दर्शनेच्छा बलियसि!
युगल सरकारIn reply to या असल्या कथानी काय होणार? ही by विजुभाऊ
या असल्या कथानी काय होणार?हरिकथा श्रवण अथवा वाचन हा असल्या कथांचा हेतु आहे. हरिकथा चित्तशुद्धीकर आहे. ज्याची यावर श्रद्धा आहे त्याला चित्तशुद्धीचा फायदा होईल.
ही खरी घटना आहे की सांगोवांगी?ही कथा ब्रजभक्तमाला या संतकथाकोशातली आहे.
या कथेतून नक्की काय बोध घ्यायचा?हरिकथा वाचताना बोध ज्याचा त्याने घ्यायचा आहे.
In reply to या असल्या कथानी काय by हरिकथा
In reply to प्रचंड विचित्र (आणि भंपक) by सेरेपी
राधा कृष्णाहून बरीच मोठी होती असं वाचल्याचं आठवतंकुठे वाचलत? काही सांगाल? संदर्भ वगैरे? बरं मग काय?
असोअसो.
आत्ता एवढंच.तेच बरं आहे.
In reply to धर्माला अफुची गोळी by ५० फक्त
In reply to प्रतिक्रीया चुकीच्या मुद्द्यावर दिलेल्या दिसत आहेत. by चिंतामणी
In reply to राधा हे श्रद्धेचेच एक रूपक. by प्रचेतस
In reply to मला एक सांग की by चिंतामणी
In reply to हो ना. राधा काल्पनिकच आहे. by प्रचेतस
In reply to वरील एका प्रतिसादात मी हेच म्हटले आहे की. by चिंतामणी
In reply to वल्ली, ५० फक्त आणि by हरिकथा
राधा व्यक्ती आहे की रूपक आहे, रुपक आहे की काल्पनिक आहे, काल्पनिक आहे की कृष्णापेक्षा मोठी आहे?प्रतिसाद वाचा त्यात दिलेलेच आहे सर्व. तरी तुम्हास समजले नसेल पुन्हा एकदा सांगतो. राधा हे पूर्णपणे काल्पनिक पात्र असून गीतगोविंद रचनेत कृष्णभक्तीचे एक रूपक म्हणून वापरले आहे. मूळ ग्रंथात त्याचा कुठेही उल्लेख नाही.
आपण दुसर्याच्या मताचा विरोध जरूर करतो पण कधी तिरस्कार करत नाही. पण वरच्या प्रतिक्रिया तसं दर्शवत नाही आहेत.भंपकपणा हा शब्द तुम्हाला तिरस्कारयुक्त का वाटावा? समाजात अंधश्रद्धा पसरवणार्या गोष्टींना भंपकपणा म्हणू नये तर दुसरे काय?
तो आपल्याला समजलेला अर्थच योग्य आणि खरा आहे असं गृहित धरून त्या गोष्टीलाच विचित्र आणि भंपक म्हणून मतप्रदर्शन करू लागतो हे आणखी मोठ्या असहिष्णुत्वाचं द्योतक आहे असं मला वाटतं.नाही. मुळात जो उल्लेख इतिहासात नाहीच आहे ते राधेचं काल्पनिक पात्र मध्ये घुसडून मूळ ऐतिहासिक पात्रांची मोडतोड होतेय असे वाटत नाही का? तुम्ही म्हणतात तसे राधातत्वही त्यात कुठे दिसत नाही त्यात. राधा म्हणजे मोक्ष लाभो (रा-लाभो, धा- मोक्ष . सं-युगंधर, पण त्यातही इतिहासाची थोडीबहुत मोडतोड केलेलीच आहे.) त्याविरुद्ध जरा काही बोलणे म्हणजे असहिष्णुत्वाचं द्योतक कसे काय?
In reply to राधा व्यक्ती आहे की रूपक आहे, by प्रचेतस
प्रतिसाद वाचा त्यात दिलेलेच आहे सर्व. तरी तुम्हास समजले नसेल पुन्हा एकदा सांगतो. राधा हे पूर्णपणे काल्पनिक पात्र असून गीतगोविंद रचनेत कृष्णभक्तीचे एक रूपक म्हणून वापरले आहे. मूळ ग्रंथात त्याचा कुठेही उल्लेख नाही.खरं आहे, मी असं कधीच म्हणत नाही की मला सगळं समजलं आहे. तुम्ही पुन्हा सांगताय म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही म्हणताय की ती काल्पनिक आहे पण कृष्णापेक्षा मोठी आहे. तुम्ही कृष्ण होता हे तरी मानता ना? मग समजा राधा कल्पनिक असेल तर मग ती कृष्णापेक्षा मोठी की लहान याने काय फरक पडतो? राधा गीतगोविंदामध्ये कशाप्रकारे लिहिलीय त्यावरूनच आपण राधातत्त्वं ठरवावं असं कुणी मानायची आवश्यकता नाही. तुम्ही वाचलेल्या मूळ ग्रंथामध्ये राधेचा उल्लेख नाही म्हणून इतरांनी तेच का गृहित धरावं? आता तुम्ही मूळ ग्रंथाबद्दल म्हणतच आहात तर महाभारत, भागवत, हरिवंश यासारखाच गर्ग संहिता हादेखिल मूळ ग्रंथच आहे आणि गर्ग संहितेमध्ये राधेचा उल्लेख विस्ताराने आलेला आहे. आता तुम्ही मानता तेच मूळ ग्रंथ आणि त्याशिवाय इतर ग्रंथ मूळ नाहीत असं असेल तर प्रश्नच मिटला.
समाजात अंधश्रद्धा पसरवणार्या गोष्टींना भंपकपणा म्हणू नये तर दुसरे काय?अंधश्रद्धा पसरवणार्या गोष्टींना जरूर भंपक माना, कोण अडवतंय? पण तुमची तीच श्रद्धा आणि आमची ती अंधश्रद्धाच असं मानूनच काही म्हणणार असाल तर त्या बोलण्याला तिरस्काराचाच वास येईल, हे नक्की!
मुळात जो उल्लेख इतिहासात नाहीच आहे ते राधेचं काल्पनिक पात्र मध्ये घुसडून मूळ ऐतिहासिक पात्रांची मोडतोड होतेय असे वाटत नाही का?कोणत्या इतिहासाबद्दल म्हणताय वल्लीजी? जिथे अयोध्येतला रामजन्म निश्चित करण्यासाठी कोर्ट-कचेर्या कराव्या लागतात आणि ऐतिहासिक दस्तावेज दाखवावे लागतात तशा इतिहासाबद्दल बोलताय? पाच हजार वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींची नोंद नसेल तर त्या अस्तित्त्वात नव्हत्या असं मानणं म्हणजे इतिहास आहे का? इतिहासाचा अभ्यास करत असाल तर केवळ लेखी दस्तावेजांवर अवलंबून राहून चालत नाही हे जाणत असालंच. मौखिक परंपरांनाही ऐतिहासिक महत्त्वं असतं ना? ऐतिहासिक पात्रं आणि त्यामधिल काल्पनिक पात्राचं घुसवणं हे कशावरून? तर एखाद्या पात्राचा उल्लेख सापडत नाही म्हणून, असं म्हणणं म्हणजे वल्लीजी, तुमच्या खापर-खापर पणजोबांचा कुठेही लिखित उल्लेख आढळत नाही आणि त्यांना पाहिलेली कुणीही व्यक्ती नाही म्हणजे ते अस्तित्त्वातच नव्हते असं म्हणण्यासारखं आहे, नाही का?
(रा-लाभो, धा- मोक्ष . सं-युगंधर, पण त्यातही इतिहासाची थोडीबहुत मोडतोड केलेलीच आहे.)हे बाकी तुमच्याकडून समजावून घ्यायला आवडेल. माझी अल्पमति यातलं काही जाणू शकत नाही आहे.
त्याविरुद्ध जरा काही बोलणे म्हणजे असहिष्णुत्वाचं द्योतक कसे काय?विरोध हे असहिष्णुत्व नव्हेच पण तो व्यक्त करताना वापरलेल्या शब्दांमध्ये ठासून भरलेला तिरस्कार हे असहिष्णुत्वाचेच द्योतक आहे.
In reply to वल्लीजी, प्रतिसाद वाचा त्यात by हरिकथा
मग समजा राधा कल्पनिक असेल तर मग ती कृष्णापेक्षा मोठी की लहान याने काय फरक पडतो?काहीच फरक पडत नाही. मी फक्त त्या गीत गोविंद मधल्या उल्लेखाबद्दलच बोलत होतो. मी कृष्ण मानतो पण एक व्यवहारकुशल चतुर राजनितीज्ञ म्हणून. अवतारी, चमत्कारी ही सगळी प्रक्षिप्त मिथके आहेत.
तुम्ही वाचलेल्या मूळ ग्रंथामध्ये राधेचा उल्लेख नाही म्हणून इतरांनी तेच का गृहित धरावं? आता तुम्ही मूळ ग्रंथाबद्दल म्हणतच आहात तर महाभारत, भागवत, हरिवंश यासारखाच गर्ग संहिता हादेखिल मूळ ग्रंथच आहेमूळ ग्रंथ म्हणजे श्रीकृष्णाच्या चरित्राबद्दल जे अधिकृत मानले गेले आहेत ते ग्रंथ. उदा. महाभारत, भागवत, हरिवंश, ब्रह्मवैवर्त. तुम्ही ज्या गर्गसंहितेचा उल्लेख करत आहात ती अगदी अलीकडची. तिला मूळ ग्रंथ असे मानणे म्हणजे शिवाजी सावंतांच्या मृत्यंजयला कर्णाचे अधिकृत चरित्र मानण्यासारखेच. मूळ चरित्रे बाजूस ठेऊन तुम्ही चुकीचीच चरित्रे जर गृहित धरत असाल तर आमचा नाईलाज.
पण तुमची तीच श्रद्धा आणि आमची ती अंधश्रद्धाच असं मानूनच काही म्हणणार असाल तर त्या बोलण्याला तिरस्काराचाच वास येईल, हे नक्की!तिरस्काराचा वास येत असल्यास ते आमचे आम्ही शब्द वापरण्यात चुकलो असे समजा.
पाच हजार वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींची नोंद नसेल तर त्या अस्तित्त्वात नव्हत्या असं मानणं म्हणजे इतिहास आहे का?हो. लिखीत स्वरूपात का होईना पण पुरावा हवाच. राधेची परंपरा अलीकडचीच.
ऐतिहासिक पात्रं आणि त्यामधिल काल्पनिक पात्राचं घुसवणं हे कशावरून? तर एखाद्या पात्राचा उल्लेख सापडत नाही म्हणूनवरील उत्तरच पहा.
तुमच्या खापर-खापर पणजोबांचा कुठेही लिखित उल्लेख आढळत नाही आणि त्यांना पाहिलेली कुणीही व्यक्ती नाही म्हणजे ते अस्तित्त्वातच नव्हते असं म्हणण्यासारखं आहे, नाही कावैयक्तिक प्रश्न. पण आमचे अस्तित्व हाच त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा का मानता येऊ नये?
हे बाकी तुमच्याकडून समजावून घ्यायला आवडेलसंस्कृतमध्ये माझी मातब्बरी नाही हो. राधा म्हणजे मोक्ष लाभो इतकाच अर्थ माझ्याही अल्पमतीला माहित आहे.
विरोध हे असहिष्णुत्व नव्हेच पण तो व्यक्त करताना वापरलेल्या शब्दांमध्ये ठासून भरलेला तिरस्कार हे असहिष्णुत्वाचेच द्योतक आहे.पुन्हा तेच. तुम्हाला तो तिरस्कार वाटत असल्यास ते आमचे दुर्दैव असे समजा.
In reply to मग समजा राधा कल्पनिक असेल तर by प्रचेतस
मी कृष्ण मानतो पण एक व्यवहारकुशल चतुर राजनितीज्ञ म्हणूनहरकत नाही. भगवद् गीतेमध्ये स्वतः श्रीकृष्ण म्हणतो की जो मला जसा बघतो त्याला मी तसा दिसतो.
अवतारी, चमत्कारी ही सगळी प्रक्षिप्त मिथके आहेत.तुम्ही श्रीकृष्णाला अवतारी म्हणत नसाल तर तुम्हाला तो तसा वाटणार नाही पण जे त्याला तसा बघू इच्छितात त्याला तुम्ही का बरं प्रक्षिप्त आणि मिथक म्हणावं? श्रीकॄष्ण चमत्कारी होताच. त्याने त्याच्या आयुष्यात जे जे केलंय किंवा घडवून आणलंय तो एक चमत्कारच आहे. कुशलातला कुशल व्यवहारी, चतुर आणि राजनितीज्ञ हे करू शकेल असं म्हणताच येणार नाही. पुन्हा किमान दोन वेळेला दाखवलेलं विश्वरूपदर्शन चमत्कार नाही म्हणायचा का? की दुर्योधन म्हणतो तसा तो दृष्टिभ्रम मानायचा?
तुम्ही ज्या गर्गसंहितेचा उल्लेख करत आहात ती अगदी अलीकडची.वल्लीजी, गर्ग संहितेचा काळ मोजणार्याने कोणते निकष वापरले आहेत? शेवटी आपल्याकडची लिखित साधनं तुटपुंजी आहेत आणि आपल्याकडील ग्रंथांचा काळ आपण कधीच मोजलेला नाही. अभारतीय व्यक्तींच्या चुकीच्या कालगणनेला पुस्तकात लिहिलंय म्हणून सत्य मानणं योग्य वाटत नाही. गर्ग संहिताच नव्हे तर आपल्याकडील अनेक ग्रंथ मौखिक परंपरेतून आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं गर्ग संहितेला शिवाजी सावंतांच्या कादंबरीची उपमा देता येणार नाही.
लिखीत स्वरूपात का होईना पण पुरावा हवाच.'लिखित स्वरूपात का होईना' या ऐवजी तुम्हाला 'लिखित स्वरूपातच असलेला' असं म्हणायचं असल्यासारखं वाटतंय. तरीही ऐतिहासिकता मौखिक परंपरेतून मिळते असंच म्हणावं लागतं. अन्यथा मौखिक परंपरेतल्या ग्रीक कथांच्या संग्रहांना ऐतिहासिक मानण्यात आलेच नसते.
वैयक्तिक प्रश्न. पण आमचे अस्तित्व हाच त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा का मानता येऊ नये?उदाहरणासाठी वापलेल्या वाक्यामधले तुम्ही हे 'वल्ली, तुम्ही' स्वतःच घेण्याची आवश्यकता नव्हती. मग वैयक्तिक काहीही वाटलं नसतं.
राधेची परंपरा अलीकडचीच.पारंपारिक मौखिक पुरावा हे अमान्य करतो.
राधा म्हणजे मोक्ष लाभो इतकाच अर्थ माझ्याही अल्पमतीला माहित आहे.हाच अर्थ तुमच्या मतिने आम्हालाही समजावून द्या ना!
तुम्हाला तो तिरस्कार वाटत असल्यास ते आमचे दुर्दैव असे समजा.तुमच्या मनात तिरस्कार नसेल तर आम्हाला कशाचे दुर्दैव वाटावे?
In reply to वल्लीजी, मी कृष्ण मानतो पण एक by हरिकथा
पुन्हा किमान दोन वेळेला दाखवलेलं विश्वरूपदर्शन चमत्कार नाही म्हणायचा का?विश्वरूपदर्शनाचे दोन्ही उल्लेख हे प्रक्षिप्त आहेत. संपूर्ण महाभारत वाचल्यास मूळ 'जय' संहितेतील व्यासांची रसाळ भाषा व नंतर सौती व इतरजणांनी टाकलेल्या प्रक्षिप्त कथांची भाषा यांतील फरक सहजी ध्यानी येतो. (सौतीचा काळ इ.स.नंतरचा मानला जातो. बौद्ध धर्माच्या वेगवान प्रसाराला आळा घालण्यासाठी व हिंदू धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी राम, कृष्ण यांना देवतास्वरूप दिले गेले असे संशोधकांचे मत आहे)
आपल्याकडील ग्रंथांचा काळ आपण कधीच मोजलेला नाही.ग्रंथांचा काळ मोजता येतो. शिलालेख, पुराणे, ग्रंथातील उल्लेख यावरून साधारणपणे ग्रंथांचा काळ काढता येतो. महाभारतातील मूळ 'जय' संहितेचा काळ इ.स.पू. ३५०० वर्षे मानला जातो. तर महाभारत हे प्रक्षिप्त कथांमुळे इ.स. २०० -३०० पर्यंत आणता येते. (शक, हूण, चीन, यवन हे उल्लेख त्या काळातले) गर्गसंहितेचा काळ तुम्ही सांगू शकाल काय? अभारतीय लोकांनी केलेली चुकीची कालगणना कोणती? उदाहरण देऊ शकाल?
अन्यथा मौखिक परंपरेतल्या ग्रीक कथांच्या संग्रहांना ऐतिहासिक मानण्यात आलेच नसते.ग्रीक कथांना ऐतिहासिक कोण मानते? त्यांना आजही ग्रीक मिथके अथवा ग्रीक मिथोलॉजी असेच समजले जाते.
पारंपारिक मौखिक पुरावा हे अमान्य करतो.जयदेव कवीने केलेले गीतगोविंद जनमानसात अतिशय लोकप्रिय झाल्यामुळेच राधेचे उल्लेख मौखिक परंपरेत आले.
हाच अर्थ तुमच्या मतिने आम्हालाही समजावून द्या ना!तेच आतापर्यंत तुम्हाला समजवत आलो आहोत पण तुमच्यावर मौखिक परंपरेचा पगडा घट्ट असल्याने नीटपणे समजावून देऊ शकलो नाही.
तुमच्या मनात तिरस्कार नसेल तर आम्हाला कशाचे दुर्दैव वाटावे?धन्यवाद.
In reply to पुन्हा किमान दोन वेळेला by प्रचेतस
In reply to मलाही ही कथा जरा अनाकलनीय by मनीषा
In reply to मनीषाताई, राधातत्त्व समजावं by हरिकथा
In reply to हम्म..... by दादा कोंडके
वरच्या कथेमधून काय बोध घ्यायचा?वरती मनिषाताईंना दिलेला प्रतिसाद नीट वाचलात तर काही बोध होईल असं वाटतं.
वेळीच विवेकबुद्धीनं काही चांगलं पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवावं असं तुम्हाला वाटत नाही का हरिकथाजी?असंच वाटतंय, म्हणूनच हा हरिकथाप्रपंच....!
In reply to दादासाहेब, वरच्या कथेमधून काय by हरिकथा
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद! by दादा कोंडके
In reply to व्याख्या by विनायक प्रभू
म्हटले तर लेखक लेखात आणि प्रतिसादात म्हणतो ते. नाहीतर आजच्या व्याख्येत इन्सेस्ट.तुमची प्रतिक्रिया काही समजली नाही बुवा! जरा स्पष्ट करून सांगा बरं!
In reply to स्पेलिंग by विनायक प्रभू
आय एन सी इ एस टी गुगुलुन बघा.विनायकजी शब्दार्थ आम्हालाही कळतो. त्यासाठी गुगुलुन बघायचे कष्ट घ्यायची आवश्यकता नाही. तुमच्या या इथे शब्दाचा तुम्ही दिलेल्या प्रतिसादाशी असलेला संबंध तुम्हीच सांगावा. तो गुगुलुन आम्ही का काढावा?
तुम्ही म्हणताय ते सर्व काही अगदी बरोब्बर आहे.असा माझा आग्रह नाही.
आम्हा क्षुद्र किटकांना नाही समजायचे ते.हे क्षुद्र किटक वगैरे शब्द मी कुणासाठीही वापरलेले नाहीत आणि वापरणारही नाही. विचार करावा ही विनंती.

In reply to एक राधा नक्कीच होती. मी by गणपा
In reply to च्यामारी या प्रकारालाच by यकु
In reply to बोध नीट घेतला नाही की हे असे by कवितानागेश
In reply to बोध घ्यायचाच कशाला? खड्ड्यात by यकु
In reply to एक राधा नक्कीच होती. मी by गणपा
In reply to हरिकथा श्रवण अथवा वाचन हा by विजुभाऊ
त्यातून काहीच होत नाही. वह्या भरतात आणि पेनाच्या रीफीली संपतात. एवढेच.कित्ती विरोधाभास आहे तुमच्या वाक्यात. वह्या भरतात व रिफिली संपतात असे म्हणताच, वर काहीच होत नाही असे म्हणता?? वह्या आणि रिफिलिंचा खप काय वाढतो, आर्थिक प्रगतीस हातभारही लागतो कि साहेब ;)
In reply to हरिकथा श्रवण अथवा वाचन हा by विजुभाऊ
सुंदर..