नाती गोची
लेखनप्रकार
"उद्या कुठे आहेस"?
विरार, का ग?
"अरे अनिकेत भाउजींचा साठावा वाढदिवस आहे ना. आमंत्रण आहे".
किती वाजता?
"आठ वाजता. स्पेशल पाणी पुरी चा कार्यक्रम आहे"
येउन पोचतो. पण तु आधी जा.
"गिफ्ट काय घेउ"?
मला माहीत नाही.
"अरे सुचव ना"
घरात एक ग्लेन फिडीच आहे ना. ती देउ.
"शी. साठाव्या वाढदिवसाला दारु"
मग तुला काय आवडते ते दे.
"येताना एक बुके घेउन ये. कार्यक्रमात मिळलेच ना. विकतचा आणु नकोस. तेवढेच वाचले. स्पेशल पाणीपुरी म्हणजे काय रे"?
पाणी पुरीच्या पाण्यात थोडीशी व्होडका आणि लिम्का टाकले की झाली स्पेशल पाणी पुरी. मराठी संस्थळावर एक महान सोकावलेल्या साहित्यीकाच्या लेखावर ही रेसी'पी' मिळाली होती.
"दारु शिवाय काही सुचतच नाही का"?
मला बोलायचे काय काम नाही हा. घरातल्या सर्व बाटल्या तशाच पडून आहेत. आणि वाढदिवस म्हटला की थोडी दंगा मस्स्ती हवीच की. आता चाळीस % सुट. एक% जास्त व्याज आणि इतर सवलती सेलिब्रेट नाही करायच्या का?
"बर बर. वेळेवर ये म्हणजे झाले".
___________________________________________________
अगदी वेळेवर पोचलो.
सर्व अॅडल्ट कारभार होता.
त्या मुळे सर्व जण सोकावले.
मस्त धमाल आली.
पाणी पुरी वर जरा जास्तच उड्या पडल्या.
रात्री अकरा वाजता कार्यक्रमाची सांगता झाली.
अन्याची मुलगी पण निघाली.
नात जागीच होती.
अख्ख्या कार्यक्रमात पोरीने धमाल केली होती.
ती काही घरी जायला तयार होइ ना.
झालेला संवाद खालील प्रमाणे.
"तुला उद्या शाळेला जायचे आहे ना"
नाय. उद्या सुट्टी आहे.
"आज घरी जा. उद्या परत ये"
मी आज तुझ्या बरोबर रहाणार.
तु नसलीस की बाबा रडतील ना.
"बाबा वैइट्ट आहे"
का ग? बाबा रोज रात्री स्टोरी सांगतो. गाणे म्हणुन गाइ गाइ करतो. तो रडेल ना तु नसलीस तर.
बाबा वैइट्ट आहे.
का ग?
आजोबा काल ना बाबा ने मला झोपताना स्टोरी सांगीतली. आणि झोपताना एक पप्पी दिली.
मग आज तु गेली नाहीस त्याला वाईट वाटेल.
बाबा वैइट्ट आहे.
का ग?
काल मला एकच पप्पी दिली. आणी मी झोपल्यावर मम्माला टेन पप्पी देत होता. आणि नंतर ना......
मी लगेच म्युझीक चा वॉल्युम वाढवला आणि पुढचे संभाषण फक्त आजोबा पर्यंत मर्यादित राहीले.
आजोबा वय वर्षे साठ, नात वय वर्षे अडीच.
___________________________________________________
वाचने
9087
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
आयला! इथे तर प्रतिसाद
In reply to आयला! इथे तर प्रतिसाद by बिपिन कार्यकर्ते
+१
अर्र... अगागागा.. केला की
@-आजोबा वय वर्षे साठ, नात वय
बापाला पोत्यात घालायची कामं..
मास्तरचे सगळे लेख 'सेक्स'
In reply to मास्तरचे सगळे लेख 'सेक्स' by प्यारे१
अरे
In reply to मास्तरचे सगळे लेख 'सेक्स' by प्यारे१
मास्तरचे सगळे लेख 'सेक्स'
In reply to मास्तरचे सगळे लेख 'सेक्स' by प्यारे१
नर्मदा
In reply to मास्तरचे सगळे लेख 'सेक्स' by प्यारे१
बाब्या.. कार्टे .... असले
=)) =)) =))
घरात एक ग्लेन फिडीच आहे ना.
अं
In reply to अं by चिरोटा
थॅ़क्स
मास्तरांची स्फुटे वाचून ती
In reply to मास्तरांची स्फुटे वाचून ती by यकु
स्वारी पण या स्फुटात
In reply to स्वारी पण या स्फुटात by गणपा
गणपाशेठ तो
In reply to गणपाशेठ तो by यकु
ह्म्म्म मग तुमची 'लाईन' चुकली
समुपदेशन
सरासरी...
विवाहीत मिपाकर योग्य ती
हायला !
ठ्ठो. संसार म्हणजे तारेवरची
हम्म...
अगायायाया!!
मास्तर लै झाक
स्पेशल पाणीपुरी