वसा
लेखनविषय:
काव्यरस
कुणा माहिती काल होतो कसा?
मला मीच ना आठवे फारसा !
प्रवाहातल्या ओंडक्यासारखा,
किती दूर वाहून आलो असा
दगा देतसे सावलीही मला,
भरोसा करावा कुणाचा कसा?
खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना
इथे कोरडा मी जसाच्या तसा !
खरा चेहरा दाखवू पाहता,
चरे पाडले, फेकला आरसा
नकोसा जरी वाटला जन्म हा,
पुसावा कसा मीच माझा ठसा?
उतूही नये जीव, मातू नये
फुलावा, फळावा असा दे वसा !
वाचने
5285
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
सुंदर!!
आह्हा! सगळेच शेर सुरेख आहेत!
अतिशय आवडल्या गेले आहे.
दो आ प्र का टा आ
खूपच सुंदर... आवडले..
साधं सोप्पं सुंदर काव्य.
छान
गझल आवडली
सुंदर काव्य, आवडले.
मस्त!
In reply to मस्त! by पैसा
>>.....जेवढं लिखाण मिळेल
In reply to >>.....जेवढं लिखाण मिळेल by पाषाणभेद
रागावू नका
In reply to रागावू नका by पैसा
अहो ताई राग वैगेरे काही नाही.
In reply to अहो ताई राग वैगेरे काही नाही. by पाषाणभेद
समजुतीचा प्रश्न
वा वा! सुंदर गजल क्रांतीताई!
फारच छान. आवडली. <<
काही रचनाच अशा असतात की
दो आ प्र का टा आ
काही रचनाच अशा असतात की
काव्य खुप आवडले
In reply to काव्य खुप आवडले by पक पक पक
गैर काहीच नाही हो, तुम्ही
In reply to गैर काहीच नाही हो, तुम्ही by प्रचेतस
बिन्धास १०० प्रतिसाद द्या की
त्यामुळे हा नवे विरूद्ध जुने असा काही संघर्ष आहे असे समजता येत न
काव्य छान आहे
कविता आवडली.
:)
सुन्दर सुन्दर्...बर्याच