साहित्यः
घोये मासे७-८ किंवा त्याचापेक्षा जास्त.
हळद पाव चमचा
मसाला ७ चमचा
मिठ गरजे पुरते
तेल तळण्यासाठी
थोडा लिंबू रस (ऑप्शनल)
आले-लसुण वाटण (ऑप्शनल)
पुर्वीच्या काळच्या लेंग्यासारखे वाटतात ना ? :हाहा:
कृती :
माश्यांचे शेपुट, पर, खवले काढावीत.
पोटाच्या जागेवर चिर पाडून आतली घाण काढून मासे ३ पाण्यांमधून स्वच्छ धुवुन घ्यावेत.
धुतलेल्या माश्यांना मिठ, हळद, मसाला आणि हवा असल्यास थोडा लिंबाचा रस किंवा आले, लसूण चे वाटण चोळून थोडा वेळ ठेवावे.
गॅसवर तवा गरम करून त्यात तेल सोडून मासे तव्यावर अलटी- पलटी करून खरपूस तळावेत.
अधिक टिपा:
घोये मासे हे खाडीत जास्त प्रमाणात मिळतात.
तसे चविला चांगले असतात पण थोडे काटेरी असतात.
हे मासे शक्यतो तळूनच चांगले लागतात.
रस्सा करायचा झाल्यास इतर माश्यांच्या रश्याप्रमाणे करावा.
वाचने
8847
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
बादलीभर लाळ गाळली आहे.
थांब. वायपर घेवून आलोच. बाकी
In reply to बादलीभर लाळ गाळली आहे. by गणपा
अग्ग ताई..
मला वाटते सर्वच प्रकारच्या
झकास
सहीच एकदम... तोंपासु...
इतके लहान मासे कधी खाल्ले
विजुभाऊ, आकारावर जाऊ नका,
In reply to इतके लहान मासे कधी खाल्ले by विजुभाऊ
:(