Skip to main content

(खेळी)

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 15/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातीताईं फडणीसांचीखेळी वाचून आमच्या मनात गेले कित्येक दिवस आमच्या विडंबनांना घटत चाललेल्या प्रतिसादांचे खरे कारण समजले.. (खेळी) लिहित होतो मी........ वाचक चकवत होते. वाहवा प्रतिसाद!! कधीच मला न येणारे. मग ठरवल, बास!. आता नाही लिहायचे, पुरे झाला कविता-विडंबनाचा खेळ, आणि थांबलो. एका जागी निश्चल. जिंकल्या सारखा. : : : खुप उशिरा कळलं, ती ही त्यांचीच खेळी. पुन्हा बरोबर पडलेली. ======================== केशवसुमार...................... १५-०८-२००८
लेखनविषय:

वाचने 6013
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

अचुक खेळी आपलं विडंबन :-) स्वगतः अरे प्रतिसाद नको देउ. थांबलेला सुटायचा परत!

>>ती ही त्यांचीच खेळी. चुकुन " ती ही तात्यांचीच खेळी " असे वाचले.

In reply to by आनंदयात्री

हळू बोला डायरशेठ लगेच नवीन नियम काढतील, (डायरशेठला घाबरणारा :SS )केशवसुमार

In reply to by आनंदयात्री

मी सुद्धा असंच वाचंलं. चांगलं विडंबन! साती

मस्त विडंबन मुळ खेळी ही छान आमची ही एक ((खेळी )) ======================== अमोल केळकर.....................१५-८-२००८ ((खेळी) ) शिकत होतो मी.... शिक्षक फसवत होते. गणिती विषय !! कधीच मला न येणारे मग ठरवल बास ! आता नाही शिकायचे. पुरे झाला पुस्तकी अभ्यास आणि थांबलो. एका जागी शांत जणु अध्यात्मिक गुरु : : खुप लवकर कळले हीच योग्य खेळी कमी कष्टात पैसा मिळवुन देणारी -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by अमोल केळकर

केळकरशेठ, धन्यवाद!!.. आहो प्रतिसाद म्हणून काय देता तुमची खेळी.. स्वतंत्र धागा टाका केशवसुमार

In reply to by केशवसुमार

साहेब, ट्रॅफिक जाम टाळण्याचा प्रयत्न करतो आहे. :D (आपली शिकवणी लावण्यास उत्सुक ) अमोल (स्वगत : कालच प्रतिज्ञा करुन बसलो आहे की आठवड्यातुन एकदाच स्वतःची गाडी वापरायची आणी आज लगेच नविन धागा हे काही खरे नाही. आज साहेब खुश आहे , कामात लक्ष आहे म्हणाला ) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

चांगले विडंबन आवडले :) :) .. पण मुळ कविता जास्त आवडली :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

मुळ कविते खाली प्रतिसाद दिले तरी चालतील

In reply to by स्वाती फडणीस

असेच म्हणतो. (सहमत) प्रसादलाडु.

केसु आणि केळकर साहेब... दोघांनाही .. दोन्ही मस्त विडंबने. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

केसु शेठ आणि केळकर शेठ, दोघांनाही १० पैकी ७ मार्क. (मुक्तछंदाच्या विडंबनाला आम्ही यापेक्षा अधिक मार्क देत नाही.) दोन्ही विडंबने आवडलीत. - सर्किट

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार