सी- सॅट..!!
(संभाषणाचे जमेल तितकं मराठीत भाषांतर करतोय...)
(ट्रिंग ट्रिंग !!) जवळपास पंचेचाळीशीच्या आसपास असलेल्या स्टिफनचा आवाज ऐकू आला... मी काही बोलायच्या आधीचं त्याने कंपनीच्या नावाने खडे फोडायला सुरुवात केली होती..
स्टिफन:- युवर कंपनी सक्स... मी माझ्या कष्टाचे पैसे तुम्हाला देतो आणि तुम्ही मला त्याचा परतावा देत नाही.. मी तुमच्यावर केस करेन.
मी:- (ऑफकोर्स आधी माफी मागितली आणि एका नवीन डी- सॅटची मनापासून तयारी करत विचारलं) नक्की प्रॉब्लेम काय आहे स्टिफन?
स्टिफन:- (काही बोलायच्या मुडमध्ये नव्हता) मला तुझ्या बॉसशी बोलायचं आहे, कंपनी सीईओशी.. माझा फोन ट्रान्सफर कर अमेरिकेत...
मी:- स्टिफन, मला असे करता येणार नाही. पण तू जर मला नक्की काय झालंय सांगितलंस, तर मी तुला नक्की मदत करायचा प्रयत्न करेन...
स्टिफन:- मदत...नको मला तुझी मदत... मला तू तुझ्या बॉसचा नंबर दे..!!
मी:- सॉरी, पण मला तसे करता येणार नाही.. (मी खुणेनेच माझ्या मॅनेजरला कॉल ऐकायला सांगितला त्याच्या डेस्कवरून)
स्टिफन:- (सूर वाढवत) #$#$@$, ^%&%^$# तू मला नाही म्हणालास...मला??
मी:- (माफी मागत) मला तू नक्की सांग काय झालंय ते, मला माझ्या मॅनेजरपेक्षा तरी जास्त माहित आहे ह्या सर्विसबद्दल. (मॅनेजर डोळे वटारून बघू लागला आणि हसायला लागला)
स्टिफन:- अच्छा, तू स्वतःला शहाणा समजतोस काय? माहितेय तुम्ही भारतीय लोकं हुशार असता..पण शेवटी अमेरिकन्स ते अमेरिकन्स...!!
मी:- ह्म्म्म.. (काही बोललो नाही)
स्टिफन:- आम्ही हे केलं, आम्ही ते केलं.. जगाला जगायची दिशा वगैरे दिली आणि आता जगावर सत्ता गाजवतोय. आमची संस्कृती सगळं जग मानतेय....
मी:- (माईक बंद करून, मस्त पाणी पिऊन आलो..तो बोलतच होता)
स्टिफन:- फक्त, तुमच्या भारतात एक गोष्ट चांगली आहे, नाती सांभाळायची जिद्द आणि अक्कल.. तुम्ही त्या बाबतीत पुढे गेलात..
मी:- (हे ऐकून मी एकदम बावरलो..म्हटलं ह्याला काय झालं आता... मग मीच म्हणालो) काही प्रॉब्लेम झालाय का?
स्टिफन:- सुहास, तुझं लग्न झालंय काय रे?
मी:- नाही.. (हा विषय टाळत) मला कळेल का नक्की काय प्रॉब्लेम झालाय नेटवर्कचा?
स्टिफन:- काही नाही.. सगळं एकदम सुरळीत सुरु आहे !!
मी:- क्काय...(आवशीचा घोव तुझ्या) मग तू शिव्या का देत होतास?
स्टिफन:- माफ कर दोस्ता, पण त्या तुझ्यासाठी किंवा तुझ्या कंपनीसाठी नव्हत्या...
मी:- मग... नक्की झालंय काय? मी तुला काही मदत करू शकतो काय?
स्टिफन:- मला फक्त कोणाशी तरी बोलायचं होतं... स्वतःला मोकळं करायचं होतं... माझी बायको मला सोडून गेली दुसऱ्याकडे. मी साधा सॉफ्टवेअर इंजिनिअर. आयुष्यात २० वर्ष प्रचंड कष्ट केले, पैसा कमवला आणि उडवलासुद्धा. प्रेम केलं एका मुलीवर आणि तिच्याशीच लग्न केलं, मग आम्हाला मुलगी झाली. तिच नाव जेन...मग वयाच्या ४३ व्या वर्षी कंटाळून नोकरी सोडली. मी नोकरी सोडल्याने मला पैश्याचा एकुलता एक स्त्रोत म्हणजे, गावी घरासमोर असलेली थोडीफार शेती. पोटापाण्यापुरते पैसे आरामात मिळतात त्यातून, पण बायकोला ते कमीपणाचं वाटायचं आणि शेवटी १५ वर्षाच्या पोरीला माझ्याकडे सोपवून निघून गेली... आता ती मुलगी सुद्धा घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणतेय आणि गेला एक आठवडा ती घरी आली नाही. मित्राच्या ऑफिसमध्ये काम करतेय म्हणाली.. वेळ मिळाल्यास घरी चक्कर मारेन लवकरचं असं म्हणतेय... माझी मुलगी मलाच म्हणतेय जमल्यास घरी चक्कर टाकेन.. काय बोलावं? तिचा खूप राग आला होता, पण तिला ओरडू शकत नाही. काही म्हणालो तर, घर सुद्धा सोडून जाईल जेन. कोणाशी बोलावं, मन मोकळं करावं, तर शेजारी कोणी नाही. माझा सख्खा शेजारी माझ्या घरापासून जवळजवळ ३०-३५ किलोमीटर अंतरावर राहतो. मोबाईल नाही, टीव्ही नाही.. आहे ते फक्त इंटरनेट
मी:- स्टिफन, वाईट वाटलं हे ऐकून !!
स्टिफन:- आमच्या इथे नात्यांना फार कमी वेळ किंमत असते... काही वेळा वाटतं की, ही नाती अशीच टिकतील...पण कुठल्याही क्षणी, तो माणूस आपल्याला लाथाडून दूर निघून जातो, कधीच परत नं येण्यासाठी.. माझं दोघींवर खूप प्रेम आहे रे.. पण त्यांना त्याची किंमत नाही... आज मनसोक्त दारू प्यायलो आहे, मस्त बार्बेक्यू बनवायचा प्लान आहे आणि तुझ्याशी बोलतोय.
मी:- (विषय बदलावा म्हणून) अरे व्वा.. बार्बेक्यू..सही हैं... ख्रिसमसची तयारी सुरु झाली का? (मी स्वतःच जीभ चावली, त्याला तर अजुन दोन महिने अवकाश आहे)
स्टिफन:- हा हा हा हा... विषय बदलतोयस...ख्रिसमसला अजुन खूप वेळ आहे रे. जाऊ दे. तू कर तुझं काम...!!
मी:- सॉरी, बोलण्याच्या ओघात निघून गेलं. मुद्दामून नाही बोललो..
स्टिफन:- ह्म्म्म्म..ठीक आहे रे. मला फक्त कोणाशी तरी बोलायचं होत... तुमच्या नेटवर्कमध्ये, ह्या टोल फ्री क्रमांकावर कधीही फोन फिरवता येतो, म्हणून मी फोन केला आणि सगळा राग रिता केला तुझ्यावर. माफ कर मला, खरंच माफ कर !!
मी:- (मी काय बोलावं मला सुचत नव्हतं...मॅनेजरला खुणावलं, त्याने हाताने खुन करून सांगितलं कट कर फोन..एएचटी वाढतेय (AHT = Average Handle Time)) स्टिफन, मी समजू शकतो तुझी परिस्थिती....पण आम्हाला वैयक्तिक गोष्टी फोनवर बोलता येत नाहीत. जर तुला सर्विसचा काही प्रॉब्लेम नसेल, तर मला हा कॉल कट करावा लागेल....सॉरी !!
स्टिफन:- हो हो.. नक्की कर आणि होsss (तोडक्यामोडक्या शब्दात का होईना तो आनंदाने हिंदीत ओरडला) फिर मिलेंगे !!!
मी:- नक्की... काळजी घे.. Bye !!
=======================================================
अमेरिकेच्या लॅविश संस्कृतीबद्दल सगळ्यांना माहित आहेच, पण तिथे असाही एक वर्ग आहे जो त्या लॅविशपणाला कंटाळून शहराबाहेर पळ काढतोय (आपल्यासारखंच). काय बोलावे सुचत नव्हते. एक वेगळेच वास्तव समोर आले होते..आपल्याकडे सुद्धा आपल्या मनात कधी कधी विचार येतो, जाऊया आता गावाकडे, शहरात राहून कंटाळा आलाय. ह्या धकाधकीच्या जीवनात आता जगायचा खरंच कंटाळा आलाय. :(
मी मॅनेजरला ओरडून सांगतो, चल मी आता ब्रेक घेतो. तो जा म्हणाला आणि मी दारातून बाहेर पडणार इतक्यात तो ओरडला... "सुहास, स्टिफनने सी-सॅट भरा हैं तेरे कॉल कें लिये, और बार्बेक्यू पार्टी का इन्व्हिटेशन भी भेजा हैं...!! :) "
मी नुसताच हसलो... आणि बाहेर पडलो !!
पूर्वप्रकाशित - मीमराठी दिवाळी अंक २०११
-- सुझे !!In reply to झक्कास लेख. आवडला by अन्या दातार
In reply to झक्कास लेख. आवडला by अन्या दातार
In reply to लेख आवडला! by पैसा
In reply to मस्त लिहलं आहेस रे...मला by मदनबाण
In reply to हा हा हा .. प्रचंड भारी by सुहास झेले
In reply to मस्त लिहलं आहेस रे...मला by मदनबाण
In reply to अहो साहेब, फक्त असे ग्राहकच by शिल्पा ब
In reply to सेल्स आणि टेक्निकल by सुहास झेले
In reply to सेल्स आणि टेक्निकल by मदनबाण
In reply to अहो साहेब, फक्त असे ग्राहकच by शिल्पा ब
In reply to झेल्या हापण लेख सही आणि मीपण by पिंगू
In reply to सी-सॅट आणि डी-सॅट हे एक मोठे by मदनबाण
In reply to यप्प.... एसएलए !! by सुहास झेले
In reply to लेख आणि प्रतिक्रिया मस्तच सि by ५० फक्त
In reply to मजा आली.. by दादा कोंडके
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
In reply to सेंटी किस्सा! असलाच एका by पाषाणभेद
In reply to हा हा हा !! by सुहास झेले
In reply to हॅहॅहॅ.... मला पैसे दान by मदनबाण
In reply to मनोविकार तज्ञांपेक्शा वकील by सुहास झेले
In reply to मनोविकार तज्ञांपेक्शा वकील by सुहास झेले
झक्कास लेख. आवडला