मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चांदीचा पेला, ५५+ वैग्रे

विनायक प्रभू · · काथ्याकूट
बुट घालुन बाहेर निघणार होतो इतक्यात 'वार्डन' ने अंगावर काही तरी स्प्रे मारला. "आता हे नविन काय"? फ्रेश वाटेल. चांगला परफ्युम आहे. घामाचा वास येणार नाही. "कुणाला"? तुला आणि कुणाला. दिवसभर लेक्चर असतात ना. घाम येतो ना. मग? "चला म्हणजे नवरा घाम गाळतोय हे तरी कळतय" न कळायला काय झाले? "हे ते १८+ वगैरे नाही ना."? नाही. ५५+ आहे. "पण जाहीरातीत दाखवतात तसे काही झाले तर? बर झाल. माझ्या मागची पिडा टळली. "बघ हो. उद्या तक्रार करु नकोस" काहीही होणार नाही.जाहीरातीचे काय घेउन बसलायस. उल्लु पुरषांना आणखी मुर्ख बनवायची आयडीया असते ती. आपण कायम सुंदर ललनांच्या गराड्यात हे स्वप्न रंजन कुणाला नको असते. "ठीक आहे. मी आपली वार्नींग दिली." थांब जरा. पाणी पिउन जा. रात्रभर चांदीच्या पेल्यात ठेवलेले होते. "आता ह्याने काय होते"? उर्जा पातळी कमी होणार नाही. "आता हे तुला कुणी सांगितले"? माझ्या मैत्रिणीने. तीच्या नवर्‍याला प्रॉब्लेम होता. रोज चांदीच्या पेल्यातुन पाणी देते ती. पंधरा दिवसात आराम पडला. "हो का? बर बर. म्हणुनच गेले आठवडाभर दहा नंतर फोन नाहीये. अतिरिक्त उर्जेच्या मॅनेजमेंट मधे बिझी असेल" चहाटळ पणा पुरे. गपचुप पाणी पी. पण माझी उर्जापातळी लेक्चर्स मुळे वाढते. त्यात आणखी हे पाणी. बघ हो. नंतर तक्रार करु नकोस. पाणी पी आणि निघ. विद्यार्थी खोळंबतील.

वाचने 19133 वाचनखूण प्रतिक्रिया 87

In reply to by सर्वसाक्षी

छोटा डॉन Fri, 11/18/2011 - 15:14
>>तरीच चांदी इतकी महागत चालली आहे. साक्षीदेवा, अक्षरशः हेच खरडायला आलो होतो ;) - छोटा डॉन

In reply to by धमाल मुलगा

दत्ता काळे Fri, 11/18/2011 - 16:01
घाम निघायला लागल्यावर उर्जा पातळी वाढवण्याची आवश्यकता वाटली असावी असाही एक संकेत. कृ. ह. घ्या.

In reply to by JAGOMOHANPYARE

सोत्रि Fri, 11/18/2011 - 16:27
तांब्याच्या भांड्याचा प्रयोग ठीक आहे. पण 'तांब्या पालथा' झाला की तो प्रयोग अंगाशी यईल.;) - (प्रयोगशील) सोकाजी ;)

In reply to by सोत्रि

वपाडाव Wed, 11/23/2011 - 10:53
पण 'तांब्या पालथा' झाला की तो प्रयोग अंगाशी यईल.
तांब्या उलथा-पालथा, सरळ्सोट, चांदीचा कसा का असेना? अंगाशी येणं महत्वाचं.....

In reply to by प्रभाकर पेठकर

वपाडाव Wed, 11/23/2011 - 11:00
इंजेक्टर अन स्प्रेयर मध्ये खुप फरक आहे..... जमीन-अस्मानाचा फरक नसला तरी... हा स्प्रेयर अन हा इंजेक्टर

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ Wed, 11/23/2011 - 11:51
वप्याचा अभ्यास 'दांडगा' आहे. थिअरी पक्की केली आहे. आता प्रात्यक्षिकांची वाट पाहतो आहे झालं. ;)

In reply to by प्यारे१

थिअरी पक्की केली आहे. आता प्रात्यक्षिकांची वाट पाहतो आहे झालं.
प्रात्यक्षीकांची ? का प्रात्यक्षीक करायला मिळण्याची ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्यारे१ Wed, 11/23/2011 - 12:19
वपा कॉलिंग वपा, थेट गाठभेट बरी. काय? ;) अलाऊन्समेण्टः कंडक्टर नं. ४२० वपाडाव, आपन चौकशी /कंट्रोलर केबिन पाशी येऊन तोरीत भेटा. कंडक्टर नं. ४२० वपाडाव. आपन असाल तेथून लौकर येऊन भेटा. सांगितलंय. ;)

प्रभाकर पेठकर Fri, 11/18/2011 - 18:16
"बघ हो. उद्या तक्रार करु नकोस" अशाच एका प्रसंगी एकाची बायको म्हणते,' अहो! त्यात काय काळजी करायची? आपल्या गल्लीतली कुत्री नाही एखाद्या कारच्या मागे धावत?? पण त्यांच्यात कार चालवायची क्षमता थोडीच असते?' चांदीच्या पेल्याचा खरंच परिणाम होतो?? - एक शंका.

In reply to by चतुरंग

प्रभाकर पेठकर Sat, 11/19/2011 - 00:55
पेठकरकाका गायब का मिपावरुन? तशी काही अट दिसत नाहिए. हां... वयोमानानुसार डोस भारी पडल्यास कायमचा गायब होण्याचीच शक्यता आहे.

चतुरंग Fri, 11/18/2011 - 18:28
तरीच तुमच्याकडच्या सगळ्या तांब्या-भांड्यांना कापड गुंडाळून ठेवले होते!! विचारले तेव्हा पाणी गार राहते म्हणालात! ;) (चांदीच्या वाटीतून पंचामृत पिणारा) पंचरंग

In reply to by चतुरंग

धमाल मुलगा Fri, 11/18/2011 - 18:40
मरतंय तिच्यायला आज मी! काय सगळे भैताडल्यागत झालेत आज. >>(चांदीच्या वाटीतून पंचामृत पिणारा) पंचरंग अग्गायायायाया........ या अल्ला......उठा ले रे बाबा....

यकु Fri, 11/18/2011 - 20:55
चांदीच्या पेल्यापेक्षाही तुळशीच्या मंजूळांचे लहान चमचाभर बी काढून ते दुधात उकळून प्या.. चार आठ दिवसानंतर व्यनि करुन परिणाम सांगा अनुवादाला आलेल्या पुस्तकात वाचून मी मजा म्हणून करुन पाहिलं होतं. अवघड झालं होतं.

सर्वसाक्षी Fri, 11/18/2011 - 20:57
मास्तर, शिर्षक जरा 'हे' वाटतय. म्हणजे वगैरे च्या ऐवजी "वैग्रे" - हा शेवटचा शब्द सूचक अपभंश तर नव्हे?

In reply to by सर्वसाक्षी

कुंदन Fri, 11/18/2011 - 21:05
असेच म्हणतो. वैग्रा लिहावयाचे असेल मास्तरना. ;-)

In reply to by किचेन

वपाडाव Wed, 11/23/2011 - 11:04
आता वधु-वर सुचक केंद्रातुन म्हणे लग्नात भेट म्हणुन चांदीचे पेले गिफ्ट देण्यात येणार आहेत..... थोडा प्रकाश टाकावा ही विनंती.....

In reply to by धमाल मुलगा

वपाडाव Wed, 11/23/2011 - 14:17
आफ्रिकेत गोर्‍यांच प्रमाण वाढतंय ते काही उगाच नाही !!!!

In reply to by धमाल मुलगा

प्यारे१ Wed, 11/23/2011 - 14:18
गणपा कमरेला पाने बांधून 'ऊर्जितावस्थेत' -मोअर मोअर- असे ओरडतोय आणि अफ्रिकन 'जनता' सैरावैरा धावतेय असे चित्र डोळ्यापुढं उभं राहिलं आणि ड्वाळे ओसंडले. ;)

In reply to by वपाडाव

किचेन Sun, 11/27/2011 - 13:53
चांगली कल्पना आहे. १५ दिवस आधीच देऊन ठेवते जास्त फायदा होईल ;)त्यांचे आशीर्वाद मला मिळतील. बर तांब्याचे पेले चांदीच पोलिश करून दिले तर चालतील काय? आणि त्या तुळशीच्या मंजुळा पण देते. ............खुश?

In reply to by किचेन

वपाडाव Tue, 11/29/2011 - 11:42
आम्हाला काय विचारताय एकदा देउन बघा..... एखाद्या जोडप्याला.... त्यांची काय प्रतिक्रिया येते त्यावरुन सांगा.....

In reply to by सोत्रि

किचेन Tue, 11/29/2011 - 16:03
हरकत नसल्यास याच्यासाठी तुरडाळ शोधायचं कामही मीच करेल.पण त्याबदल्यात आहेराचा खर्च निम्मा वाटून घ्यायचा. काय म्हणताय?

In reply to by अन्या दातार

किचेन Wed, 11/30/2011 - 18:29
हुंडा घेण आणि देन कायद्याने गुन्हा आहे. आहेराबाबत कायदा काहीच बोलत नाही.म्हणून मी वप्याला लालेले आहेर स्वीकारण्यास मि तयार आहे. वप्या तुझ्या लग्नामध्ये मी तुम्हा दोघांच्या मध्ये थांबणार आहे.आहेर स्वीकारला कि लगेच माझ्या हातात द्यायचा!

In reply to by किचेन

सोत्रि Tue, 11/29/2011 - 16:29
आहेराचा खर्च निम्मा वाटून घ्यायचा.
त्यपेक्षा आलेला आहेर निम्मा-निम्मा वाटून घ्यायची कल्पना अशी वाटते? ;) - (१ तीळ ७ जणांत वाटून खायला आवडणारा ) सोकाजी

In reply to by सोत्रि

किचेन Wed, 11/30/2011 - 18:26
अतिशय उत्तम! वप्या लवकर लग्न कर.आणि पत्रिकेवर 'फक्त आहेरच स्वीकारले जातील.कृपया पुष्प्गुच्ह अनु अन्येत ' असहि लिही

In reply to by किचेन

रेवती Tue, 11/29/2011 - 19:22
तुळशीच्या मंजुळा पण देते अहो किचेनताई, तुळशी नावाच्या बाईच्या मंजुळा नावाच्या मुलीची प्रतिक्षा चाललिये आणि तुम्ही वेगळच म्हणताय.;)

सर्वसाक्षी Sun, 11/20/2011 - 10:07
शिल्पातै गेले तीन दिवस चावुन चोथा झाला की हो! आता रस उरलाच नाही तर ग्रहण कसले करणार?

In reply to by धमाल मुलगा

वपाडाव Wed, 11/23/2011 - 16:17
त्यांचं नावही चांदीच्या पेल्याचा प्रयोग सुरु झाल्याचं द्योतक आहे......मग उगाच प्रश्न का विचारा बुवा...... देव यांच्या गुडघ्यांच रक्षण करो.... का जॅकी श्रॉफला फोन लावता..... सर्व प्रकारची तेलं विकतो तो आजकाल.....

In reply to by वपाडाव

धमाल मुलगा Wed, 11/23/2011 - 17:43
मेलो! मेलो तिच्यायला....ठार खपलो. :D आधीच धिंगाणा काय कमी होता म्हणून पुन्हा आणि तेल विकणार्‍या जॅकी श्रॉफला आवताण होय? =))