मिसळ पाव वर बर्याच जणांना माझ्या रेसिपीतील मसाला हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचे आहे. म्हणून ह्या वर्षी वर्षी केलेला हा मसाला इथे देत आहे.
मसाल्याच्या रंगावर जाऊ नका. ह्या मसाल्याच्या पदार्थातही अनेक औषधी गुणधर्म आहेत. ह्यात असलेले जिरे, धणे थंड गुणाचे असतात. त्यामुळे ह्याचा दाह तेवढा जाणवत नाही.
साहित्य :
मसाला १ किलोच्या प्रमाणात करायचा असेल तर
१/२ किलो संकेश्वरी मिरची (जास्त तिखट हवा असेल तर पांडी/घाटी मिरची)
१/२ लो बेडगी किंवा काश्मिरी मिरची
५० ग्रॅम धणे
६० ग्रॅम मिरी
१०० ग्रॅम राई
६० ग्रॅम खसखस
५० ग्रॅम हळद
५० ग्रॅम जिरे
१० ग्रॅम शहाजिरे
१० ग्रॅम लवंग
१० ग्रॅम दालचिनी
१० ग्रॅम बाद्यान
४ ग्रॅम मसाले वेलची
४ ग्रॅम दगडी फुल
५ ग्रॅम तमाल पत्र
६ ग्रॅम जायपत्री
४ ग्रॅम नाकेश्वर
४ ग्रॅम तिरफला
अर्धा जायफळ
छोटासा हिंगाचा खडा
मी पाच किलो मिरचीचा मसाला केला त्यात मी तिन प्रकारच्या मिरच्या घेतल्या. २ कोलो पांडी, २ किलो बेडगी आणि १ किलो काश्मिरी.
ही आहे पांडी उर्फ घाटी मिरची. मला मार्केटमध्ये संकेश्वरी मिरची चांगली नाही मिळाली म्हणुन पांडी घेतली
ही आहे बेडगी मिरची हि रंग चांगला येण्यासाठी वापरतात.
ही आहे काश्मिरी मिरची रंग लाल भडक येण्यासाठी ही मिरची घेतात. हिच्या लाल भडक रंगाप्रमाणे हि महाग असते. ही आकाराने रुंद व बुटकी असते.
हे आहे ५ किलोच्या मसाल्याचे साहित्य
कृती :
मिरची २-३ दिवस चांगली कडक उन्हात तापवा.
१-२ दिवस तापली की जरा कुरकुरीत होते मग ती मोडायला सोपी पडते. मिरचीची देठे काढून (काही जणं नाही काढत देठे तसेही चालते, हल्ली बाजारात देठे काढलेली मिरची पण मिळते) एका मिरचीचे दोन ते तिन तुकडे करा. मिरचीचे तुकडे केल्यावर त्यातील जे बी पडते ते वेगळे ठेवायचे.
ज्या दिवशी मसाला करायचा असेल त्या दिवशी मसाल्यासे सगळे सामान कडकडीत उन्हात वाळवा. आधीपासुन वाळवले तर मसाल्यांचा वास काही प्रमाणात उडतो असे आईचे मत आहे.
प्रचि १) मध्ये हळद व बाजुला दालचिनी, तमालपत्र,जायपत्री, मिरी व बाद्यान किंवा चक्रिफुल
प्रचि २) मध्ये जिर बाजुला डाविकडुन दगडफुल, शहाजिर, लवंग, मसाले वेलची, हिंग, नाकेश्वर, जायफळ, तिरफला,
प्रचि ३) ह्यामध्ये मधल्या डिशमध्ये खसखस, दोन परातीत राई व धणे. पाठचे दोन थाळे प्रचि १ व प्रचि २ आहेत.
आता मसाला करण्यासाठी सज्ज व्हा.
हळद, हिंग खडा आणि जायफळ वेगवेगळे कुटून त्यांचे बारीक तुकडे करुन वेगवेगळे ठेवा.
मोठ्या कढईत किंवा टोपात मिरच्या भाजुन घ्या. जास्त भाजु नका नाहीतर रंग काळा पडेल. तापतील इथपत ठिक आहे. (काही जणं मिरच्या भाजत नाहीत त्या गिरणीत भाजल्या जातात असे त्यांचे मत आहे) हे जरा सहनशिलतेचे काम आहे. कारण मिरच्यांचा तिखट ठसका लागत राहतो मिरची भाजताना. तोंडाला फडके बांधुन भाजलेत तर ठसक्याचे प्रमाण कमी होईल.
मोकळ्या जागी खाली पेपर रचुन ठेवा. त्यावर भाजलेल्या मिरच्या गार करण्यासाठी ठेवा.
मिरच्या भाजून झाल्यावर राई सोडून मसाल्यासाठी लागणारे सगळे साहित्य एक एक करुन भाजा, करपवु नका. जिर, शहाजिर एकत्र भाजलत तरी चालेल, मिरी, तिरफला, नाकेश्वर असे जे एकाच आकाराचे पदार्थ आहेत ते एकत्र भाजलेत तरी चालतील. मिरचिच्या बियाही भाजुन घ्या. बाकीचे सगळे जिन्नस भाजुन झाले की मिरच्यांवर टाकुन गार करण्यासाठी ठेउन द्या.
आता राई करपेपर्यंत भाजा. करपली कि थंड करुन ती मिक्सरमध्ये वाटून एका डब्यात भरुन ठेवा. राई दळायला गिरणवाले घेत नाहीत कारण ती गिरणीला चिकटते. म्हणुन घरीच मिक्सरमध्ये काढून सोबत घेउन जायची.
आता मिश्रण गार झाले की ते स्वच्छ जाड पिशवीत भरा आणि दळायला घेउन जा. सोबर दळलेली राई न्यायला विसरू नका. मसाल्या दळणाच्या वेळा ठरलेल्या असतात. एक दिवस आधीच विचारुन या गिरणवाल्याला की मसाला कधी आणु ? (अपॉइंटमेंट घ्यावी लागते दळणासाठी )
आता गिरण वाल्याकडे मिश्रण आणि राईची पुड सोपवा आणि लक्ष ठेवा तो आपलेच दळण आपल्याला देतो का ? (हे ऑप्शनल आहे, विश्वासावर अवलंबुन आहे :हाहा:) आपली मिरची दळली की गिरणवाल्याकडे हल्ली चाळण्यासाठी बायका असतातच. मग ह्या बायका मसाला चाळतात आणि त्यात राई मिक्स करुन देतात. पुर्वी आपल्यालाच बायका मॅनेज कराव्या लागत. किंवा मग घरातलच कोणितरी चाळावी लागे. आता जर तुम्ही डबा नेला असेल तर डब्यात किंवा पिशवीत मसाला भरुन आणा.
(स्टिलच्या डब्याचा फ्लॅश मसाल्यावर पडलाय म्हणुन फोटो तिखट मानुन घ्या.)
मसाला थंड झाला की एखाद्या घट्ट झाकणाच्या डब्यात भरुन वरुन १-२ हिंगाचे खडे ठेवा म्हणजे तो लवकर उतरत नाही. तसेच त्याच्या तुम्ही पाव किलो अर्था कोलो च्या पिशव्या भरुन मेणबत्तीने पॅक करुन ठेवलात की डब्याच्या उघडझाकीमुळे मसाल्याला हवा लागणार नाही.
इति मसाला पुराण संपुर्णम.
वाचने
39822
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
मत
+१००
In reply to मत by विनायक प्रभू
तिरफळ
In reply to +१०० by गणपा
सेम सेम
In reply to +१०० by गणपा
+१
सायन्स
In reply to +१ by गणपा
कोकण सोडून १०/१२ वर्षे झाली
जागुतै
व्वा
_/\_
बॅचलर लोक ?
In reply to _/\_ by मोहनराव
घरापासुन दुर रहाणारे बॅचलर
In reply to बॅचलर लोक ? by कपिलमुनी
झणझणीत...
विनायक, गणपा, पियुशा, इरसाल,
सुरेख
आई गं!! बघूनच मस्त झणझणीत
मस्त ग
निवेदीता काही दिवसांत
हा वेगळाच मसाला आहे. फोटो
तिरफळ सहन करायला कोकणी आतडे लागते
मोडलेल्या मिर्चीवर बाकीचे
काय तेनिरीक्शन्न
In reply to मोडलेल्या मिर्चीवर बाकीचे by अत्रुप्त आत्मा
मस्त दिसतोय मसाला :)
असा मसाला बनवायला वेळ आणि
मसाला आणि त्याची कृती तर आवडलीच
ते दुपटं नाहिये साहेब! बेडशीट
In reply to मसाला आणि त्याची कृती तर आवडलीच by चतुरंग
=)) =))
In reply to ते दुपटं नाहिये साहेब! बेडशीट by रेवती
हम्म्म्म
In reply to =)) =)) by परिकथेतील राजकुमार
बिनवापरातील....
In reply to ते दुपटं नाहिये साहेब! बेडशीट by रेवती
हो ना नसत्या ठिकाणी मिरच्या
In reply to बिनवापरातील.... by प्रभाकर पेठकर
धन्स गं !!
धन्स सगळ्यांचे.
मस्तच दिसत आहे मसाला
ग्रेट......ग्रेट......ग्रेट..
खोबरे आणि कांदा...?
मोदक त्याला कांदा-लसुण मसाला
धन्स...
In reply to मोदक त्याला कांदा-लसुण मसाला by जागु
अगदी देखणी कृती, प्रचंड
_/\_
मस्त मस्त मस्त, बेसिक
५० - त्याच्या उलट झालय जर
हे असं का जागुतै
In reply to ५० - त्याच्या उलट झालय जर by जागु
मी काय म्हणतो जागुतै
काही योग जुळवून आणावे लागतात
नक्की
In reply to काही योग जुळवून आणावे लागतात by जागु
मलापण सांग मीपण नंबर लावतो.
In reply to काही योग जुळवून आणावे लागतात by जागु
प्रसाद स्वागत आहे तुमच. पिंगु
क्षमस्व.
In reply to प्रसाद स्वागत आहे तुमच. पिंगु by जागु
फटु बघूनच 'जाळ ' झाला.
जागू, हा मसाला करायचा म्हणून
जागुतै ग्रेट आहेस सगळं
ते दुपटं नाहिये साहेब! बेडशीट
क्श्म्स्व!!!!!
मिसिंग जागुतै
जागुताई तुम्ही महान आहात.
तुमच्या पद्धतीनुसार मसाला
जास्त धणे घातले की मसाला
In reply to तुमच्या पद्धतीनुसार मसाला by संपत
ए ताय
निनाद बाजारात आगरी कोळी मसाला
बापरे
धन्यवाद :)
In reply to बापरे by सुखीमाणूस