आप के हसीन रुख..
![]() |
वाचने
10623
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
तात्या बॅक अगेन!
हे तर माझे अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक. ओपींची कमाल काय आहे हे दाखवणारे हे एक मास्टरपीस गाणे.
A Perfect harmony असे याचे वर्णन करता येईल.
तात्यांनी दिलेल्या माहितीवरुन ओपींना शास्त्रीय संगीत येत नव्हते यावर विश्वास ठेवणे खरंच मुश्कील आहे. असेच दुसरे गाणे म्हणजे छोटासा बालमा.....
(ओपी - रफी फॅन) अन्या.
In reply to OP.............. by अन्या दातार
तात्यांनी दिलेल्या माहितीवरुन ओपींना शास्त्रीय संगीत येत नव्हते यावर विश्वास ठेवणे खरंच मुश्कील आहे. पण ते स्वतःच तसे सांगत असत म्हणून विश्वास ठेवायचा.
या विषयावर त्यांना पत्रकाराने छेडले होते. त्याने विचारले की "नैयरसाब आप हमेशा कहते है की आपने शास्त्रीय संगीत की तालीम नही ली. फिर मुझे बताओ ये "छोटासा बालमा" जैसी रचना आपने कैसी की?
त्यावर नैयरसाहेब म्हणाले की "मै संगीत बहूत सुनता हूं. आशाजी की पिताजी का एक मशहूर स्टेज साँग है.
मैंने वो सुना है और उसकाही इसेत्माल किया है". ते नाट्य गीत म्हणजे दिनानाथ मंगेशकरांनी म्हणलेले (सं. सन्यस्तखड्ग या नाटकातील स्वा. सावरकर रचीत "सुकतातची जगी या"
(हे गाणे पं. वसंतराव देशपाण्डे यांच्या आवाजात येथे ऐका.)
(हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीताच्या "गोल्डन एरा"चा दिवाणा) चिंतामणी
लेख आवडला...
अवांतर : तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... :)
छान छान ,लेख आवडला.....
वेलकम बॅक.
सध्या तुम्हाला ऑनलाईन असलेले बघत होतो. सकाळी "काहीतरी लिहा" अशी खरड टाकणार होतो. पण नेट रूसले. आणि नंतर कामामुळे ऑनलाईन जमलेच नाही.
नेहमीप्रमाणेच छान.
:) :-) :smile:
(अवांतर- तात्या विलायत खॉं साहेबांचा "यमन" ऐकला असेलच ना?)
(यमनचा दिवाना) चिंतामणी
लै झक्कास हो तात्यानु...! आमला बी ब्लॅक अँड व्हाइट मधला धम्मू त्याच्या निरागस चेहेर्यामुळे नेहेमीच अवडत आलेला आहे... आणी पुढे रंगीन मधे तर काय?त्यानी जी धमाल/कमाल केली त्याला तोड नाही...तो अमचा खराखुरा ही मॅन आहे... नय्यरसाहेब,रफी बरोबरच धरमला बी आमचा सलाम.. :-)
In reply to लै झक्कास हो तात्यानु...! by अत्रुप्त आत्मा
आमला बी ब्लॅक अँड व्हाइट मधला धम्मू त्याच्या निरागस चेहेर्यामुळे नेहेमीच अवडत आलेला आहे...
हा निरागस चेहर्याचा ब्लॅक अँड व्हाइट मधला धम्मू का? ;) ;-) :wink:
हा निरागस चेहर्याचा ब्लॅक अँड व्हाइट मधला धम्मू का? ;) ;-) :wink:
In reply to आमला बी ब्लॅक अँड व्हाइट मधला by चिंतामणी
धम्मू हा शब्द अगदी धन्नोशी मिळताजुळता आहे की. ;)
In reply to हाहाहा... by श्रावण मोडक
मला दीर्घ उकार आहे, धन्नोला काना आणि मात्रा आहे. ;)
-धमायक प्रभु.
In reply to सुधारणा... by धमाल मुलगा
वास्तवात तुला काना-मात्रा आणि धन्नोला उकार हवा. ;)
एकंदरीत गाणं ऐकून तृप्ती होते, जीव शांत होतो.हेच खरे!!
परवाच हे गाणे ऐकले होते. गाण्याबद्दल तात्यांनी लिहिलंय तिथे पुढे मी काय लिहिणार...
रफीसाहेबांना आणि नय्यरसाहेबांना मात्र मानाचा मुजरा..!शब्दाचा गाण्यातला कॉन्टेक्स्ट लक्षात घेवून त्यानुसार त्या शब्दावर हवा तसा जोर देणे आणि तसा मूड आवाजात आणणे हे रफीसाहेबांसारखं क्वचितच कुणाला जमलं असावं.
गाणं आवडीचं आहेच. रफीसारखा गायक अजुनतरी कोणी झाला नाही हे आमचं मत सगळ्यांवर लादु इच्छितो.
मस्त गाण्याची आठवण. धन्यवाद.
हे खरे रोमँटीक गाणे.
दुसर्या कडव्यातील "शबाब आप का " मधील "का" वर घेतलेली मस्त जागा.
कमीत कमी वाद्यात निर्माण केलेला अत्यंत तरल परीणाम. हे गाणे आपल्याला एका वेगळ्याच जगात घेउन जात
(अवांतर : ह्या गाण्याची एक अशीही आठवण वाचलेली. ओपी ने हे गाणे गुरुदत्तला ऐकवले आणि दुसर्या दिवशी तो गुरुदत्तकडे गेला, तिथे घराच्या बाहेर त्याला अब्रार अल्वी भेट्ला , त्याने ओपीला सांगीतले की गुरुदत्त गेला . ओपी म्हणाला "कुठे गेला, कालच तर भेटला होता , तेंव्हा काही म्हणाला नाही , मग कुठे गेला " . जेंव्हा त्याला कळले की गुरुदत्त हे जग सोडुन गेला तेंव्हा त्याला प्रचंड धक्का बसला)
मस्त हो तात्या.....
रफीसाहेबांना आणि नय्यरसाहेबांना मात्र मानाचा मुजरा..!!!
वा तात्या, गाणं तर सुंदरच आणि लेख पण छान.
माला सिन्हा तुम्हाला आवडत नसली तरी तिने या गाण्यात चेहेर्यावरचे भाव चांगले दाखवले आहेत.
तसेच धर्मा मलाही आवडत असला तरी, तो पियानो वाजवताना पोळ्या लाटल्याची अॅक्शन करतोय असे आपले आम्हाला वाटते.
ओ.पी.का जवाब नही!
तो पियानो वाजवताना पोळ्या लाटल्याची अॅक्शन करतोय
हे बाकी खरे आहे.
ऋषीकपूर व्यतरीक्त जवळजवळ सर्वच अभिनेत्यांचे पडद्यावरचे वाद्य वादान हे हास्यास्पदच.
In reply to तो पियानो वाजवताना पोळ्या by मराठी_माणूस
ऋषीकपूर व्यतरीक्त जवळजवळ सर्वच अभिनेत्यांचे पडद्यावरचे वाद्य वादान हे हास्यास्पदच.
या वाक्याला दिलीपकुमार अपवाद आहे. 'कोहिनूर' सिनेमात त्याने सतारीवर फिरवलेली बोटे पहा. त्यासाठी त्याने खास मेहनत घेतली होती.
ति मा - धर्मा पियानो वाजवताना पोळ्या लाटल्यासारखे करतो आहे हे आपले म्हणणे मलाही पटते..
असो..
सर्व प्रतिसादी रसिक वाचकवरांचा मी ऋणी आहे. वाचनमात्रांचेही औपचारीक आभार मानतो..
तात्या.
आणि तितकीच छान ओळख!
अत्यंत तरल. :)
अंजाननं लिहिलेल्या चांगल्या गाण्यापैकी एक.
अर्थात् रफीसाहेब-नय्यरसाहेब हे गणितच मुळात भारी!
त्यात तनुजा आत्यंतिक सुंदर दिसलीये!
धन्यवाद तात्यानु!
राघव

OP..............