रानभाजी १८) भूईछत्री/आळंबी/मश्रुम
भूईछत्र्या ह्या रानात, डोंगरात साधारण ऑगस्ट च्या दरम्यात म्हणजे जरा उन पडायला लागल्यावर, ढग गडगडायला लागल्यावर यायला लागतात. भुसभुशित जागेत त्या उगवतात. भूईछत्र्या ह्या खाण्याच्या आहेत हे मात्र खात्रीकरुन घ्यावे. ह्यात विषारी प्रकारही असतात. जाणकारांकडूनच ह्या घ्याव्यात.
साहित्यः
भूईछत्री/मश्रुम्स
कांदे २
आल, लसुण, मिरची, कोथिंबिर पेस्ट १ चमचा
टोमॅटो १ ते २
हिंग
हळद
मसाला १ ते २ चमचे
तेल
चविनुसार मिठ
अर्धा चमचा गरम मसाला
न उघडलेली छत्री
पाककृती
प्रथम भूईछत्र्या सोलुन घ्यायच्या. सोलून घ्यायच्या म्हणजे ह्या थराथरांच्या आवरणांच्या बनलेल्या असतात. सगळ्यात वरचे आवरण काळपट असते ते काढून टाकायचे.
नंतर त्याला हातानचे सुट्टे करत त्याचे बारीक भाग करायचे.
हया भूईछत्र्यांचे तुकडे आता धुवुन घ्यायचे. भांड्यात तेल गरम करुन कांदा शिजत लावायचा. शिजला की त्यात आल्-लसुण, मिरची,कोथींबीरची पेस्ट टाकुन थोड परवायच. त्यानंतर हिंग, हळद, मसाला टाकुन परतवून भूईछत्र्यांच्या फोडी टाकायच्या. व ढवळून शिजत ठेवायचे. भुईछत्र्यांना पाणी सुटते थोडे.
साधारण १०-१५ मिनीटे शिजल्यावर त्यात वरुन टोमॅटो, मिठ व गरम मसाला घालायचा. टोमॅटो शिजला, पाणी आटले की गॅस बंद करायचा.
ही आहे तयार भूईछत्री/मश्रुम्सची भाजी. अगदी मटणासारखी लागते चविला.
अधिक टिपा:
ह्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो म्हणून भाजीत आजीबात पाणी घालू नये.
साफ करण्यात थोडा जास्त वेळ जातो त्यामुळे जास्त प्रमाणात करावयाची असल्यास चिकाटी बाळगावी.

वाचने
15875
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
वाह! मस्तचएकदम जबरा व्हेज
भूईछत्र्या ह्या खाण्याच्या
In reply to भूईछत्र्या ह्या खाण्याच्या by यकु
इंदूर का? छान छान.
In reply to भूईछत्र्या ह्या खाण्याच्या by यकु
यकुशेठ,
मशरुम म्हणजे माझी आवडती भाजी.
तोंपासू
विषारी आहे की नाही हे
वा मस्त !!
आहाहा... माझी आवडती भाजी !
मस्त मश्रूम....
छ्या !
पर्या तुच सांग्तलस की एखादी
आपल्या जिभेला या ५ मूलभूत चवी
त्रिशंकु धन्स माहीती बद्दल.
जियो..!