मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझा निबंध.....

मुक्त विहारि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
माझा निबंध..... एकदा वर्गात ऑफ पिरिअड होता. मस्त पुस्तक वाचत होतो....मार्क ट्वेन चे....टोम सायर....बाईनी निबंध दिला.... "मला पंख असते तर" कोण मुंबईला गेला.....कोण हिमालयात गेला...(एक तर पार अमेरिकेत गेला....त्यावेळी अमेरिका दूर होती आणि इंग्लंड जवळ होते..)...तर कोण पक्ष्यान बरोबर गप्पा मारत बसला.... आता पुस्तक वाचावे की, निबंध लिहावा....मग काय पटकन निबंध लिहिला आणि पुस्तक वाचायला लागलो..... बाईनी बघितले कि हे काय...हा मुलगा लिहित का नाही? त्यानी निबंध वाचला आणि सर्व वर्गाला "शंकराचे तांडव नृत्य, महिषासूर मर्दिनीचा त्वेष आणि त्रातीकेचे वाक्तांडव" एकाच वेळी दाखवले..तरी पण राग शांत होईना...मग मला झाशीच्या राणी प्रमाणे (पाठीला न बांधता) खेचत मुख्य शिक्षकान कडे नेले....त्यांनी पण "आग्या वेताळ, गब्बर सिंग, रावण,दुर्योधन, दुशासन" करून दाखवले.....शेवटी शकुनी मामा झाले आणि औरंगझेबा प्रमाणे फर्मान सोडले.....जा आणि बाबाना घेवून ये..... मग काय बाबा आले....त्यांनी पण येण्या पूर्वी "जमदग्नीचा रोल केला" केला....आई तर तिचे माझ्या मनातील "वात्सल्य सिंधू" ह्या प्रतिमेला जोरदार धक्का दिला....भावाने मराठी भाऊ पण दाखवले...(म्हणजे आगीत तेल ओतले) आणि "विश्वास आणि भाऊ" पानिपतात मेले हे सिद्ध केले..... मग बाबा आणि शिक्षक ह्यात तह झाला,,,,कलमे खाली देत आहे... १. माझी पुस्तक वाचन बंदी. २. रोज ४ पाने लिहिणे...... त्याचा सूड मी अजून उगवत आहे......आणि निबंध पण खरा करून दाखवला...... १. रोज मनसोक्त वाचन आणि २. कमीत कमी लिहिणे...... ज्या गोष्टी मुळे हे सर्व झाले , तो निबंध वाचायचा आहे? " मला पंख असते तर मी सगळे जग फुकट बघीन." आणि खर सांगायचे तर आज मी सर्व जग माझ्या कंपनी मुळे फुकट बघत आहे..... तर मंडळी आता मी निरोप घेतो......माझा पत्ता खाली देत आहे......माझ्या ह्या घरात आपले स्वागत आहे...... http://full2dhamaal.wordpress.com सदैव मी.पा. कर (जयंत फाटक उर्फ मुक्त विहारी)

वाचने 6868 वाचनखूण प्रतिक्रिया 17

In reply to by उदय के'सागर

चिरोटा गुरुवार, 01/19/2012 - 15:07
अवो ते sarcastic लिहिलय. पूर्वी म्हणजे जयंत्राव शाळकरी असताना लोक इंग्लंडात जात. अमेरिकेत कमी लोक जात. नंतर उठ्सूठ अमेरिका झाले आणी इंग्लंड 'मागे पडले'! (लहानपणी यार्डली पावडर वापरणारा) चिरोटा

५० फक्त गुरुवार, 01/19/2012 - 14:33
लेख लिहायला सुरुवात करण्यापुर्वी एका बशीत विशेषणं गोळा करुन ठेवली होती काय ओ ? कसं आहे पुलावात काजु आणि लवंगा असाव्यात पण भातापेक्षा कमी. +१ टु अन्या, 'एवढे होऊनसुद्धा तुम्ही इतके लिहिता, ब्लॉग काढता म्हणजे आश्चर्यच म्हणायचे की.'' आणि ते सुद्धा एका दिवसात चार चार पोस्ट ब्लॉगवर. खरंच कमाल आहे. एवढी वर्षे ती दररोज लिहायची राहिलेली चार पानं व्याजासहित लिहिणार की काय एकदम. ? असो, अजुन बहुतेक जपा निरागसता सप्ताह संपलेला नाही इथला, म्हणुन एवढंच.

In reply to by ५० फक्त

किचेन Sun, 01/22/2012 - 19:45
मी जपा निरासागता साप्ताह संपला असे जाहीर करते आणि सर्व मिपाकरांना त्याच्या खास शैलीतले प्रतिसाद द्यावेत असे आवाहान करते.

sagarpdy गुरुवार, 01/19/2012 - 15:59
आमच्या एका वर्गबंधूने 'मित्रास भेट पोहचली असे कळवणारे पत्र' या विषयावर अशीच काहीशी ऐतिहासिक कामगिरी केली होती. शक्यतो आम्ही सर्वांनी टोपी, पेन, शर्ट, चेंडू अशा सामान्य वस्तू भेट म्हणून समजून पत्र लिहिली. पण या महाशयांनी खरच काही औरच भेटवस्तू निवडली - 'कवळी'! एका म्हाताऱ्याने आपल्या एक म्हाताऱ्या मित्राला दिलेली भेट! वर अगदी सुरुवात अशी भेटवस्तू आवडली. छान दिसते आहे. घातल्यानंतर आरशात बघितले कि चेहऱ्यावरील नवीन चमक दिसते. नातेवाईकानीही खूप स्तुती केली. ई. ई. बाईनी जी तासली होती या महाशयांची, कि विचारू नका. [आमचा तार्कीकदृष्ट्या या माणसाला पाठींबा होता, पण बाईंसमोर बोलती बंद !]

In reply to by sagarpdy

गणेशा गुरुवार, 01/19/2012 - 18:21
भेटवस्तू आवडली. छान दिसते आहे. घातल्यानंतर आरशात बघितले कि चेहऱ्यावरील नवीन चमक दिसते. नातेवाईकानीही खूप स्तुती केली. ई. ई.
भरपुर विनोदी .. आवडले