सर्व रसिक खवय्यांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
२०१२ ची सुरवात एका शाकाहारी पाककृतीने करत आहे. आशा करतो आपल्याला आवडेल.
मध्यपुर्वेत रहाताना तिथल्या पदार्थांनी भुरळ घातली होती. शवरमा (शोरमा), फलाफल, वेगवेगळ्या प्रकारचे कबाब, हमस आदी माझ्या काही आवडत्या डिश.
आज त्या पैकी बाबागनुशची पाककृती आपल्या पुढे घेउन आलो आहे.
खुबुस वा पिट्टा ब्रेड डीप करण्यासाठी बाबा गनुश हे एक प्रकारच डीपिंग आहे.
साहित्य :
एक मोठं किंवा २ माध्यम वांगी.
३ मोठे चमचे ताहिनी. (भाजलेल्या तिळाची तेलात वाटलेली पेस्ट.)
२ लिंबांचा रस.
२-३ पाकळ्या लसूण
चवी नुसार मीठ.
२-३ चमचे ताजं घट्ट दही (ऑपश्नल)
सजावटीसाठी : ओलीव्हचं तेल, ऑलीव्ह, लाल तिखट, कोथिंबीर.
कृती :
वांग्याला काट्याने टोचे मारून वरून तेलाचं बोट फिरवावं.
निखारे असल्यास उत्तम पण नसल्यास शेगडीवर वांगं भाजून घ्यावं.
(ओव्हन मध्येही भाजता येईल पण त्याला खूप वेळ लागतो साधारण ४५-५० मिनिटे.)
भाजलेलं वांगं गार झाल्यावर वरच साल काढून टाकावं आणि काट्या/चमच्याने वांग्याचा गर मोडून घ्यावा.
एका बाऊलमध्ये ताहिनी आणि लिंबाचा रस फेटून घ्यावा. सुरवातीस फेटताना मिश्रण एकदम घट्ट जाणवेल, पण नंतर हलकेपणा जाणवायला लागेल.
नंतर त्यात आवडी नुसार ताजं दही घालून फेटावं.
वांग्याच्या मोडलेल्या गरावर वरील मिश्रण टाकून त्यात चावी नुसार मीठ लाल तिखट टाकून फूड प्रोसेसरमध्ये बारीक वाटून घ्यावं.
साधारण श्रीखंडाची घनता येईल. वाढताना थोडं ओलीव्ह्च तेल टाकून वरून लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी. ऑलीव्ह लावून सजवावं.
खबुस किंवा पिटा ब्रेड सोबत डीपिंग म्हणून सर्व्ह करावं.
वाचने
24219
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
खल्लास!!
ओह माय माय belive me सर ,ही
In reply to खल्लास!! by तुषार काळभोर
मस्त!
भरिताचा भाऊ
In reply to मस्त! by पैसा
+१
In reply to भरिताचा भाऊ by प्रशांत
मस्त!!
२०१२ची सुरवात
नमस्कार, आणि शाकाहारी
जबरदस्त पाकृ. डोळे तृप्त
जबरदस्त
हमस ची कृती इथे पहाता येईल.
In reply to जबरदस्त by अभिजीत राजवाडे
भरिताचा जुळा भाऊ
मस्त रे गणपा !!!!
झकास
व्वा...!
मस्तच...................... अ
मस्त शाकाहारी प.कृ.टाकल्या
ऑलिव्हला काही भारतीय पर्याय
ऑलीव्ह...
In reply to ऑलिव्हला काही भारतीय पर्याय by कवितानागेश
मस्त ! शेवटच डेकोरेशन जरा
एका बाऊलमध्ये बाबा गनुश घेउन
In reply to मस्त ! शेवटच डेकोरेशन जरा by आनंद
मस्त
माझा आवडता पदार्थ!
मस्त..
सजावट
झक्कास
ल्यप ल्यप...
काय हे ?
ढिंच्या़क ढिच्या़क . परवाच
पदार्थ पाहून भयंकर टेसदार
मस्तच पाकृ गणपाभौ अॅस युजुअल
मस्तच पाकृ गणपाभौ अॅस युजुअल
In reply to मस्तच पाकृ गणपाभौ अॅस युजुअल by प्रीत-मोहर
लय यम्मी दिसते .
हाण्ण !
गणपा साहेब मस्त पाकॄ जाम मस्त
एक्गतळ्म क्स्ससेनिवडुन
तुम्हि त्या "मास्टरशेफ
In reply to एक्गतळ्म क्स्ससेनिवडुन by उदय के'सागर
तीळ
मास्तर मी स्वतः ताहिना/नी घरी
In reply to तीळ by विनायक प्रभू
एकटाच मजा मारतोस होय रे ?
धन्यवाद
शाकाहारी पाकृबद्दल मंडळ आभारी
मस्त, चवदार असेलच. करुन बघेन.
बाबा गणपेश,
-^- काय जबरी सजावट आहे.
मस्त !!
बाबा रे बाबा ! २०१२ ची
मस्त रे!!
_/\_
फारच छान
जबरदस्त
गनुश?
मस्त असेल्....पण....