'ज्ञानपीठा'साठी केवळ तीनच मराठी साहित्यिक पात्र?
In reply to विजय तेंडुलकर आणि जयवंत दळवी by चेतन सुभाष गुगळे
विजय तेंडूलकरांनी तर जे वादग्रस्त लिहीलंय तेही बर्यापैकी रटाळ आणि फारसं नावीन्य नसलेलं आहे.तेंडुलकरांवरील वादग्रस्त लिखाणाचा आरोप मान्य नसला तरी कळण्यासारखा आहे ... सर्वांची मते सारखी नसल्याने असे वाद निश्चितच उदभवू शकतात पण 'तें'चं साहित्य 'रटाळ व फारसं नावीन्य नसलेलं'?? हा आरोप मात्र मुळातच मजेदार/गमतीशीर व बिनबुडाचा वाटतो. काळाच्या व तत्कालीन साहित्याच्या पुढे असलेल्या 'तें'च्या साहित्यात नावीन्य नाही?!! खरे तर त्यांच्या साहित्यातील नावीन्यच तत्कालीन 'संस्कृतीरक्षकां'च्या पचनी पडले नाही म्हणून तर पुढील वाद निर्माण झाले (जे नंतर कालौघात शमले).
हे चित्रपट देखील प्रचारकी जास्त आणि प्रभावी कमी अशा प्रकारचे वाटतात. दडपशाही आणि हिंसेचा विरोध करणार्या या साहित्यिकाला शेवटी हिंसेच्या मार्गाचा अवलंब करण्याची इच्छा व्हावी यातच त्यांचे अपयश ठळकपणे दिसून येते.'अर्धसत्य' सारखा वास्तववादी व नितांतसुंदर चित्रपट अपवादानेच निर्माण होतो. यातील हिंसा ही या चित्रपटाच्या कथानकाच्या अनुषंगाने व ओघाने आली आहे ... हिंसेचा प्रसार व प्रचार करणे (किंवा गर्दी खेचणे) हे लेखकाचे उद्दिष्ट आहे असे यात कोठेही दिसून येत नाही. अर्थात आता फक्त goody-goody चित्रपट पहायची एखाद्याची आवड असेल तर त्याला/तिला हे चित्रपट 'हिंसेचे प्रचारक व कमी प्रभावी वाटतात' हे मग समजण्यासारखे आहे.
जयवंत दळवी यांनी गंमतीच्या गोष्टी सारखी पुस्तके लिहीली ज्यात अतिशय असभ्य मजकूर वापरून कथा लिहील्या आहेत. बरे एवढे करूनही त्या रंजक तर नाहीच.दळवींच्या सर्वच साहित्यात असभ्य मजकूर असता तर तो एखाद्या विशिष्ट वाचकवर्गाला आकृष्ट करण्यासाठी केलेला स्टंट आहे असे आपण म्हणू शकलो असतो. पण अर्थात असे नाही आहे. 'गंमतीच्या गोष्टी' असे त्यांचे पुस्तक माझ्या तरी ऐकिवात/वाचनात नाही, त्यामुळे या पुस्तकाबद्दल काही बोलू/लिहू शकत नाही. मात्र एक खरे ... साहित्यात समाजाचे प्रतिबिंब दिसले नाही तर सकस व अनुभव-समृध्द साहित्य निर्माण होणार नाही. हिंसा, राजकारण, असभ्यता, ताणतणाव ही जर (दुर्दैवाने) आजची वस्तुस्थिती असेल तर तिला न स्वीकारुन व आजच्या साहित्यात तिला स्थान नाकारुन आपण पुढे जाऊ शकत नाही. The very first step towards resolving a problem is acknowledging and accepting it (rather than pushing it under the carpet and denying its existence). या तत्वाचा एकदा स्वीकार केला की मग साहित्यातील (आशयाच्या व अभिव्यक्तीच्या अनुषंगाने आलेली) हिंसा, शिवराळपणा, इत्यादि असभ्य वा आक्षेपार्ह न वाटता तो साहित्यानुभव सकस बनवण्यास त्याचा हातभारच लागतो - नपेक्षा बाळबोध साहित्य वाचनापलीकडे आपली मजल पोचणार नाही.
In reply to तेंडुलकर, दळवी, ... by दिपोटी
In reply to अर्धसत्य चित्रपट मी फ्रेम टू by चेतन सुभाष गुगळे
In reply to 'अर्धसत्य' by दिपोटी
In reply to << तेंडुलकरांनीच नमूद by चेतन सुभाष गुगळे
In reply to कृपया भरकटू नका ... by दिपोटी
In reply to अजिबात भरकटत नाहीये.. हा by चेतन सुभाष गुगळे
In reply to मला तुमच्या ज्ञानाबद्द्ल कायम by शिल्पा ब
In reply to अजिबात भरकटत नाहीये.. हा by चेतन सुभाष गुगळे
In reply to मूळ मुद्याबाबतीत आपले काय मत आहे? by दिपोटी
In reply to पुन्हा एकदा माझे मत विस्ताराने मांडतो. by चेतन सुभाष गुगळे
In reply to विजय तेंडुलकर आणि जयवंत दळवी by चेतन सुभाष गुगळे
कमला आणि अर्धसत्य या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहील्या. हे चित्रपट देखील प्रचारकी जास्त आणि प्रभावी कमी अशा प्रकारचे वाटतातया चित्रपटांमध्ये कसला प्रचार केला आहे हे जाणून घ्यायला आवडेल. अर्धसत्य पाहून मी प्रभावित झालो होतोच शिवाय सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल ही नाटके आणि मित्रा, बेडूक, थोटूक, बॅकसीट इत्यादी कथा वाचून आणि त्यात तेंडुलकरांनी त्या काळात (आणि अजूनही) अब्रह्मण्यम अशा समजल्या जाणार्या विषयांवर किती मार्मिक आणि संवेदनशीलतेने लिहीलं आहे हे पाहून थक्क झालो. त्यांच्या लेखनात हिंसा असे कारण स्वतःच्या सभोवती असलेली हिंसा त्यांनी टिपली. पण त्यांनी कधीही त्या हिंसेच्या विरोधात प्रचार केला असे वाटत नाही. उलट निष्पक्षपातीपणे ती टिपल्यानेच त्यांच्या लेखनाला एक सर्वकालिक संदर्भ मिळाला. जयवंत दळवींच्याही प्रत्येक कलाकृतीत असभ्य भाषा नाही आहे. त्यांची स्पर्श ही कथा वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले. (त्यात कोणाला कुष्ठरोगाविरुद्धचा प्रचार दिसू शकतो.) त्यांच्या चक्र कादंबरीत तुम्ही म्हणता तशी असभ्य भाषा आहे पण ती नसती तर ती पात्रं झोपडपट्टीतली न वाटता तुमच्या दिवाणखान्यात बसून बोलताहेत असं वाटलं नसतं का? बॅरिस्टर, पुरूष आणि लग्न या नाटकांतली त्यांची पात्र वासनेने बरबटलेली असतील पण ती खोटी आहेत असे नाही. शिवाय त्यांच्या विनोदी कथाही चांगल्या आहेत. ठणठणपाळ हे त्यांचं रुप तर खूपच गाजलं. अशी माझी सध्याची मते आहेत. ती तुमचा खुलासा ऐकून कदाचित बदलता येतील.
In reply to चेतन सुभाष गुगळे by नगरीनिरंजन
बॅरिस्टर, पुरूष आणि लग्न या नाटकांतली त्यांची पात्र वासनेने बरबटलेली असतील पण ती खोटी आहेत असे नाही.अगदी बरोबर ... हाच मुद्दा मी वर मांडला आहे की 'साहित्यात समाजाचे प्रतिबिंब दिसले नाही तर सकस व अनुभव-समृध्द साहित्य निर्माण होणार नाही. हिंसा, राजकारण, असभ्यता, ताणतणाव ही जर (दुर्दैवाने) आजची वस्तुस्थिती असेल तर तिला न स्वीकारुन व आजच्या साहित्यात तिला स्थान नाकारुन आपण पुढे जाऊ शकत नाही.' परत दळवींच्या सर्वच साहित्यात असा अनाचार बोकाळलेला दिसला असता तर 'एक प्रतिभावान साहित्यिक' म्हणून त्यांच्या प्रतिमेविषयी फेरविचार झाला असता. पण 'बॅरिस्टर' व 'पुरूष' सारखी उत्तम नाटके लिहिणार्या लेखणीतूनच 'संध्याछाया' वा 'नातीगोती' सारख्या हृदयस्पर्शी कलाकृती देखील उतरल्या. 'सारे प्रवासी घडीचे' सारखी कोकणच्या पार्श्वभूमीवरील एक अत्युत्तम कादंबरी सुध्दा या लेखणीनेच प्रसवली. आपण लिहिल्याप्रमाणे 'ठणठणपाळ' हे त्यांचे सदर गाजले ते समकालीन साहित्यिकांवर-प्रकाशकांवर ताशेरे ओढूनही त्यातील निखळ, निर्विष व निर्भेळ विनोदामुळे. विनोदाचा हा अनोखा साहित्यप्रकारच त्यांनी जन्माला घातला. -दिपोटी
In reply to चेतन सुभाष गुगळे by नगरीनिरंजन
In reply to सविस्तर खुलासा by चेतन सुभाष गुगळे
यापेक्षा जास्त ताणतणाव आपल्या आयुष्यात असतात, पण त्यावरील उत्तर निष्कारण हिंसा होऊ शकत नाही. त्यातला शेट्टी नायकाला जितका वाईट जाणवतो तितका मला तरी वाटला नाही. खरे तर त्याच्यामुळे नायकाला फारसा त्रास होत नाहीच मूळी. नायकाला जो काही त्रास होतो तो त्याच्या स्वत:च्या चूकांमुळेच हे स्पष्ट दिसते. तरीही त्याचा दोष शेट्टीच्या किंवा इतरांच्या माथी मारणे ही नायकाची पळवाट आहे. मुख्य म्हणजे मूळ सूर्य कथेत बाप आणि मुलगा यातला संघर्ष आहे. बाप मुलाला त्याच्या इच्छे विरुद्ध आपल्या कल्पनेनुसार घडवितो हा विषय आहे. अर्धसत्य मध्येही तो मांडलाय. नायकाला पोलीस होण्यातच रस नसतो. मग असे असेल तर तो नोकरीचा राजीनामा देऊन दुसरं काही का करू शकत नाही. कायदा हातात घेऊन काय साध्य होतं?एखाद्या कथेतले पात्र आपल्या नेहमीच्या आयुष्यात माणसं जशी वागतात तसे का नाही वागले वगैरे विचारणे मलातरी पूर्णपणे गैरलागू वाटते. हे म्हणजे पंचतंत्र वाचताना 'सिंह कधी बोलतो का?' असं विचारल्या सारखंच आहे. शिवाय शेट्टीचा निगरगट्टपणा कोणाला सहज स्वीकारार्ह वाटेल आणि कोणाला तो अत्यंत त्रासदायक वाटेल. तुमच्या मतानुसार जे तार्किक वागणे आहे तसे नायक न वागणे म्हणजे तो लेखकाने केलेला प्रचार ठरू शकत नाही. अशा घटना खर्या आयुष्यातही घडतात आणि जे त्या घटनेचा भाग नसतात ते 'असं कोणी कसं वागू शकतं?' असं आश्चर्य व्यक्त करतात.
त्यांच्या नाटकांचे खेळ बंद पाडले गेले तेव्हा त्यांनी या दडपशाहीचा / हिंसेचा विरोध केला होता. त्यानंतर दोन दशकांनी मात्र त्यांनीच मला कुणीतरी पिस्तुल आणुन दिले तर मी मोदींची हत्या करील असे विधान केले.यात मला कुठेही विरोधाभास दिसत नाही. दिसली तर त्यांची वाढत गेलेली उद्विग्नताच दिसते. त्यांच्या नाटकाचे खेळ बंद पाडले म्हणून त्यांनी दडपशाहीचा/हिंसेचा विरोध केला असेल पण ते अहिंसेचे पुरस्कर्ते होते असा त्यावरून निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. किंबहुना ते तत्त्ववेत्ते असल्याचा आणि काही तत्त्वे अंगिकारल्याचा त्यांनी कधी कुठला दावाही केला नव्हता मग दडपशाहीविरुद्ध आणि हिंसेविरुद्ध झालेल्या त्यांच्या मनुष्यसहज उद्रेकाला दुटप्पीपणा ठरवणे हा त्यांच्यावर अन्याय होईल असे वाटते. रामप्रहर मी वाचलेले नसल्याने तुमचे मत मी ग्राह्य धरतो.
परंतू त्यांनी गंमतीच्या गोष्टी सारखे बाजारू लिखाण करून ठेवले. त्याचप्रमाणे ***** वगैरेसारख्या उपमा वापरण्याचा प्रकार मला तरी अतिशय अश्लाघ्य वाटतो.तुम्ही कोणत्या उपमेबद्दल लिहीलंय ते मला कळलं नाही आणि गमतीच्या गोष्टी मी वाचलेल्या नाहीत पण बाजारू या शब्दावरून त्यात अश्लील किंवा चावट असं काही असावं असं वाटतंय. ज्ञानपीठसाठी ठराविक प्रकारचेच लेखन केलेले असणे ही अट असेल तर हा मुद्दा योग्य आहे. अन्यथा अश्लीलता, बीभत्सता आणि क्रौर्य हे ही आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग असल्याने त्यावर थेट आणि खुलेपणाने लिहीण्यात वावगे नाही. एकंदरीतच माझ्या शंका अजून फिट्ल्या नाहीत. तुम्ही सांगितलेले मुद्दे साधारणपणे त्या लेखकांचे चारित्र्य, तत्त्वभूमिका किंवा लेखनविषयांची निवड या बाबतीत आहेत. लेखनाच्या वैपुल्यावर आणि दर्जावर तुम्ही काही सांगू शकाल काय? ज्ञानपीठ पुरस्कार (माझ्या मते) चारित्र्य किंवा तत्त्वभूमिकांसाठी नसून तो साहित्यातील कर्तृत्वासाठी आहे असे मला वाटते. त्यासाठी लेखक कधी काय बोलला, कोणाशी भांडला वगैरे गोष्टी मध्ये येऊ नयेत असे वाटते. लेखनाच्या दर्जाविषयी बोलल्यास आणि इतर मराठी वा अमराठी लेखक का श्रेष्ठ आहेत यावर आपण प्रकाश टाकलात तर ते धागाप्रवर्तकाच्या मूळ मुद्यालाही धरून होईल.
In reply to साशंक आहे by नगरीनिरंजन
In reply to तुमच्या सर्वच शंकांचे निराकरण मी करू शकत नाही. by चेतन सुभाष गुगळे
In reply to सविस्तर खुलासा by चेतन सुभाष गुगळे
In reply to ताणतणाव आणि वैफल्यग्रस्त अवस्था.... by प्रभाकर पेठकर
In reply to सोपी कथा मला समजत नाही काय? by चेतन सुभाष गुगळे
In reply to भावनिक आणि बौद्धीक युद्ध..... by प्रभाकर पेठकर
In reply to भावनिक मार्ग जवळचा वाटला तरी फलदायी नाही by चेतन सुभाष गुगळे
In reply to त्रास करून घेण्यावर आहे. हे by प्रभाकर पेठकर
In reply to चित्रपटातील मार्ग मला पटला by चेतन सुभाष गुगळे
In reply to विजय तेंडुलकर आणि जयवंत दळवी by चेतन सुभाष गुगळे
.....अंतिम निर्णय घेतीलच म्हणा.अंतिम निर्णय ??? =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ज्ञानपीठची सोडत सुरु असल्यासारखं वाटलं .
In reply to .....अंतिम निर्णय घेतीलच by यकु
आपले काय मत आहे?ईतर भाषांतील साहित्य कदाचित अधिक समृद्ध नाही असू शकणार? प्रतिभा/गुणवत्ता मोजता येत नाही पण ईतर हिंदी/कन्नड भाषेतील लेखक्/कवी प्रतिभेत सरस नाही असू शकणार? हिंदी भाषा अनेक राज्यांत बोलली/वाचली जाते तेव्हा त्या भाषेत लिहिणार्यांना अधिक पुरस्कार मिळावेत ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे नाही. कन्नड साहित्याविषयी खूप माहिती नाही पण मित्र सांगतात त्यानुसार साहित्यात विविधता प्रचंड आहे.
का असे पुरस्कार मिळवण्यासाठी पडद्यामागे ज्या काही हालचाली कराव्या लागतात, त्यात मराठी माणूस मागे पडतोसरकारी पुरस्कार मिळवण्यासाठी हालचाली कराव्याच लागतात. अगदी दादासाहेब फाळके पुरस्कारापासून ते भारतरत्न पर्यंत. ज्ञानपीठचे ठावूक नाही पण आधिचे ज्ञानपीठ विजेते बघितलेत तर त्यांना मिळालेला पुरस्कार योग्यच आहे असे म्हणता येईल. डॉ. चंद्रशेखर कंबार ह्यांना पुरस्कार देण्यापेक्षा तो एस्.एल. भैरप्पा ह्यांना मिळायला हवा होता असे काही कन्नड लेखकांचे मत असल्याचे वाचले. ( http://www.dnaindia.com/bangalore/report_noted-kannada-writer-patil-puttappa-kicks-up-jnanpith-storm_1589749 ) Puttappa sees intense lobbying as the reason for Bhyrappa losing out to less deserving litterateurs like Kambar भैरप्पा ह्यांनी एका पुस्तकात्/भाषणात इंदिरा गांधींना भ्रष्टाचाराची माता असा उल्लेख केला होता. तेव्हा योगदान अधिक असूनही पुरस्कार मिळण्याची शक्यता ३ वर्षे तरी नाही!! ( कंबार ह्यांचे नाव तर अनेक कन्नड मित्रांना माहितही नव्हते! पण पुरस्कार मिळाल्याचे कळल्यावर त्यांनी माना डोलावल्या!! कंबार ह्यांचेही साहित्य वाचनिय/अभ्यासनीय आहे पण भैरप्पांएवढे ते लोकप्रिय नाहीत). प्रश्न असा पडतो की हे intense lobbying कोण करतो ? ( कर्नाटकात भा.ज.प. चे सरकार आहे . त्यांच्या मतांना केंद्रातले मंत्री फार विचारतील असे वाटत नाही. केंद्रात कर्नाटकचे दोनच वजनदार मंत्री आहेत. एस्,एम. कॄष्णा / वीरप्पा मोईली . मराठी मंत्री तर केंद्रात अनेक आहेत आणि अधिक वजनदार) निवडपक्रिया येथे दिली आहे ( http://jnanpith.net/awards/jnanpith-award ) The process of selection begins with the submission of proposals by a large number of litterateurs, teachers, critics and discriminating readers, also from various universities, literary and language associations and other similar organisations. (As per the rules of the award, once a language gets the award, it is not eligible for consideration during the next three years. Thus three languages are out of reckoning for the award every year). Intense lobbying कुठे करावे लागते वर कळते.
In reply to पात्र by चिरोटा
ईतर भाषांतील साहित्य कदाचित अधिक समृद्ध नाही असू शकणार? प्रतिभा/गुणवत्ता मोजता येत नाही पण ईतर हिंदी/कन्नड भाषेतील लेखक्/कवी प्रतिभेत सरस नाही असू शकणार?इतर भाषांतील साहित्य मराठी साहित्यापेक्षा निश्चितच कमी वा अधिक सरस असू शकतात. पुनरुक्तीचा धोका पत्करुन परत एकदा : मुद्दा असा आहे की 'मराठी (व बंगाली) साहित्य इतर भारतीय भाषांमधील साहित्यापेक्षा अधिक सकस व समृध्द आहे' असा जो सर्वसामान्य विचार आहे तो विचार तरी एकतर मुळातच चुकीचा आहे अथवा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांच्या निवडप्रक्रियेत (पडद्यामागील हालचालींना सुध्दा महत्व दिल्यामुळे) घोळ आहे : या दोहोंपैकी सत्य काय आहे? Interestingly, 'इतर भाषांतील साहित्य कदाचित अधिक समृद्ध नाही असू शकणार?' असा प्रश्न प्रतिसादाच्या सुरुवातीला विचारुन प्रतिसादाच्या शेवटी आपण intense lobbying होत असल्याचे सुध्दा मान्य करता. असे lobbying होत असेल व त्यामुळे मराठीच नव्हे तर इतर भाषिक साहित्यिकांवर देखील हा अन्यायच आहे.
In reply to खुलासा by दिपोटी
In reply to साचेबद्ध आणि एकसुरी लेखन- माझं थोडसं अवांतर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to साचेबद्ध आणि एकसुरी लेखन- माझं थोडसं अवांतर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मराठी लेखकाला ज्ञानपीठ by JAGOMOHANPYARE
In reply to मराठी लेखकाला ज्ञानपीठ by JAGOMOHANPYARE
In reply to मराठी लेखकाला ज्ञानपीठ by JAGOMOHANPYARE
In reply to छान by सुनील
In reply to माझा आयडी उलटवून "विग" करावा by गवि
In reply to मराठी लेखकाला ज्ञानपीठ by JAGOMOHANPYARE
In reply to मराठी लेखकाला ज्ञानपीठ by JAGOMOHANPYARE
In reply to पुरस्कार हवेतच कशासाठी? by प्रभाकर पेठकर
In reply to +१ by यकु
In reply to जरूर पाहा.... by प्रभाकर पेठकर
In reply to अर्धसत्य आणि कमला by चेतन सुभाष गुगळे
In reply to धन्यवाद गुगळे साहेब. by यकु
In reply to तुम्ही हे चित्रपट पाहावेत अशी माझीही तुम्हाला विनंती आहेच. by चेतन सुभाष गुगळे
In reply to प्रांजळ...? by प्रभाकर पेठकर
In reply to माझ्या सूचविण्याने त्यांचे मत बदलणार आहे का? by चेतन सुभाष गुगळे
In reply to अजिबात नाही. by प्रभाकर पेठकर
In reply to गैरसमज माझा नव्हे आपला... by चेतन सुभाष गुगळे
... असा जो आपण तर्क बांधलात आणि इथे मांडलात तो माझ्या व श्री. कुलकर्णी यांच्या संवादात शिरून आपण केलेला एक प्रकारे औचित्यभंग ठरतोबाप रे बाप!! औचित्यभंग ?!! श्रीयुत गुगळे, या व अशा संस्थळावरील एखाद्या खुल्या धाग्यावर दिलेल्या आपल्या खुल्या प्रतिसादाला इतर कोणीही तसाच खुला प्रतिसाद दिला तर तो औचित्यभंग ठरत नाही किंवा यात गैर काहीही नाही. आपण सर्व या संस्थळावर येतो व प्रतिसाद देतो ते चर्चेत सहभागी होण्यासाठी येतो. खुल्या धाग्यावर खुली चर्चा होते - येथे खाजगी संवाद (वा खाजगी इतर काहीही) नाही. कोणाचाही कोणताही प्रतिसाद हा कोणालाही उलटा प्रतिसाद देण्यासाठी मोकळा आहे. खाजगी संवादासाठी व्यनिची सोय आहे हे लक्षात ठेवल्यास सर्वांनाच बरे. - दिपोटी
In reply to औचित्यभंग?! by दिपोटी
In reply to गैरसमज माझा नव्हे आपला... by चेतन सुभाष गुगळे
In reply to आणखी एक मुद्दा ... by दिपोटी
In reply to औचित्यभंग? by चेतन सुभाष गुगळे
In reply to हम्म ! by दिपोटी
In reply to विषय आपण अधिकच भरकटवताय... by चेतन सुभाष गुगळे
In reply to युध्दविराम ... by दिपोटी
In reply to हम्म ! by दिपोटी
In reply to माघार.... by प्रभाकर पेठकर
In reply to शिरवाडकर आणि खांडेकर हे by आशु जोग
In reply to आकडेवारी by पैसा
In reply to अरेरे! by पिवळा डांबिस
In reply to हाजिर तो वजीर! by पैसा
नाहीतर मेल्या म्हशीला मणभर दूध आहेच!ते म्हैस कोकणातली की घाटावरची यावर अवलंबून आहे ;-) पण 'या' म्हशींच्या बाबतीत कोकणातल्याच म्हशींना जास्त दुध असते असे उलटे निरिक्षण आहे.
In reply to नाहीतर मेल्या म्हशीला मणभर by यकु
In reply to ''कालाय तस्मय नमः'' मी तर भगत by निनाद मुक्काम …
आपण intense lobbying होत असल्याचे सुध्दा मान्य करता. असे lobbying होत असेल व त्यामुळे मराठीच नव्हे तर इतर भाषिक साहित्यिकांवर देखील हा अन्यायच आहे.Lobbying मध्ये काही गैर आहे असे वाटत नाही. सर्व प्रकारच्या नोबेल पुरस्कारासाठीही lobbying होते.प्रश्न एवढाच की ज्याला ज्ञानपीठ दिले जाते ती व्यक्ती लायक आहे की नाही. समजा आपण निवड समीतीत आहोत आणि आपल्याकडे चार भाषांतील लेखकांची यादी आली तर कोणाची निवड करु ? १)ज्याच्या लेखनात्/काव्यात विविधता/कल्पकता/नाविन्य आहे. २) ज्याचे लेखन समाजाच्या विविध थरांत वाचले गेले आहे. ३)ज्याचे पुस्तक्/पुस्तके विद्यापीठांत संदर्भग्रंथ म्हणून वापरली जातात. ४)भारताबाहेरही त्याच्या लिखाणाची चर्चा होते. ५) ज्याचे थोडेफार लिखाण ईतर भारतिय भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. सध्या किती मराठी लेखक्/कवींची नावे अशी घेता येतील? कोणी सांगु शकेल का? हे सर्व असेल तर lobbying करणे ही पुढची गोष्ट. समजा ह्या चार लेखकांतून दोन पात्र ठरले तर कोणाची निवड करायची?समितीवर एकाहून अधिक सदस्य असल्याने एका अमुक भाषेला डावलले जात असेल असे वाटत नाही.सध्याची निवड समिती बघितलीत तर त्यात एकही कन्नड सदस्य नाही.
In reply to सहमत + by चिरोटा
Lobbying मध्ये काही गैर आहे असे वाटत नाही. सर्व प्रकारच्या नोबेल पुरस्कारासाठीही lobbying होते.जेव्हा आपण एखादी सिस्टीम सुधारण्याचा वा आदर्श बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यातील गैर बाबी काढून टाकणे हा उद्देश असतो. आता नोबेल वा इतर कोणत्याही पुरस्कारासाठी lobbying होते ही वस्तुस्थिती असली तरी ही वस्तुस्थिती अशा lobbying चे इतरत्र समर्थन करण्यासाठी वापरता येत नाही ... जो गलत है सो गलत है ... कारण शेवटी ही वस्तुस्थिती ही केवळ एखाद्या आदर्श सिस्टीम मधील विसंगती (नाईलाज / तडजोड / fault) म्हणून मानावी-स्वीकारावी लागेल व जेव्हा व जेवढे जमेल तेव्हा व तेवढ्या स्वरुपात ही विसंगती काढून टाकण्याचाच प्रयत्न झाला पाहिजे. असे पुरस्कार विजेते ठरवताना गुणवत्ता हा केवळ एकच निकष मानला पाहिजे. याबरोबरच 'पडद्यामागील हालचाली करण्याची क्षमता' हादेखील निकष असेल, तर गुणवत्तेचा निकष पिछाडीस पडण्याचा धोका संभवतो. उदाहरणार्थ, पंजाबी भाषेतील एखाद्या लेखकाने साहित्याला उत्तम योगदान दिले असेल पण त्याच्याकडे lobbying करण्याची इच्छा वा क्षमता वा दोन्ही नसेल तर त्याचा त्याला हा पुरस्कार मिळण्याच्या शक्यतेवर अजिबात - अगदी थोड्या अंशाने सुध्दा - परिणाम होता कामा नये. अगदी याच कारणामुळे 'ज्ञानपीठ' पुरस्काराच्या पात्रतेसाठी (आपल्याच वरील एका प्रतिसादात नमूद केल्याप्रमाणे) कोणत्याही भारतीय भाषेवर असलेले ३ वर्षांचे बंधन सुध्दा कृत्रिम व म्हणून अर्थहीन वाटते. गुणवत्ता - व केवळ गुणवत्ता - हा एकच निकष मानला तर एखाद्या भाषेतील दहा साहित्यिक इतर भाषांतील साहित्यिकांच्या तुलनेत उजवे ठरले तर त्या सर्वांना सलग दहा वर्षात हा पुरस्कार देणे यात तात्विक दृष्ट्या काहीही गैर नाही आहे.
In reply to गुणवत्ता हा एकच निकष by दिपोटी
In reply to लॉबिंग by चिरोटा
In reply to वरील प्रतिसादांपैकी श्री. by गवि
In reply to पाठिंब्या बद्दल आभारी आहे by चेतन सुभाष गुगळे
In reply to तुमच्या दळवी किंवा "तें" by गवि
In reply to वरील प्रतिसादांपैकी श्री. by गवि
In reply to मि पा वरुन by कुंदन
In reply to एक माहिती सर्वांसाठी पु. ल. by आशु जोग
In reply to एक माहिती सर्वांसाठी पु. ल. by आशु जोग
In reply to परंतु त्यांच्या साहित्याचे by गवि
In reply to ह्या वरुन एक आठवले. स्वतः by मराठी_माणूस
In reply to अगदी अगदी..आणि त्यातही नुसते by गवि
In reply to चांगला मुद्दा मांडलात. पण by मराठी_माणूस
In reply to >>"ती फुलराणी" हे भाषाविषय by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to अगदी अगदी..आणि त्यातही नुसते by गवि
In reply to अगदी अगदी..आणि त्यातही नुसते by गवि
In reply to ताज्या बातमीनुसार, चंद्रशेखर by वपाडाव
In reply to कन्नडमधे कितीतरी ज्ञानपीठ by आशु जोग
In reply to कन्नडमधे कितीतरी ज्ञानपीठ by आशु जोग
In reply to कन्नडमधे कितीतरी ज्ञानपीठ by आशु जोग
पण त्या लोकांचे एकच दु:ख आहे. तिकडे वाचणाराच कुणी नाहीखरे आहे. बेंगळूरमध्ये पहाल तर जुने कन्नड ग्रंथ मिळायची मारामार असते. पूर्ण शहरात १० हून अधिक दुकाने नसतील कन्नड ग्रंथ विकणारी.अनेक जण मैसूरला जातात पुस्तके घ्यायला.अनेक उच्चशिक्षित लोक ज्ञानपीठ काय्,साहित्य अकादमी काय ,संगीत वगैरे बाबतीत अनभिज्ञ असलेले मी पाहिले आहेत. मी,माझे काम्,माझे कुटूंब एवढाच विचार असतो. पं.भीमसेन जोशींचे निधन झाले तेव्हा तरुण पिढीला ते कन्नडिगा आहेत आणी त्यांनी कन्नड गाणी गायली आहेत हे माहित नव्हते,
In reply to पी व्ही नरसिंहराव हे कसे by आशु जोग
पी व्ही नरसिंहराव हे कसे विद्वान आहेत आणि कित्येक भाषांवर त्यांचे कसे प्रभुत्व आहे हे सांगताना तेलुगु माणूस थकत नाहीहे नविनच ऐकतोय. ईतक्या वर्षात एकही तेलगु मित्राने त्यांची महती गायल्याचे आठवत नाही.चिरंजीवीबद्दल म्हणाल तर ठीक आहे.एकूणच तेलगु मध्यम्/उच्च वर्ग पुस्तके,साहित्य,भाषा,संस्कृती ह्या वेळ 'व्यर्थ' घालवणार्या गोष्टींना जीवनात फार थारा देत नाही असे माझे निरिक्षण आहे. आपल्या तेलेगु मित्राला चार तेलगु कवी/लेखकांची नावे विचारा.!
In reply to हे by चिरोटा
एकूणच तेलगु मध्यम्/उच्च वर्ग पुस्तके,साहित्य,भाषा,संस्कृती ह्या वेळ 'व्यर्थ' घालवणार्या गोष्टींना जीवनात फार थारा देत नाही असे माझे निरिक्षण आहे. आपल्या तेलेगु मित्राला चार तेलगु कवी/लेखकांची नावे विचारा.!अतिप्रचंड सहमत चिरोटाजी......
In reply to माझ्या वैयक्तिक मते तर विजय by अप्पा जोगळेकर
In reply to माझ्या वैयक्तिक मते तर विजय by अप्पा जोगळेकर
In reply to साहित्य अकादमी by फारएन्ड
विजय तेंडुलकर आणि जयवंत दळवी