर तो वो बहोत अच्छा है | पर बदनाम बहोत है ||इतक्या बेधडकपणे तो स्वःताला व्यक्त करतो. त्याचे समकालिन त्याच्याबद्दल काय बोलत होते हे त्याला माहित होते पण त्याला त्याची फारशी पर्वा नसे. खालच्या शेर मध्ये तो फार मार्मीक विधान करतो:
"गालिब" बुरा ना मान जो वाईज बुरा कहे | ऐसा भी कोई है के सब अच्छा कहे जिसे ||वाईज म्हणजे सज्जन माणूस. तो ज्या काळात वावरला तो काळ म्हणजे इंग्रजांचा भारतामधला प्रभाव वाढणारा काळ होता. अनेक संस्थाने इंग्रज गिळंकृत करत होते. मोगलशाही जवळ जवळ संपुष्टांत येण्याच्या मार्गावर होती. सगळं काही विकले जात होते. या परिस्थितीने त्याच्यासारखा संवेदनशील कवी अस्वस्थ झाल्याशिवाय कसा राहील?
बस के दुशवार है हर काम का आसॉं होना | आदमी को भी मयस्सर नही इन्साँ होना ||मयस्सर म्हणजे शक्य. आता काहीही होणे शक्य नाही, माणूस माणसाला दुरावत चालला आहे. हि त्याची खास शैली. इंग्रज अत्यंत हुशारीने समाजात फुट पाडत होते आणि हे फार थोड्या लोकांना समजत होते. गालिबला हे सगळे दिसत होते, पण तो फार काही करु शकत नव्हता. त्याची हिच भावना ह्या खालच्या शेरामध्ये उतरली आहे:
फ़िक्र-ए-दुनियाँमे सर खपता हुं | मै कहाँ और ये वबाल कहाँ ||त्याच्या आजुबाजुची परिस्थिती एका झटक्यात नजरेसमोर उभी राहते ती खालच्या रचनेतूनः
बाजी चा-ए-अतफाल है दुनिया मेरे आगे | होता है शब-ओ-रोज तमाशा मेरे आगे ||चा-ए-अतफाल म्हणजे लहान मुलांच्या खेळण्याचे मैदान, तर हे सारे जग माझ्यासमोर लहान मुलांच्या खेळण्याचे मैदान आहे आणि रोज माझ्या समोर त्यावर नविन नविन खेळ होत असतात. त्याच्या काही काही रचना तर पार आरपार निघून जातात. ये ना हमारी किस्मत कि विसाल-ए-यार होता, हजारो ख्वाहिशे ऐसी, घर जब बना लिया तेरे दर पर कहे बिगर, हर एक बात पे कहते हो तु कि , तू क्या है अशा काही रचना तर सर्वश्रुत आहेत. ह्या रचना तर वेड लावतातच. पण इतर काही रचना ज्यांनी मला वेड लावले. त्यातल्या काही इथे देतो:
फिर कुछ इस दिल को बेक़रारी है | सीना झोया-ए-जख्म-ए-कारी है ||झोया म्हणजे मागणारा, याचक आणि जख्म-ए-कारी म्हणजे खोल जखम. आज परत या हृदयात खळबळ चालू झाली आहे. परत एकदा माझी छाती एक नविन जखम मागतेय. हा झाला शब्दाशः अर्थ. पण जरा विचार केला तर त्याच्या खाली दडलेला अर्थ असा होतो, कि या गझलेतील नायकाला आता जखमांची, दु:खाची इतकी सवय झाली आहे, कि एखादा दिवस तसं काही झाले नाही तर त्याला "बेक़रारी" होते. काय जिवघेणा प्रकार आहे हा!! हिच भावना त्याने आपल्या एका दुसर्या रचनेत पण मांडली आहे, तितक्याच प्रभावी पद्धतीने:
रंजसे खुगर हुआँ इन्साँ, तो मिट जाता है रंज | मुश्किले मुझपर पडी इतनी कि आसाँ हो गयी ||रंज म्हणजे दु:ख आणि खुगर म्हणजे सवयीचे होणे. आता या शेराचा अर्थ देण्याची काही गरज आहे असे मला वाटत नाही. अशीच अजुन एक रचना पहा:
फिर जिगर खोदाने लगा नाखून | आमद-ए-फस्ल-ए-लालाकारी है ||आमद म्हणजे येण्याची सुचना आणि फस्ल म्हणजे सुगीचा काळ. परत एकदा माझी नखे शिवशिवतायेत, हृदयात झालेल्या खोल जखमांवर जी खपली येत होती ती खपली कुरतडून काढायला. बहुतेक सुगीचा काळ जवळ आला आहे. आता हि सुगी म्हणजे काही आनंदाची चाहुल नाही, तर नव्या जखमा होण्याची सुगी. किती भयंकर आहे हे सगळे, पण हे खुप थोड्या शब्दात गालिब सांगून मोकळा होतो. गालिबच्या प्रत्येक रचनेमध्ये त्याच्या किंवा त्याच्या आजुबाजुच्या परिस्थितीचे यथार्थ वर्णन दिसून येते. आणि त्याची प्रत्येक रचना कुठे ना कुठेतरी आपल्याही जिवनाशी नाते सांगते. म्हणूनच त्या आपल्याला जवळच्या वाटतात, मनाला भिडतात. कुठल्याही साहित्यीक रचनेचे हेच यश असते. जर ती रचना जास्तित जास्त लोकांच्या मनातील भावना व्यक्त करु शकली तर तिचे यश नक्की असते. आणि अशा रचनांना लोक डोक्यावर घेतल्याशिवाय कसे राहतील? गालिबच्या अश्याच अजुन २ शेरांची मला झालेली अनुभुती इथे देत आहे:
| २. त्या गल्लीतले हे शेवटचे घर.. मोडकळीस आलेले.. पण चिवटपणे उभे असलेले अंगणातला मोगरा मात्र सदा बहरलेला कोणासाठी? कुणास ठाऊक! फुलांचा सडा ओजंळीत भरून घ्यायला ती नव्हतीच तिथे.. ती तर कधीच निघून गेली होती दुर, खुप दुर.... कधीही परत न येण्यासाठी . थी वो एक शख्स के तस्सव्वुर से अब वो रानाँ-ए-खयाल कहाँ . उफ़्फ़... ये गालिब! | ३. उणीपुरी २० वर्षे लोटली आता इतक्या वर्षाने झालेली ती भेट . आधी ओळखच देणार नव्हतो पण नाही जमले . खुप बदल झाला आहे तुझ्यात पण डोळ्यांची धार अजुनही तशीच आहे बरेच काही विचारणार होतो... मग म्हटले जाऊ दे . खरे तर तू माझ्या डोळ्यात अगदी आत आत उतरुन अशी काही बघत होतीस कि... . जला है जिस्म जहाँ, दिल भी जल गया होगा खुरेदते हो जो अब राख, जुस्तजू क्या है? . उफ़्फ़ ये गालिब!! |
वाचने
9464
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
दमदार! क्वालिटी
शब्दशब्दाशी सहमत...
In reply to दमदार! क्वालिटी by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to शब्दशब्दाशी सहमत... by वपाडाव
परत परत वाचण्यासारखे आहे.....
मस्त
मिकाभाऊ,
अप्रतिम... हा भाग देखील
सुंदर
मिक्या... मस्त लीव्तोयेस
मस्त!
छान
In reply to मस्त! by पैसा
अप्रतिम...!!!
अरे हे वाचलच नाही!
In reply to अप्रतिम...!!! by फिझा
एकदम मस्त!! फक्त वाचतच
अरे वा झकास एकदम..!!
मस्त झालंय वाचत रहावं असं
उत्तम मांडणी. शेर देताना
!
सर्व च्या सर्व आवडले .. मागील
अप्रतिम भाग!!! शेवटचा शेर
दोन्ही भाग पुन्हा पुन्हा
खुपच भारी !!
सुभानल्लाह...!
मेजवानी आहे रे मिका. अशा
फारसी भाषा हि पर्शियनच आहे
In reply to मेजवानी आहे रे मिका. अशा by गवि
धन्यवाद!
In reply to फारसी भाषा हि पर्शियनच आहे by वाहीदा
वाहिदा आणि मिका, भाषांमधला हा
In reply to धन्यवाद! by मिसळलेला काव्यप्रेमी
मिका च्या मूळ लेखात ही द्विरुक्ती आहे असे वाटते.
In reply to वाहिदा आणि मिका, भाषांमधला हा by बिपिन कार्यकर्ते
ते
In reply to मिका च्या मूळ लेखात ही द्विरुक्ती आहे असे वाटते. by वाहीदा
बोलि
जला है जिस्म जहाँ, दिल भी जल
छान शेर व त्याचे रसग्रहण
सुरेख...
बल्ली मारां
बहोत खुब !
In reply to बल्ली मारां by आनंदी गोपाळ
मस्त च रे मिका !! आवडेश !!
क्लासिक..! पुढील भागांची वाट
गालिब-३ का इंतजार है...