पाकिस्तानी चित्रपट भाग १: खुदा के लिये
In reply to उत्तम परीक्षण रे अन्या. हा by प्रचेतस
पण दुर्दैवाने प्रिंट सापडली नाही म्हणून बघू शकलो नव्हतो.तुनळीवर उपलब्ध आहे. तिथुन उतरवुन घ्या. @ यशवंत,
वर दिलेली क्लिप पाहून तरी चित्रपट बिलकुल प्रचारकी वाटत नाही..हाच या चित्रपटातला आवडलेला भाग आहे. अगदी मस्तपणे कथा उलगडत जाते. उगाच उत्कंठा ताणून ठेवायची हा उद्देश राखून भरमसाठ संवाद पेरणी केलेली नाही, अन तरीही उत्कंठा लागून राहते. @ वल्ली,
हा चित्रपट जवळपास ३ वर्षापासून मजकडे आहेनिदान टप्प्याटप्प्याने तरी बघ. रोज एक मिनिट जरी बघितला असतास तरीपण २-३ पारायणे झाली असती की रे तुझी ;)
In reply to मस्त चित्रपट ओळख रे अन्या, पण by ५० फक्त
दहशतवादाची जिथून सुरुवात होते त्यांना कधीच काही चटके बसत नसतील का?खरे आहे. घडणार्या घटना बघुन तेथिल सामान्य लोक जास्त पिचले असतील असे वाटते.
मला त्यातल्या कर्णमधुर अजानही (समजत नसल्या तरीही) फार फार आवडल्या.अगदी अगदी. सुंदर ताना घेतल्यात त्या अजानींमध्ये. @स्मिता.
या चित्रपटाबद्दल आधीही एकदा ऐकलं होतं पण बघायची फारशी इच्छा झाली नाही.अरेरे.पण आता तरी बघा. उर्दू समजत नसेल तर इथल्या काही आयडींची मदत घ्या. @ ५०फक्त
पण हे ही खरंय की एवढा विचार करायला लावणार चित्रपट बघेन की नाही याची शंका वाटते हल्ली.हम्म्म! पण सध्या आपल्याकडे या प्रकारचे चित्रपट निघत नाहीयेत. म्हणून जेंव्हा आपल्याला विचार करावा वाटेल तेंव्हा आपली मानसिक आणि बौद्धिक गरज भागवण्यासाठी तरी या चित्रपटांचा वापर करुन घ्या. @ हंस, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. भारतात या चित्रपटाचा प्रीमिअर झाला होता. नक्की कुठे ते माहित नाही.
In reply to माझी मते by हुप्प्या
प्रत्येक गोष्टीचे धर्माला प्रमाण मानून चांगले वाईट ठरवणे गरजेचे आहे का?तो झाकीर नाइक पण असलंच काहीतरी यंव पुस्तक त्यंव क्लॉज वगैरे सांगतो आणि पब्लिक टाळ्या वाजवतं! बाकी चित्रपट परीक्षण मस्तच रे अन्या!
१. जिहादींच्या तोडीस तोड अमेरिकाही वाईट आहे असा चंग बांधून हा सिनेमा लिहिला आहे का अशी शंका येते. अमेरिकेत असणार्या भावावर तो लुळा पांगळा होईपर्यंत मारहाण वगैरे प्रसंग अतीरंजित वाटतात.एखाद्या चित्रपटात थोडीफार तरी 'Cinematic Liberty' अपेक्षित असते. या ठिकाणी तो विचार करायला हरकत नाही. लोकांना कुठल्याही गोष्टीपासून परावृत्त करायला बागुलबोवाच लागतो. जर लोकांना दहशतवादाचे चटके कसे बसतात हे दाखवायचे असेल तर अशी अतिरंजित दृष्ये दाखवण्यात काही वाईट्/चूक आहे असे वाटत नाही.
नासिरुद्दीनचे प्रचारकी बोलणे. प्रत्येक गोष्टीचे धर्माला प्रमाण मानून चांगले वाईट ठरवणे गरजेचे आहे का?एकतर मला तसेच इतरही काही प्रतिसादकांना नसिरुद्दिनचे बोलणे प्रचारकी वाटले नाही. जर वाटलेच तरी हरकत नसावी. इस्लाम धर्माचे योग्य असे इंटरप्रिटेशन त्यात आहे, जे नक्कीच पुढे यावेसे वाटतेय. दुसरा मुद्दा धर्माला प्रमाण मानण्याचा. जिथे धार्मिक गोष्टीवर खटला अवलंबून आहे तिथे धर्माचाच आधार घ्यावा लागणार ना. मग चुकले काय नेमके? थोडे इतिहासात डोकावलेत तर कळेल की जनरल झिया उल हक यांनी धर्माधारीत शिक्षणव्यवस्थेचा पाया घातला. ते किती अत्यंत लघुदृष्टीने उचललेले पाऊल होते याची जाणीव तिथल्या काही पत्रकारांना आणि शोएब मन्सूर सारख्या लेखकांना होतेय. याच जाणीवेतून खुदा के लिये सारख्या चित्रपटांची निर्मिती होतेय ही खरंतर चांगली गोष्ट म्हणायला हवी. प्रत्येक वेळेस एकाच चष्म्यातून बघणे आपणही सोडायला हवे. नाहीतर चित्रपटातील पंजाब्यात आणि आपल्यात काहीच फरक राहणार नाही.
In reply to प्रचारकी थाट by अन्या दातार
In reply to बरंचसं ठीक! by बिपिन कार्यकर्ते
In reply to बरंचसं ठीक! by बिपिन कार्यकर्ते
In reply to बिपीन अन अन्यास +१००००००००००००००० by वाहीदा
२.अन दुसरा चित्रपट संपण्याआधी चा जेव्हा सरमत त्या मौलवीला सलाम करतो पण मौलवी सलामाचे उत्तर देत नाही अन त्याला निहाळतो सरमत पुढे होऊन नमाजी साठी अझान देतो तर मौलवी त्याच्या माणसाला खुणावून त्याच्यासमोरुन माईक हटवतो व तो माणूस स्वतःही अझान द्यायला लागतो. अझान तीच आहे ण एकाच मस्जीद मधून दोन अझान ऐकायला येतात. म्हणजे हे एक सिविल वॉर (मराठी??) ची सुरवात झाली आहे याचे प्रतिक आहे. (A civil war is a war between organized groups within the same nation state or republic)हा शेवटचा सीन मुद्दामच सांगितला नव्हता. दोन व्यक्तींची एकाच धर्माकडे बघण्याची दृष्टी यात अधोरेखीत केली आहे. प्रतिकात्मक अर्थ बघायचा झाल्यास 'अंतर्विरोध' या प्रकारे बघता येईल. नागरी युद्ध हे जरा विचित्र वाटतेय. तो अर्थ अपेक्षितही नसावा. नसिरुद्दिन शहा यांच्या सीनबद्दल आधीच पुरेशी चर्चा झाली आहे.
In reply to २.अन दुसरा चित्रपट संपण्याआधी by अन्या दातार
In reply to होय अंतर्विरोध' हा अर्थ योग्य आहे by वाहीदा
In reply to बरंचसं ठीक! by बिपिन कार्यकर्ते
जगात मोनोलिथिक असं काहीच नसतं. वेगवेगळे पदर असतात, प्रवाह असतात आणि ते सगळे समजून घेऊन मग मत बनवणं उत्तम.हा मुद्दा अधोरेखीत करण्यासाठी आत्ताच बघितलेला व्हिडीओ इथे देत आहे.
In reply to एक व्हिडीओ by अन्या दातार
In reply to प्रचारकी थाट by अन्या दातार
In reply to हुप्प्या, अंतर्विरोध वगैरे... by मन१
In reply to एक दुरूस्ती : इस्लाममधे तीन by बिपिन कार्यकर्ते
In reply to तीन? by मन१
In reply to इस्लामचे पंथ, मुख्यत्वे तीनच. by बिपिन कार्यकर्ते
In reply to इस्लामचे पंथ, मुख्यत्वे तीनच. by बिपिन कार्यकर्ते
In reply to अवांतर : अलेवी पंथाचे लोक by पुष्करिणी
In reply to हुप्प्या, अंतर्विरोध वगैरे... by मन१
राहता राहिला "अंतर्विरोध"चा उल्लेख. हा अंतर्विरोध इस्लाम मध्ये (किंवा सर्वच धर्मात कमीअधिक फरकाने ) सर्वत्र दिसतोमनोबा, अंतर्विरोधाची बाब ही चित्रपटातील एका घटनेचा परामर्ष घेताना मांडली होती. त्याचा इस्लामशी/इस्लाममधील अंतर्विरोधाशी काहीएक संबंध नाही. माझा हा प्रतिसाद नीट वाचा. वाहिदाने ज्या सीनचा उल्लेख केला त्याची तुलना त्यांनी थेट यादवी/नागरी युद्धाशी केली; जे मला तितकेसे पटले नाही. आणि म्हणून मी अंतर्विरोध ही संज्ञा वापरली.
दर वेळी ज्याने त्याने धार्मिक ग्रंथांचा आधार घेतला तर जिणे कठिण होइल. किंबहुना धार्मिक गोष्टॅएंनाच संदर्भ मानत बसले तर पुढे जाउन काय "शरिया" हाच कायदा म्हणून अंमलात आणणार का असा प्रश्न पडला.हा मुद्दा काही प्रमाणात योग्य आहे, पण जिथे धर्माचा प्रभाव प्रचंड आहे, तिथे धर्माचाच आधार देऊन काही प्रमाणात प्युरिफिकेशन करणे ही पहिली पायरी होऊ शकते. सुधारणा होतच राहतात यावर किमान विश्वास ठेवायला हरकत नसावी.
In reply to हुप्प्या, अंतर्विरोध वगैरे... by मन१
In reply to एक शंका by प्रचेतस
In reply to आपलाच फाय्दा... by मन१
अशा प्रकारच्या चित्रपटासारख्या माध्यमातून प्रातिनिधिक का असेना समाजाचे चित्र उभे राहते, तिथले समाजमन समजण्यास मदत होते. ह्याचा फायदा म्हणजे शांतता काळात समाजाभिसरण होतेअगदी हेच. बाकी आयएसआय ची केजीबी-मोस्सादशी केलेली तुलना बघून डोळे पाणावले ;)
In reply to आपलाच फाय्दा... by मन१
दुसरे म्हणजे समाजाची विचारशैली ओळखीची असेल तर हेरगिरी वगैरे करण्यास थोडिफार का असेना उपयुक्त थरते
इस्राइलची मोस्साद ही जगातील सर्वाधिक प्रभावशाली हेरगिरी करणार्यापै़ई एक आहे, अगदि आय एस आय, सी आय ए, के जीबी असल्या नावांच्याही आधी तिचे नाव घेता येइल. तिथल्या हरेक व्यक्तिला अरेबिक येणे व प्रसंगी अरब भासणे कंपलसरी आहे*!
* काल का परवाच्याच पेपरात बातमी होती की इराण अणुप्रकल्पाचा अत्यंत महत्वाच्या शास्त्रज्ञाची "कुणीतरी" हत्या केली आहे. यथावकाश मोस्साद कडे बोट येणार हे स्पष्टच आहे. असे त्यांचे कित्येक उद्योग सुरुच असतात, बहुतांश कामगिर्यांच्या "बातम्या" होउ न देण्याचे कौशल्य ते दाकह्वतात.हे वाचून माझे पण डोळ्ळे पाणावले बाय द वे मनोबा , आपला अन्या कधी पासून हेर झाला रे ?? त्याची तुलना डायरे़क्ट मोस्साद, आय एस आय, सी आय ए, के जीबी :-? ???? कैच्या कै राव !
In reply to हायला! मनोबा , आपला अन्या हेर कधी पासून झाला रे ;-) by वाहीदा
In reply to हा हा... by मन१
मस्त, वेचक आणि मुद्देसुद!