कॉकटेल लाउंज : गाथा वाइनची – 2 (व्हाइट वाइन)
- हलके अंग (Light-bodied) - शेलाट्या बांध्याची ही वाइन म्हणजे कतरीना कैफ :)
- मध्यम अंग (medium-bodied) - मध्यम बांध्याची ही वाइन म्हणजे उमेदीतली जुही चावला :)
- भरलेले अंग (full-bodied) - भरल्या अंगाची ही वाइन म्हणजे शिल्पा शिरोडकर :)
| Chardonnay | |
![]() |
व्हाइट वाइनसाठी वापरण्यात येणार्या सर्व प्रजातींमधे ही प्रजात "राणी" किंवा "Queen" म्हणुन ओळखली जाते. ह्या व्हाइट वाइनच्या लोकप्रियतेचे महत्वाचे कारण म्हणजे सर्व प्रकारच्या वातावरणात ह्या द्राक्षाच्या प्रजातीचे उत्पादन करता येउ शकते. त्यामुळे जगात जिथे जिथे वाइन तयार केली जाते तिथे तिथे ह्या प्रजातीचे उत्पादन करता येते.ह्या द्राक्षाची चव न्युट्रल असते त्यामुळे ह्या द्राक्षापासुन बनवलेल्या वाइनला ओक लाकडाचा स्वाद आणि गंध जास्त प्रमाणात असतो. (ओकच्या कास्क मधे मुरवल्यामुळे) ह्या द्राक्षापासुन बनवलेल्या वाइन ह्या full-bodied म्हणजेच भरलेल्या अंगाच्या असतात. मध्यम ते जास्त अशी ऍसीडीटी असते ह्या वाइनची. ओक, वॅनिला, बटर अश्या वेगवेगळ्या चवीत शार्डने वाइन मिळते. |
| Chenin Blanc | |
![]() |
फ्रान्स मधल्या Loire Valley तसेच अमेरिकेतील कॅलिफोर्निआ इथे तयार होणार्या ह्या द्राक्षापासुन तयार होणार्या वाइन्सना शिनेन ब्लांक असे नाव मिळते.ह्या वाइनची चव ही द्राक्षे कुठल्या वातावतणात आणि कुठ्ल्या प्रकारच्या मातीत तयार झाली आहेत त्यावर अवलंबून असते. म्हणज़े वेगवेगळ्या देशात तयार झालेल्या ह्या वाइनच्या चवीत फरक असतोच. फ्रान्समधे तयार होणारी शिनेन ब्लांक सर्वांत चवदार असते. ह्या वाइन्स Light-bodied म्हणजेच हलक़्या अंगाच्या असतात. |
| Gewurztraminer | |
![]() |
जर्मनी आणि फ्रान्समधे आल्प्स पर्वतराजींच्या कुशीत तयार होणारी ही द्राक्षे ह्या प्रांतातील थंड वातावरणात पिकल्यावर त्यांपासुन तयार होणारी वाइन म्हणजे Gewurztraminer (मराठी उच्चार करायच्या भानगडीत पडलो नाही). Gewurztraminer चा अर्थ स्पायसी असा आहे.ह्या वाइन्स Light-bodied म्हणजेच हलक़्या अंगाच्या असतात आणि नावाप्रमाणे जरा स्पायसी असतात. |
| Pinot Gris or Pinot Grigio | |
![]() |
इटली मधे आणि फ्रान्सच्या Alsace प्रांतात तयार होणार्या द्राक्षांना पिनॉट ग्रीझो असे म्हणतात तर अमेरिकेत ह्या द्राक्षांना पिनॉट ग्रीस असे म्हणतात. ह्या द्राक्षापासुन तयार होणार्या वाइनची चव ते द्राक्ष कुठे तयार झाले आहे त्यावर खुपशी अवलंबुन असते.युरोप मधे तयार होणार्या ह्या वाइन्स Light-bodied असतात तर अमेरिकेत तयार होणार्या वाइन्स medium-bodied असतात. |
| Riesling | |
![]() |
जर्मनी, फ्रान्सचा Alsace प्रांत आणि अमेरिकेत न्यु यॉर्क मधल्या Finger Lakes येथे ह्या द्राक्षांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. युरोप मधे तयार होणार्या ह्या वाइन्स Light-bodied असतात तर अमेरिकेत तयार होणार्या वाइन्स medium-bodied असतात. ह्या वाइन्स मुरवत ठेवत नाहीत (No Aging) त्या 'तरुण' असतानाच त्यांचा लुत्फ घ्यायचा असतो. मुरवत न ठेवल्यामुळे ह्या वाइन्सना ओक लाकडाचा फ्लेवर आणि अरोमा नसतो. |
| Sauvignon Blanc | |
![]() |
ह्या द्राक्षापासुन बनणारी वाइन फुमे ब्लांक (Fumé Blanc) म्हणुनही ओळखली जाते. ही द्राक्षे फ्रान्समधे Bordeaux आणि Loire प्रांतात होतात. तसे ती अमेरिका, न्युझिलंड आणि साउथ अफ्रिकेतही तयार होतात. |
| Semillon | |
![]() |
फ्रान्स आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निआ येथे तयार होणार्या ह्या द्राक्षांपासुन व्हाइट वाइन तयार केली ज़ाते.ह्या द्राक्षांचा Sauvignon Blanc ह्या द्राक्षांबरोबर ब्लेंड करुन "डिझर्ट" वाइन बनवतात. |
| Viognier | |
![]() |
फ्रान्स आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निआ येथे तयार होणार्या ह्या द्राक्षांपासुन व्हाइट वाइन तयार केली ज़ाते.ह्या वाइन्स मुरवत ठेवत नाहीत (No Aging) त्या 'तरुण' असतानाच त्यांचा लुत्फ घ्यायचा असतो. |
![]() |
व्हाइट वाइनसाठी वापरायचा ग्लास हा रेड वाइन ग्लास पेक्षा थोडा लंबुळका असतो. त्याचे तोंड हे लहान असते. तोंड लहान असण्याचे कारण हवेशी संपर्क कमी होउन ओक्सीडेशन कमी करणे. त्याच बरोबर व्हाइट वाइनचे तापमान कमी ठेवले जाण्यासही लहान तोंड मदत करते. |
चित्र आंतरजालाव्रुन.काही दुकानात कपाटातल्या वाइन ची बाटली चक्क उन्हात होती.कोण म्हणे हा दुकानदार? त्याच्या थोतरीत ठेउन त्याचे लायसंस जप्त करा! वाइन साठवायचं तापमान हे १५ - २० डीग्री सेल्शिअस इतके असावे लागते. म्हणजे रूम टेंपरेचर. ( भारतात हेच रूम टेंपरेचर 25-30 डीग्री सेल्शिअस असते.) :( प्यायच्या आधि स्टोर मधुन काढुन फ्रिझ मधे पिण्यायोग्य तापमान करावे लागते. परदेशात बहुतेक घरांना तळघर असते आणी तिथे वाइन्च्या बाटल्या स्टोअर करुन ठेवलेल्या असतात. त्या तळघराच्या अंधार्या, कुंद वातावरणात ती वाइन मस्त टिकते. उच्च तापमानाला वाइन खराब होते. तीच्या रंगावरून ते ओळखता येउ शकते. ती ब्राउन रंगाची होते खराब झाल्यावर.
In reply to आपल्या ज्ञानापूढे नतमस्तक आहेच... by आत्मशून्य
In reply to सोकाजी*, लेख उत्तम. माहितीचे by ३_१४ विक्षिप्त अदिती
फक्त चित्रं कुठून घेतली त्याचा उल्लेख केलास तर उत्तम.धन्यु! लेख अपडेट केला आहे. - (*) सोकाजी
In reply to सोकाजी*, लेख उत्तम. माहितीचे by ३_१४ विक्षिप्त अदिती
गेल्याच विकेण्डला तुझा लेख वाचण्याचा फायदा झाला. एका ओळखीच्या कुटुंबात गेलो होतो तिथे काकांनी विचारलं, "भारतातल्या कोणत्या वाईन्स तुला आवडतात?" तेव्हा रक्त वारूणींमधे झिनफन्डेलचं नाव घेतल्यावर झिनफन्डेल ही रक्तवारूणी का गुलाबी यावरून चर्चा झाली.हा असला प्रश्न विचारणारे काका धन्य आणि त्यावर सखोल चर्चा करणारी पुतणी महाधन्य. मुळात स्त्रीयांनी दारु प्यावीच कशासाठी ? आणि समजा दोन घोट घेतलेच, तर त्याची ही अशी जाहिर चर्चा करुन काय साध्य करायचे असते ? पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करण्यासाठी अजुन बरीच उत्तम क्षेत्रे मोकळी आहेत. नको तिथे बरोबरी कशाला ? आपण किती पुढारलेले आहोत हे दाखवण्यासाठी का विदेशातल्या प्रगल्भतेचा तोरा मिरवण्यासाठी ? हीच आपली संस्कृती आहे का ?
In reply to वा: ! by परिकथेतील राजकुमार
In reply to वा: ! by परिकथेतील राजकुमार
In reply to असुरक्षितता by स्मिता.
स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने माजी मारलेली बघून आपल्या मनात असुरक्षितता निर्माण झालेली वरच्या प्रतिसादातून दिसून येतेय. संस्कृती-संस्कृतीच्या नावाखाली किती दिवस स्त्रियांना आपल्या इच्छेनुसार कठपुतली बनवून वागवणार?वरिल प्रतिसादातून मी कुठेही कठपुतली बनवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले तुम्हाला ? उलट मी संस्कृती, लज्जा ह्यांची स्त्रियांकडून असलेली अपेक्षा व्यक्त केली. आणि असुरक्षितता कसली ? उलट इतर क्षेत्रातील स्त्रियांची प्रगती बघून आम्हाला अभिमानच वाटतो. राखी सावंत, पूनम पांडे, भंवरीदेवी, शबाना आझमी ह्यातर आमच्या फेवरेट आहेत.
एखाद्या स्त्रिने केलेल्या कोणत्याही कृत्याने जर कुणालाच काही हानी होत नसेल तर त्या कृत्याबद्दल तिच्या मनात अपराधीभावना आणण्याचे कारण काय?परवाच एका स्त्री ने दारु पिऊन नवर्याचा खून केल्याची बातमी वाचनात आली. आमच्या एका काकांच्या चपला त्यांच्याच घरातून एके रात्री पार्टीनंतर नाहिशा झाल्या. त्या पार्टीतील एका स्त्री वर अजूनही बर्याच जणांन संशय आहे, की तिने अंमळ दारुच्या नशेत चपला बदलल्या.
ज्यासाठी पुरुष पितात त्याचसाठी!ते जास्तीत जास्त वेळ घराबाहेर आणि सुखाने राहता यावे म्हणून दारु पित असतात ;)
In reply to स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात by परिकथेतील राजकुमार
आमच्या एका काकांच्या चपला त्यांच्याच घरातून एके रात्री पार्टीनंतर नाहिशा झाल्या. त्या पार्टीतील एका स्त्री वर अजूनही बर्याच जणांन संशय आहे, की तिने अंमळ दारुच्या नशेत चपला बदलल्या.फुटलो! खपलो!! वारलो!!!
अंमळ दारुच्या नशेत चपला बदलल्याधर्म बुडाला. संस्कृती बुडाली. हे श्रामोंचे म्हणणे पटले हो! - (दारू संस्कृती रक्षक) सोकाजी
In reply to असुरक्षितता by स्मिता.
In reply to स्त्रियांनी दारु पिऊ नये by गवि
In reply to गमावणं / कमावणं by स्मिता.
यात मधल्या ओळीतील वाक्ये आपल्या मताशी समांतर आहे पण पहिल्या आणि तिसर्या ओळीतील वाक्यातून मला कुठेही व्यसनामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर होणार्या परिणामांची काळजी दिसली नाही. म्हणून आधीचा प्रतिसाद लिहिला होता.नुसती स्त्रियांच्या आरोग्याचीच नव्हे, तर संस्कृती, स्त्रित्व आणी त्या स्त्रिच्या पूर्ण कुटूंबाची काळजी आहे मला. म्हणून तर पोटतिकडीने मी वरिल प्रतिसाद दिला आहे. आई शिकली की घर शिकते म्हणतात. 'एक स्त्री घरादारा साक्षर करी.' पण हीच स्त्रि जर हे असे काही शिकणार असेल तर त्याचा पुढील पिढीवर किती गंभिर परिणाम होईल बरे ?
अर्थात पराची ही वाक्ये उपरोधाने असतील तर प्रश्नच मिटला.आतून.. आतून आलेली खिन्न प्रतिक्रिया आहे ती.
अधिक चर्चा करायची असल्यास खव आहेच, सोकाजीच्या सुरेख माहितीपर धाग्यावर अवांतर चर्चा नकोअवांतर चर्चा आहे असे वाटत नाही. धाग्याचा विषयच असा आहे की व्यसनाधीनतेवर चर्चा होणारच. आपली चर्चा देखील त्याचाच एक भाग आहे असे वाटते.
In reply to यात मधल्या ओळीतील वाक्ये by परिकथेतील राजकुमार
In reply to यात मधल्या ओळीतील वाक्ये by परिकथेतील राजकुमार
In reply to स्त्रियांनी दारु पिऊ नये by गवि
दुध, सायीचे दुध आणि बासुंदी ह्यांच्यात जो फरक तोंडभर घोट घेतल्यावर कळेल तसाच फरक वाइन वाइन च्या अंगामधेही असतो.दूध वगैरे गोष्टी अशा लेखांत आणू नका हो. मळमळायला लागतं. ;-)
"white wine with white meat" हा व्हाइट वाइन पिण्याचा 'थंब रुल' आहे असे म्हणण्यास हरकत नाही.पाश्चिमात्य संदर्भात हे बरोबर आहे, पण आपल्याकडे लाल तिखट आणि मसाले, आलं-लसूण वगैरे सढळ हस्तानं घालून केलेल्या white meatच्या संगतीत नाजूक चवीची व्हाईट वाईन हरवून जाते. तेव्हा मी असा नियम सुचवेनः कमी मसालेदार पदार्थांबरोबर व्हाईट वाईन आणि एरवी रेड वाईन. गावरान कोंबडी किंवा बांगड्याचा उग्रपणा पाहता असे पदार्थ कसेही शिजवले गेले, तरी त्यांबरोबर व्हाईट वाईनपेक्षा रेडच बरी. जेवणापूर्वी सॅलड किंवा फिश फिंगर, चीज + क्रॅकर वगैरे सर्व्ह केलं तर त्याबरोबर व्हाईट वाईन चांगली लागते. फुल-बॉडीड वगैरे संज्ञांचं स्पष्टीकरण पुरेसं पटलं नाही, पण असो. वाईनबद्दल बोलताना एखादं तुमच्या पसंतीचं चित्र दिलंत तर लेख अधिक बोलका होईल. उदा:
किंवा अधिक बोलकं चित्र हवं असलं तर रुचीनुसार:
किंवा हे ;-)
In reply to (हलक्याने घेण्याच्या) किंचित सूचना by चिंतातुर जंतू
In reply to (हलक्याने घेण्याच्या) किंचित सूचना by चिंतातुर जंतू
In reply to बूच मारलेले नाही by परिकथेतील राजकुमार
आंतरजालावरुन कुठून घेतलीत हे लिहायला कसे बरे विसरलात ?'बोले बहु त्याला म्हणती वाचाळ' या उक्तीचे पालन करीत उपरनिर्देशित ज्ञानकण योग्य स्थळी अगोदरच रुजू केलेले आहेत हे ज्ञान सुजाण वाचकांप्रती पोहोचविण्याहेतू हा प्रतिसादप्रपंच. प्रतिमेचे उगमस्थळ, चित्रकाराचे नांव व चित्राचे नांव हात जोडून दर्शन द्यावेत अशी ज्यांस मनीषा असेल अशा ज्ञानोत्सुकांनी प्रतिमेवर आपला (पक्षी: आपल्या संगणकाचा) मूषक नेऊन त्याचे उजवे गालावर हलकासा ठोसा मारावा आणि उपरोल्लेखित ज्ञानकण टिपावे ही नम्र सूचना. आस्थापूर्ण चौकशीकरिता धन्यवाद.
In reply to आंतरजालावरुन कुठून घेतलीत हे by चिंतातुर जंतू
'बोले बहु त्याला म्हणती वाचाळ' या उक्तीचे पालन करीत उपरनिर्देशित ज्ञानकण योग्य स्थळी अगोदरच रुजू केलेले आहेत हे ज्ञान सुजाण वाचकांप्रती पोहोचविण्याहेतू हा प्रतिसादप्रपंच.आम्ही सुजाण वाचक नाही ;) आता बोला, उल्लेख का केला नाहीत ? :P
In reply to सोक्या च्यामारी लयं भारी by मदनबाण
मी फळांचा राजा हापुस आंबा छान असतो म्हंटल की तू म्हणायच की त्याला फळांचा राजा म्हणण्याचे धैर्य होत नाही...पेरुच छान लागतो.! कळलं का काही ?तेच तर करत असतो मी आजकाल ;) त्याशिवाय आपले वेगळेपण लोकांना कळणार कसे ? बाकी ज्या द्राक्षांपासून अगदी देवदेवतांना देखील सुख देणारे द्राक्षासव बनते, त्या द्राक्षांना सोडून गर कमी आणि कोय जास्ती असणार्या आंब्याला फळांचा राजा का म्हणत असावेत ? जुन्या राजे राजवाड्यांच्या कथा / शिणीमात देखील राजा / राणी हे कायम द्राक्षे खातानाच दाखवले जायचे. कदाचित ह्या फळांचा राजा प्रकरणा मागे कोकणस्थांचा काव असू शकतो.
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to मुख्य समस्या अशी येते की या by गवि









चित्र आंतरजालाव्रुन.