मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मेंढीताई मेंढीताई

विदेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मेंढीताई मेंढीताई अंगभर लोकर, मज्जा बाई - थंडी जोरात वाजली तरी तुला ऐकू येतच नाही ? बेडूकराव बेडूकराव का ओरडता डराव डराव ? येत नाही झोप तुम्हाला - बाळावर का चिडता राव ! मनीमाऊ मनीमाऊ म्याऊ म्याऊ बंद करा, उंदीर दिसत नाही तोवर- तुम्ही जरा मौन धरा ! भूभूदादा भूभूदादा येता जाता तुम्ही भुंकता - चोर चोरी करतानाच तुम्ही नेमके कसे पेंगता ? बगळोपंत बगळोपंत दिसतो तुमचा एकच पाय - तलावातल्या माशांनी खाल्ला का हो दुसरा पाय ?

वाचने 1264 वाचनखूण प्रतिक्रिया 3

रामदास 03/12/2011 - 08:34
बालगीत . नवीन बालगीतांची फारच टंचाई आहे . त्यामुळे नविन बालगीते वाचली की जास्त बरे वाटते.