मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शाळा .. .... बरा जमलाय

राजघराणं · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मिलिंद बोकील यांचं 'शाळा' आधी कैक वेळा वाचलं होतं . ज्याम आवडलं होतं... ह्या कादंबरीवर चित्रपट येणार ... येणार असे ऐकत होतो... आज तो आला... फस्ट डे फस्ट शो बघीतला ....... (टीप : या समिक्षेत चित्रपटाचा शेवट समजणार आहे... पण येथे शेवट महत्वाचा नाही, नववीत्ल्या मुलाच्या अनुभव विश्वाचे हे चित्रण आहे. आणी चित्रपटाने मूळ कादंबरी एवढी नसली तरी बर्यापैकी मजल मारली आहे) ही गोष्ट आहे १९७५ ( आणीबाणी फेम ) सालच्या आसपास ९ वीत शिकणार्या मुलाची. त्याचं नाव जोश्या. चौकोनी कुटंब . कारकून बाप , पठडीतली आई आणी मोठी बहीण - तिला तो अंबाबाई म्हणतो. एका खेड्यातली शाळा, आणी कुठल्याही मराठी माध्यमातल्या क तुकडीत असतात तशी डांबरट कार्टी. त्यातल्या चौघा मित्रांचा खास ग्रुप. सुर्या, जोश्या, चित्र्या आणी म्हात्रे. म्हात्रे गुंठा मंत्र्याचा गुंड पोरगा. बाकीही सग्ळ्या पोरांची व्यक्तिमत्वे शेम टू शेम त्यांच्या नावांना साजेशी. म्हत्रेच्या बापाचं एक बिल्डिंग कंट्रक्षन चाललय. शाळेच्या वाटेवर ...... शाळा भरायच्या आधी पोरांची चौकडी तिथे जमते, रोज त्यांचा वात्रट कट्टा जमतो. इचिभना विनोद, अभ्यासाची तुरळक देवाण घेवाण, आणी नवतारुण्यसुलभ मुलींविषयी चर्चा. रोजची शाळा सुरू आहे, शाळेत नवीन मुलगी दाखल होते. शिरोडकर. जोश्याला पंख फुटतात. पोटात कालवाकालव सुरू होते. त्याची झोप उडते. जागेपणी स्वप्ने पडू लागतात. स्प्नाना रंग भरू लागतात. जागेपणी क्रुष्णधवल दिसू लागते. एखाद्या परीसार्खीच दिसते ती त्याला. झालं आता जोश्या आप्ल्या लाइन कडे तिलापन कळू न देता पहातो आहे ( झाकी मारणे) आता जोश्या तिच्यासाठी कायपिन करायला तयार आहे. तिला रागवणर्या बाइला अद्दल घडवायचिय त्याला. अधीच खडूस बाइ... तिच्या तासाला फळ्यावर लिहितो - ' अनुशासन पर्व ' ! बाइ उखड्ते, हेड्मास्त् र फोडून काढ्तो. दोन्ही सुजलेले हात घेउन घरी जातो. आइला वाटतं बापान शाळेत जाउन मास्तरला जाब विचारावा. बाप सरकारी कारकून .... नाही जात. (अवांतर : चित्रपट आणीबाणी कालीन आहे. विनोबांनी सरकारी संताची भूमिका घेत , आणीबाणीचा अनुशासन पर्व म्हणून गौरव केला होता. त्यामुळे विनोबांचे हसेही खूप झाले.) जोश्याला प्रेमानं झपाटलय, तो तिच्यासाठी नवा क्लास लावतोय, नवे शर्ट घालतोय, केस ठीकठाकच ठेवतोय. तिला चिठ्या लिहितोय, मंदिरात भेटायला बोलावतोय. तिच्या घरी जाण्यापर्यंत मजल पोचलिय....तिपण प्रतिसाद देतिय....... एकूण सूर जुळतायत दिस्तय ! जोश्याच्या मनात शाळा आणि शिरोडकरच फक्त. तेव्ह्ड्च त्याच जग. पण खरं जग फार मोठ आहे. विचित्र आहे. तिथं आणीबाणी आहे, त्याविरुद्ध लढ्णारे कॉम्रेड्स आहेत. अनुशासन पर्व असं फळ्यावर लिहिल्याबद्द्ल एका कॉम्रेड्नी जोश्याला चे गुव्हेराचा कप भेट पण दिलाय. पोलीस कॉम्रेड्सना त्रास देतायत. या विचित्र जगात एक व्यक्तीमात्र जोश्याला फार आवडते. बॉंडपट दाखवणारा नर्या मामा. मामा बंडखोर तरूण आहे. त्याला काकूबाई नकोय. बॉबकट ठेवणार्या स्मार्ट ख्रिश्चन मुलीशी लग्न करायचय त्याला. जोश्याला पण कॉम्रेड आणी नर्या मामा सारख बंडखोरीचं वेड आहे. शिरोड्करसाठी पाय्जे तर घर सोडीन, नोकरी करून रात्रशाळेत शिकीन अशा मनस्थीत आहे तो शूर वीर ! आणी एक दिवस .... म्हात्रे ची लाइन केवडा दिसते, जोश्या म्हात्रे ला पेटवतो, विचारून टाक साल्या --- म्हात्रे तर अवलीच , रस्ता आडवतो तिचा आणी विचारतो सरळ, ए लाइन देते का ? ती नाही म्हणते. दुसर्या दिवशी शाळेत लाइन चा बाप हजर. मास्तर म्हात्रे आणी जोश्याला अधी फोडून काढतात. मग घरी पत्र पाठवतात. म्हात्रे चा बाप त्याल साल्टं निघेस्तवर लाथा बुक्क्यानी तुडवतो. इकडे जोश्याच्या घरी - मातोश्रीनी हात टेकले. क़जाग बहीण अंबाबाई टोचून टोचून बोलते. मापं काढते. एव्धेच धंदे शिल्ल्क वगैरे वगरे ..... जोश्याची फाटलिय, मास्तर्चा मार, रेस्टीकेशन ची धमकी, पोलीसात देतो म्हण्तोय केवड्याचा बाप ! ते पण खोटी कंप्लेंट - म्हणे माझ्या मुलीचा हात धरला... इचिभना ! आणी सगळ्यात मोठं टेन्शन ...... शिरोडकर वरर्च्या ईम्प्रेशन्च ! आता ती पण टाळतिय त्याला ....... जोश्याचा कारकून बाप तो काय करणार आता ? तो काय करतो........... ते प्रत्यक्ष रुपेरी पडद्यावरच पहा........ पण कथेचा विषय तो नाहीच ...... ८ बंड्खोर कोम्रेड्स्ना पोलीस पकडून नेतात. नर्यामामा एका काकूबाइशी लग्न करतो. म्हत्रेची हिरोगीरी त्याचा बाप ठेचतो. चौकडीचा कट्टा संपतो .....शिरोड्करच्या वडिलांची बद्ली होते..... ती निघून जाते शाळा सोडून. जाताना जोश्याला भेटत पण नाही. आणी ती अंबाबाई.... चे गुव्हेराच्या कपात अश्रू ढाळ्तीय........... पण ही शोकांतिका नाही, जोश्या मोठा होतोय स्वत। च्या कोशातून बाहेर पड्तोय. त्याला समजतय ... आता दहावीचं भयंकर वर्ष .... म्हात्रे नापास .... शिरोडकर गेली ... मजा संपली .... शाळा संपली पण खरी शाळा वेगळीच आहे... ती आपल्या मनात भरते, परिस्थेतीचे शिक्षक त्यात शिकवतात........ जोश्याच्या व्यक्तिमत्वाची खिडकी उघड्तीय ..... चित्रपट बरा आहे. ज्यांनी शाळा वाचलि नाहिय त्यांना हा चित्रपट नितांतसुंदर अनुभव देउन जाइल यात शंका नाही. ज्यांनी मूळ कादंबरी वाचलिय त्यांचा अपेक्षाभंग होणार नाही हे ही खरेच. पण .. चित्रपटात जोश्या शेवटी रडताना दाखवलाय.. वस्तविक कादंबरीत तसे नाही आणी त्याच्या व्य्क्तीमत्वाशी ते जुळतही नाही. शिवाय शाळा कादंबरीत प्रेम प्रकरण सोडून इतर बर्याच गोष्टी आहेत तेही सिनामात जरा कमीच आलय. उत्तम सिनेमा ... पण शेवट थोडा घसरलाय ... पहा पण एकदा..

वाचने 12929 वाचनखूण प्रतिक्रिया 34

In reply to by मृगनयनी

तुषार काळभोर Sat, 01/21/2012 - 08:07
तितकंच गोड गातेही! १० वर्षांपूर्वी झी (तेव्हाचं अल्फा) मराठी वर सुरताल मध्ये "अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला.." गायची. अजूनही कधीमधी सकाळी पुनःप्रक्षेपणात दिसते.

सुधीर Fri, 01/20/2012 - 23:06
धन्यवाद, ह्या रविवारी प्लान आहे. तेही शाळेतल्याच चौकडींना गोळा करून. कादंबरी आवडलेलीचं, चित्रपट पहाण्याजोगा असेलच अशी खात्री होती. तुम्ही शिक्कामोर्तबच केलंत.

प्राजु Sat, 01/21/2012 - 06:55
हम्म! शाळा वाचून झालंय २ वेळा. चित्रपट बघायची खूप इच्छा आहे. प्रोमोज बघताना अपेक्षाभंग होणार नाही याची खात्री होतीच.. असो.. बघूया कधी मिळतोय बघायला हा सिनेमा.

प्रचेतस Sat, 01/21/2012 - 08:54
कालच आम्ही शाळा बघून आलो. थेटरात जेमतेम १०/१५ जणच होते. जेमतेम पावणेदोन दोन तासाचाच चित्रपट. चित्रपट उत्तमच जमलाय. मूळ कादंबरीलाही बर्‍यापैकी न्याय देतो. चित्रपटाची लांबी थोडी अजून वाढवली असती तर रंगत अजून आली असती. सर्व कलाकारांनी कामे अप्रतिम केली आहेत. अमृता खानविलकरची परांजपेबाई काही क्षण मिरवण्याइतपतच काम आहे. मांजरेकर सर, नरूमामा, सुकडीचा महेश यांची अमिताभ स्टाईल झुलपे मजा आणतात. ७५-७७ सालचा फील उमटवण्यात दिग्दर्शक यशवी ठरला आहे. गावपण छानच उभे केलेय. चित्रपटभर रंगसंगतीचा उत्तम वापर केला आहे. शिरोडकरला 'ए तू इकडे काय करतोस' या आणि अशा संवादांव्यक्तिरिक्त फारसे संवाद वाट्याला आले नाहीत. पण ती आपल्या मुद्राभिनयाद्वारे विलक्षण प्रभाव टाकते. फावड्याचा अभिनयही मस्त. विशेषतः बिबीकरला कानफटताना त्याचा अभिनय लाजवाब. एकंदरीत शाळा प्रत्येकानेच अवश्य बघावा असाच.

In reply to by परिकथेतील राजकुमार

चिंतामणी Sun, 01/22/2012 - 23:34
राजघराण्याने विषय ठेवला आहे. राजकुमारजी काय लिहीतील याची उत्सुकतेने वाट बघत आहे. :) :-) :smile: तुझ्या सवीस्तर परीक्षणाची. तुझ्या आवडत्या कादंबरीवर आधारीत चित्रपट कसा आहे हे तुझ्या कडुन ऐकायची उत्सुकता आहे.

पिंगू Sat, 01/21/2012 - 17:17
आजच शाळा बघून आलो. एकंदरीत चित्रपट छान आहे आणि आवर्जून पाहण्यासारखा आहे. भलेही त्यात केतकी माटेगावकरच्या वाट्याला पुरेसे संवाद नसतील, पण जो मुद्राभिनय तिने केला आहे. त्याला दाद द्यावी तितकी कमीच.. बाकी चौकडी झकास जमून आली आहे. - पिंगू

आत्ताच बघून आलोय! 'शाळा' हा वीकपॉइंट असल्याने ते सगळं डोळ्यासमोर उभं राहिलेलं हरखून बघितलं. शिरोडकर, जोश्या, सुर्‍या, फावड्या, चित्र्या, अंबाबाई ... सगळंच कास्टिंग पर्फेक्ट. अर्धं पब्लिकतर 'शिरोडकर'साठी बघायला आलं असेल हा चित्रपट. यातलं एकही पात्र याहून वेगळं असू / दिसू शकत नाही. माझ्या कल्पनेत जे होतं ते सगळं जसंच्या तसं बघितलं. तेवढ्यामुळे पैसे वसूल म्हणायला हरकत नाही. मात्र, काही प्रश्न आहेत. ०१. सिनेमा इतका लहान, फक्त पावणेदोन तासच, का? ०२. अजून लांब असता तर आम्हाला आवडलं नसतं का? ०३. बहुतेक, बालगंधर्व सारखं, मूळ चित्रीकरण अजून खूप असावं पण लांबी कमी करायच्या नादात त्याची डॉक्युमेंटरी का बनवली? ०४. चित्रपटातली खूपशी दृश्यं अजून 'सटल' बनवता आली नसती का? ०५. प्रोमोजमधे जे कलाकार प्रामुख्याने दाखवले गेले, उदा. अमृता खानविलकर, ते चित्रपटात अगदीच नगण्य का झाले आहेत? तरीही, शाळेत गेलेल्या प्रत्येकाने (आणि न गेलेल्यांनीही) हा चित्रपट बघावा'च'. विशेषतः शाळेतल्या /कॉलेजमधल्या मित्रांसमवेत बघाल तर अजून मजा यावी.

खडूस Sun, 01/22/2012 - 00:44
म्हत्रेच्या बापाचं एक बिल्डिंग कंट्रक्षन चाललय. शाळेच्या वाटेवर ...... शाळा भरायच्या आधी पोरांची चौकडी तिथे जमते, रोज त्यांचा वात्रट कट्टा जमतो. इचिभना विनोद, अभ्यासाची तुरळक देवाण घेवाण, आणी नवतारुण्यसुलभ मुलींविषयी चर्चा. रोजची शाळा सुरू आहे, शाळेत नवीन मुलगी दाखल होते. शिरोडकर.
अहो, दाखल होणार्‍या नवीन मुलीचे नाव आंबेकर-शिरोडकर नव्हे

स्वाती दिनेश Sun, 01/22/2012 - 20:38
परिक्षण आणि प्रतिक्रियांनी उत्सुकता वाढली आहे, सिनेमा लवकरच बघायला मिळो ही आशा.. स्वाती

मृत्युन्जय Mon, 01/23/2012 - 10:46
चित्रपट चांगलाच आहे. प्रॉब्लेम हा आहे की तो मूळ पुस्तकाला न्याय देत नाही. मधुबालाचे फोटो बघुन झक्कास असे म्हणावेसे वाटते पण प्रत्यक्ष बघितलेले म्हणतात मधुबाला यापेक्षा कैकपटीने सुंदर होती. चित्रपट बघुन थोडी निराशा होती ती इथेच. त्याशिवायही थोडे कच्चे दुवे आहेत. छोट्या लांबीचे चित्रपट बनवण्याचा सध्या जो ट्रेंड आला आहे त्याच्यात मार खाणार्‍या चित्रपटांमध्ये अजुन एकाची भर पडली असे म्हणेन. नंदु माधव छोट्या भुमिकेत छाप पाडुन जातो पण त्याला वाया घालवला आहे. अमृता खानविलकर फक्त गोरे पोट दाखवण्याची कामी आली आहे. तिच्या ऐवजी दुसरी कोणीही असली असती तरे चालले असते. तिचा ग्लॅमर कोशंट सुद्धा वाया घालवला आहे. डिटेलिंग मध्ये चित्रपट थोडा मार खातो. मूळ पुस्तक वाचलेल्या लोकांना ते चांगलेच जाणवते. इतरांना कदाचित फक्त शेवट गुंडाळला आहे असे वाटेल. पुस्तकात २ मुख्य परिच्छेद आहेत जे पुस्तकाचा उक्तर्षबिंदु आहेत ( त्यातला एक शेवटचा परिच्छेद आहे). ते इथे वाचता येतील (तेवढीच आमच्या लेखाची झैरात) ;) दोन्ही परिच्छेद वाया घालवले आहेत. एकाची जागा चुकली आहे आणि दुसरा आवरता घेतला आहे. आता जमेच्या बाजू. १. वातावरणनिर्मिती उत्कृष्ट जमली आहे. ७५/७६ सालचा काळ व्यवस्थित टिपला आहे. २. सर्वांचा अभिनय उत्कृष्ट. वैभव मांगलेने अतिशय छोट्या भूमिकेत छान अभिनय केला आहे. नंदू माधवचे ही तेच. दिलीप प्रभावळकरांबद्दल तर बोलायलाच नको. संतोष जुवेकर, जितेंद्र जोशी, देविका दफ्तरदार छाप पाडुन जातात. अंबाबाई (हिचे मूळ नाव नाही माहिती) देखील जमली आहे. पण जोश्या, फावड्या, चित्रे आणि म्हात्रे अफलातून. खासकरुन फावड्या. फावड्याचे पात्र मूळ पुस्तकात जेवढे जमले आहे त्यापेक्षा जास्त ते चित्रपटात जमले आहे. पास - नापासाचे फारसे सोयरसुतक नसलेले, बिन्धास्त पात्र त्या पोराने झ्याक रंगवलय. चित्रे, जोश्या आणि म्हात्रे देखील उत्तम. ३. केतकी माटेगावकर सुंदर दिसते. अतिशय गोड आणी निरागस. तिला १०/१०. अर्थात अभिनयात अजुन थोडी सुधारणा होउ शकते. थोडा तोच तो पणा आहे अभिनयात पण तिने तिच्या पात्राला योग्य न्याय दिला आहे. तिचे हसणे आणि लाजणे तर अत्यंत दिलखेचक. आता वय झाले माझे ;) . शाळेत असलो असतो तर तिच्यावर नक्कीच फिदा झालो असतो :) एकूणात चित्रपट उत्तम आहे पण तो मूळ पुस्तकाला योग्य न्याय देत नाही. पुस्तक वाचले नसेल तर जरुर बघावा. पुस्तक वाचले असेल तरी बघावा पण चित्रपट मूळ पुस्तकाएवढा दर्जेदार नाही हे ध्यानात ठेवावे.

In reply to by मृत्युन्जय

Dhananjay Borgaonkar Mon, 01/23/2012 - 12:37
+५०० मृत्युन्जयशी सहमत आहे. कलाकारांनी काम चांगली केली आहेत पण ....(देवकी पंडीतचा) दिग्दर्शन बकवास आहे. जेवढ पुस्त्क भारी आहे त्याच्या ४०% पण भारी चित्रपट नाहीये. आधी पुस्तक वाचाव आणि मगच चित्रपट पहावा. केतकी माटेगावकर, जितेंद्र जोशी, नंदु माधव यांची काम मस्त झाली आहेत. सुर्‍या (कलाकारच नाव?) पण लय भारी आहे.

In reply to by Dhananjay Borgaonkar

किसन शिंदे Mon, 01/23/2012 - 13:56
पण ....(देवकी पंडीतचा) दिग्दर्शन बकवास आहे.
???? :O तुम्ही नक्की कोणत्या चित्रपटाबद्दल बोलत आहात? कारण "शाळा" या चित्रपटाचा दिग्दर्शक 'सुजय डहाके' आहे आणि देवकी पंडीतने चित्रपट दिग्दर्शित(?) केल्याचं मला तरी आठवत नाहिये.

In reply to by किसन शिंदे

अरे देवकी पंडित सारेगमप वर परीक्षक असताना कितीही चांगले गाणे झाले तरी तारीफ करून शेवटी "पण...." असे म्हणून काहीतरी सुधारणा सुचवायची / चूक काढायची. त्याचा संदर्भ दिला आहे त्यांनी. मला पण हे दोनदा वाचल्यावर कळले.

In reply to by मृत्युन्जय

सुधीर Mon, 01/23/2012 - 13:35
कादंबरीशी तुलना करणं कदाचित योग्य नाही, पण मूळ कादंबरी अप्रतिम आहे. चित्रपटही बरा जमला आहे स्लो वाटतो थोडा (कदाचित श्टोरी म्हौत होती म्हणून असेल). पण इतर बॉडिगार्ड-शॉडिगार्ड छाप च्या मानाने खूपच छान आहे. एवढच खटकलं की सुरूवातीची नावं मराठीत यायला हवी होती. :(

In reply to by मृत्युन्जय

किसन शिंदे Mon, 01/23/2012 - 14:01
फावड्याचे पात्र मूळ पुस्तकात जेवढे जमले आहे त्यापेक्षा जास्त ते चित्रपटात जमले आहे.
सहमत. विशेतः एका दृश्यातला त्याचा सवांद आणि अभिनय भारीच आहे, "आवळा खाताना पोरी बाजुला नसल्या तरी डोळा मारावासा वाटतोय." :D

चिगो Mon, 01/23/2012 - 16:19
हा चित्रपट नक्कीच पहायचा आहे, पण फक्त तेवढ्यासाठी महाराष्ट्रात यायला परवडणार नाही हो.. :-( बाकी "छे ! आपल्याला नाही जमायचं तसलं काही.." वर शिरोडकरने (म्हणजेच केतकीने) जे काही विभ्रम केलेयत ना, तेवढ्यानेच मी खलास झालेलो आहे..

गणेशा Mon, 01/23/2012 - 18:14
शाळा चित्रपट पाहयचा आहेच.. शनिवारी चाललो होतो .. पण जुन्या गावच्या मित्राने फोन करुन आपाण २६ ला जाउया का म्हंटल्यावर आम्ही प्लॅन पुढे ढकलला .. कारण शाळेची मजा एकत्र अनुभवलेले आम्ही ' शाळा' ला जाणार म्हणजे मज्जाज ना ... असाच आनंद तुम्ही ही घ्या असे सांगावेशे वाटत आहे..

साबु Tue, 01/24/2012 - 11:54
माझ्या मते चित्र्याला थोडा डावलला आहे... त्याचे घरगुती प्रोब्लेम ...प्रदर्शनाचा भाग दाखवला नाहीये... स्काउट ट्रीप ची मजा अजून दाखवता आली असती... शालेच्या मधल्या सुट्टीत आणि तास बुडवून त्यांचा बसायचा एक अड्डा असतो (गंगु चे गाणे तिथेच बोलतात) तो तर अजिबात दाखवलेला नाहीये... पण तरीही ..कादंबरीशी तुलना करणं कदाचित योग्य नाही, - असेच म्हणतो... केतकी माटेगावकर (तिच्या आईसारखीच ;)) सुंदर दिसते . आणि खुपच refreshing (मराठि ?) दिसते.