कोर्टटिपा..
कोर्टरूम या बॉलिवूडमधल्या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर "कटहरे में खडा रेह के" अनेक भल्याबुर्या लोकांच्या आयुष्याचे फैसले होत असतात. काहीवेळा बाइज्जत बरी तर काहीवेळा मिलॉर्डच्या पेनाचं निब मोडून कांडकं पाडलं जातं.
मुळात सिनेमात असल्याने केस कोर्टात झटपट उभी राहून झरझर चालते..
भिंतीवरची गांधीजी, गांधारी बनून हातात तराजू धरुन ताटकळणारी न्यायदेवता आणि सईदजाफरीछाप न्यायाधीश हे निकाल लावण्यासाठी पूर्ण सक्षम आहेतच.. पण तरीही.. फार्फार सिनेमे डोळ्यांची निरांजने करुन बघितल्यानंतर मला असं वाटलं की बॉलीकोर्टात काम करणारे वकील, न्यायाधीश, साक्षीदार, आणि अगदी गुन्हेगारांनाही जर मीही काही कळकळीच्या सूचना केल्या तर कोर्टाच्या कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी दीर्घकालीन उपयोगाचं ठरेल.
सर्वांना मिळूनच टिपा देतोय.
१. कोर्टात कितीही बारक्या गुन्ह्यात तुम्ही फसलेले असाल तरी "कधीच मात न खाणारा", "गेली अनेक वर्षं एकही केस न हरलेला", "शहरातला एक नंबरचा" असा वकील कधीही घेऊ नये. तो नेहमी हरतो.
२. गेली दहापंधरा वर्षं वकिली सोडलेला भणंग व्यसनी वकील किंवा नव्याने एलेल्बी केलेला तरुण तडफदार देखणा वकील निवडावा. हे जिंकतात.
३. सरकारी वकील घेऊ नये. हे हरण्यासाठी पैसे घेतात.
४. वकील म्हणून जी व्यक्ती निवडाल ती व्यक्ती पूर्वी कधीतरी सध्याच्या खटल्यातील आरोपीच्या कृष्णकृत्यांचा थेट बळी ठरलेली असली तर फार प्राधान्य द्या अशा व्यक्तीला. आरोपीकडून आपल्या तरुण तडफदार वकिलावर किंवा त्याच्या आयाबहिणींवर थेट अत्याचार झालेला नसला तर मग निदान पलीकडच्या पार्टीच्या अजिंक्य वकीलाकडून ज्याच्या वडिलांना बदनाम करुन तुरुंगात पाठवले गेले आहे असा तरुण उत्तम.
वाक्यं कॉम्प्लिकेटेड पडलं असावं. उदाहरणं घेऊन अधिक स्पष्ट करु.
-तुम्ही फिर्यादी आहात.
-प्रलयनाथ या शहरातल्या डॉनवर खटला चालू आहे.
-ठकराल हा शहरातला अजिंक्य वकील आहे. (हा तुम्हाला लाभणार नाही कारण तो प्रलयनाथचा डिफॉल्ट वकील असेल.)
अशा परिस्थितीत तुमच्यासाठी खालील सर्व कँडिडेटस् वकील म्हणून उत्तम आहेत:
अ. प्रलयनाथची स्वभावाने चांगली,भांगेत तुळस अशी मुलगी.
ब. ठकरालची सत्याची बाजू बळकट धरणारी तरुण देखणी वकील पोरगी
क. पंधरा वर्षांपूर्वी ठकरालकडून स्वतःच्या वडिलांची/ बहिणीची केस लढवताना हार खाऊन अज्ञातवासात गेलेला एक दारुडा
ड. प्रलयनाथने बलात्कार केलेली एखादी तरुणी.
यापैकी कोणी एकजण तरी पेशाने वकील असतंच. त्याची काळजी नसावी.
४. सत्यपक्षाच्या वकीलांसाठी एक महत्वाची सूचना. तुमचा साक्षीदार मुंबईतच रहात असला आणि केस मुंबई हायकोर्टात चालू असली तरी कोर्टाला जाण्याचा रस्ता नेहमीच जंगलातून जातो हे लक्षात घ्या. वाटेत निर्मनुष्य घाटही लागत असतात हे लक्षात घेऊन साक्षीदाराला आपल्या विश्वासू अब्दुलचाचांसोबत एकटेच रिक्षाने कोर्टात यायला न सांगता शक्यतो स्वतःबरोबर कोर्टात घेऊन या. कोर्ट दहा वाजता उघडत असेल तर आठापासूनच लोकल ट्रेन किंवा ब्येस्टची बस अशा सार्वजनिक आणि गर्दीने भरलेल्या वाहनाने कोर्टात येऊन वाट पहात बसा. म्हणजे तुमचा साक्षीदार कोर्टात न पोचल्याने "अदालत का वक्त बरबाद" होण्याची किंवा "तारीख पे तारीख" असं भाषण झोडून पाळणा लांबवावा तशी वेळ लांबवण्याची वेळ येणार नाही. शिवाय अब्दुलचाचांचा जीवही वाचेल.
५. सत्यपक्षाच्या वकीलांनो: तुम्ही एक कार्डिअॅक सर्जन अँब्युलन्ससहित आणि सॉर्बिट्रेटच्या गोळ्यांची बाटली इतकी सोय कोर्टमधेच करुन ठेवावी अशी एक सूचना आहे. त्यामुळे आरोपी आणि त्याचे वकील यांना योग्यवेळी येणार्या हृ.वि.झ. वर तातडीने उपाय करता येईल.
६. सत्यपक्षाच्या वकीलांनो: तुम्ही स्वतः जातीने एक रक्ताने लडबडलेलं हत्यार प्लॅस्टिक पिशवीत घालून सोबत बाळगावं. "खुनाचं हत्यार सापडलं आहे मिलॉर्ड.." असं सनसनीखेज विधान करुन उल्लेखित हत्यार वर करुन दाखवल्यास आरोपी किंवा त्याचे दहा वर्षं अजिंक्य असलेले काबिल वकील यांपैकी एकजण घामाने डबडबून "हे हत्यार मी वापरलंच नव्हतं.." असं ओरडून जीभ चावण्याची बरीच शक्यता असते. मग तुम्हाला "दॅट्स ऑल मिलॉर्ड.." म्हणून बसता येईल.
७. सत्यपक्षाच्या साक्षीदारांनो. तुम्ही साक्ष देण्यासाठी कोर्टात पोचाल तेव्हा जबरदस्त खिळखिळ्या आणि काळ्यानिळ्या अवस्थेत असाल. तेव्हा तिथे पोचताक्षणीच कटहर्यात घुसा. झटपट शपथ घ्या आणि आरोपीकडे थेट बोट दाखवून तो दोषी आहे हे पहिलं वाक्यं म्हणा. होतं काय की तुम्ही आलेले असता मरायच्या टेकीला. अशात मग तुम्ही प्रेमाची आणि देशभक्तीची भाषणं आधी करत बसलात तर नेमकं प्रत्यक्ष आरोपीचं नाव घेण्याच्या क्षणीच तुमची दातखीळ बसेल आणि डोळे मिटतील.. मग आरोपी बाइज्जत बरी होईल. एवढा मार खाऊन कोर्टात पोचलात ना? मग ते ठरवलेलं काम पूर्ण करुन टाकत जा.
८. कोर्टातील पोलीसहो: घोंगडी किंवा बुरखा घेऊन कोणालाही कोर्टात बसू देऊ नका. अशी व्यक्ती उपरिनिर्दिष्ट साक्षीदाराच्या सत्यकथनाच्या ऐनक्षणी घोंगडी फेकून देते आणि आत लपवलेल्या पिस्तुलाने साक्षीदाराच्या कपाळी गोळी घालते. आधीच काळजी घ्या. मुंबईतल्या उकाड्यात मरायला घोंगडी लागतेय कशाला?
९. असत्यपक्षाचे साक्षीदारहो.. (भ्रष्ट पोलीस, पैसे खाऊन खोटा मेडिकल रिपोर्ट देणारे डॉक्टर इ.इ.) तुम्ही खोटी साक्ष देताय हे लक्षात ठेवा. अशा वेळी पांचट विनोद आणि ओव्हरअॅक्टिंग कटाक्षाने टाळा. अतिउत्साह हा तर अशावेळी शत्रूच. तुम्हाला सत्यपक्षाचा वकील जेवढा प्रश्न विचारेल तेवढंच उत्तर द्या.. अघळपघळ बोलाल तर शब्दात अडकाल किंवा मग "आपको जो सवाल पूछा जाये, सिर्फ उसीका जवाब दिजीए मिस्टर नारंग." असं कडाडलेलं ऐकून घ्यावं लागेल. शिवाय तुम्ही भ्रष्ट अधिकारी आहात, त्यामुळे तुमची पोरगी सत्यपक्षाला सामील आहे हे आधीच ओळखून ठेवा. ती अवलक्षणी अवलाद तुम्हाला शंभर टक्के तोंडघशी पाडणार.
१०. दोन्ही पक्षांचे वकीलहो: समोरच्या वकीलाच्या तिसर्या किंवा चौथ्या प्रश्नाला "ऑब्जेक्शन" न घेतल्यास फाऊल धरतात. तेव्हा ही वेळ चुकवू नये. काही सुचलं नाही तर "काबिल वकील अॅडव्होकेट ठकराल मेरे विटनेस को गुमराह करने की कोशिश कर रहे है" वगैरे म्हणता येईल.
११. किमान चार ते पाच विरोधी साक्षीदारांच्या साक्षीनंतर आपल्या अशिलाचा चेहरा वितळलेल्या मेणासारखा पडत चालला असला तरी आपण मंद आश्वासक स्मित करत आपल्याला काहीही प्रश्न विचारायचे नाहीत असं म्हणत रहावं. पुरेसा तणाव निर्माण झाल्यावर मग शेवटच्या साक्षीदाराला फाडावा.
सर्वात शेवटचं आणि महत्वाचं. सर्व पार्टीजना जी काही डायलॉगबाजी करायची आहे आणि सामाजिक संदेश द्यायचे आहेत ते कोर्टरुमच्या आत देऊन संपवा. कारण हा "लासचा सीन" असणार आहे. केस जिंकून पुढच्या सीनमधेच हिरो हिरॉईन सार्या जगाला कोलून थेट गाण्यात शिरुन फ्रीझ होणार आहेत. तस्मात कोणताही आशयघन मुद्दा मांडायला मिलॉर्डच्या निकालानंतर अवसर राहणार नाही..
................
वाचने
16780
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
ठ्या....
In reply to ठ्या.... by मन१
+ १
भ न्ना ट!
In reply to भ न्ना ट! by प्रास
सत्यपक्षाच्या वकीलांनो:
In reply to भ न्ना ट! by प्रास
हीहीही !!! भारी लिवलंय हो गवि
कोर्टात कितीही बारक्या
हे हे हे =)) ह,ह.पु वा
आठवणी जाग्या झाल्या...
अ आणि प्र आणि ति आणि म
In reply to अ आणि प्र आणि ति आणि म by यकु
तमाम गवाहों व बयानात के
In reply to तमाम गवाहों व बयानात के by मराठी_माणूस
अहो ममा,
In reply to अहो ममा, by प्रास
http://en.wikipedia.org/wiki/
In reply to http://en.wikipedia.org/wiki/ by मराठी_माणूस
ज्ञानात भर पडली आहे.
In reply to अहो ममा, by प्रास
http://en.wikipedia.org/wiki/
In reply to तमाम गवाहों व बयानात के by मराठी_माणूस
अहो म मा,कादरखान किंवा
In reply to अ आणि प्र आणि ति आणि म by यकु
लंबर एक.
मेरी जंग , दामिनी, सलाखें,
हा हा हा ... प्रचंड भारी
मेलो, मेलो , मेलो माय लॉर्ड
मस्त. :)
खि..खि..खि.. लय म्हणजे लयच
काय समजून धागा उघडला आणि
चायला गवि, तुम्ही टिपा
मस्त.
ठ्ठो..!!!!!! :-D
जबरदस्त हो
गवि, फक्त सेन्चुरी मारलीत.
मस्त..
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
+१
भन्नाट ,लय भारी हसुन हसुन
In reply to भन्नाट ,लय भारी हसुन हसुन by पक पक पक
+१
In reply to +१ by नगरीनिरंजन
>>>फिल्मी इस्पितळांत कसं
ही ही ही. दामिनी पिच्चर आठवत
__/\__
लै भारी गवि, पण साक्षीदाराला
In reply to लै भारी गवि, पण साक्षीदाराला by आनंद
उपाय
अश्याच एका पिच्चरमधे 'मेरे
भयंकर!
हॅ हॅ हॅ हॅ!
खुसखुशीत
अरे वा!
क्रमांक ७ चा सल्ला सगळ्यात
झक्कास...
मेरी जंग---अनिल कपूर- अमरीश
सूक्ष्म निरिक्षण...
हा हा हा हा ...स्सही
सगळी दृश्य अशी डोळ्यासमोर
मी मिसळपाव वर नवखा आहे