रामराम मंडळी,
परवा मित्राकडे गेलो होतो. शनिवारी क्रिकेट खेळून आणी दंगा घालून झाल्यावर रविवारी चिकन बनवायचं ठरवलं. मी तंदूर तर मित्र रस्सा बनवणार. हे आपलं ब्याचलरी (अनिवासी) घरात असणारं साहित्य घेऊन बनवलं आहे बरंका. :)
नुसतं तंदूर खाणार असाल तर हे खालचं साहित्य एका माणसासाठी....रस्स्यासोबत तोंडी लावायला घेणार असाल तर दोघांसाठी ;)
साहित्य :
१. ७-८ चिकन ड्रमस्टीक्स/विंग्स
२. २ चमचे मीठ
३. १-२ चमचे तिखट
४. १ चमचा काळीमिरी पूड
५. १-२ चमचे तंदूर मसाला/चिकन मसाला
६. २ चमचे आलं-लसूण पेस्ट
७. ४ चमचे दही
८. १ चमचा बटर/लोणी/तूप
कृती:
१. चिकन धुऊन , तसेच स्कीन नको असल्यास स्कीन काढून घ्या.
२. एका भांड्यात दही, आलं-लसूण पेस्ट्,तंदूर मसाला, काळीमिरी पूड,मीठ, तिखट एकत्र करून घ्या.
३. ह्यात चिकन घोसळून मॅरिनेट करा.
४. भांड्यावर झाकण ठेवून रात्रभर फ्रीज मधे ठेवा.
५. दुसर्या दिवशी दुपारी तंदूर करायच्या आधी अर्धा तास आधी फ्रीज बाहेर काढून चिकन रूम टेंपरेचरला आणा.
६. ओव्हन मधे अॅल्युमिनियम चा पत्रा (फॉईल) पसरून घ्या.
७. ओव्हन ४०० F/२००C प्रिहीट करून घ्या.
८. फॉईल वर चिकन पसरून ३० मिनीटे बेक करा.
९. ३० मि. नंतर चिकन वर बटर लाऊन १० मिनीटे बेक करा.
१०. १० मि. नंतर चिकन पलटून दुसरी बाजू १५ मिनीटे बेक करा.
तयार आहे चिकन तंदूरी...


वाचने
15013
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटुतल चिकन एकदम टेंप्टिंग
तोंपासु..
छान दिसतंय
कारण आम्ही 'गवत आणि पाला' खातो.
In reply to छान दिसतंय by पैसा
असं मी नाही म्हणत
In reply to कारण आम्ही 'गवत आणि पाला' खातो. by निवेदिता-ताई
प्रभो खातय शिव्या....असे छान
>>> ४. भांड्यावर झाकण ठेवून
भारी
!
छान प्रश्न
In reply to ! by मेघवेडा
च्यायला
हं
In reply to च्यायला by रमताराम
अरे, वाचणा-यांचा विचार करा जरा.
वा रे मेरे शेर.. जरा कांदा,
प्रेरणादायक
डिशच्या मधोमध असणारे दोन
भन्नाट.
तेज्यायचं बाटगं !
मेल्या
In reply to तेज्यायचं बाटगं ! by परिकथेतील राजकुमार
अनिवासींना धाग्याच्या खफ
In reply to मेल्या by श्रावण मोडक
मेल्या घरी येणार होतास ना रे,
अगं तो पुढच्या रयवारी
In reply to मेल्या घरी येणार होतास ना रे, by प्राजु
तुला मदत करायला
In reply to अगं तो पुढच्या रयवारी by रेवती
अगं, कुठली आलिये मदत? आता
In reply to तुला मदत करायला by पैसा
हां.
In reply to अगं, कुठली आलिये मदत? आता by रेवती
वाट बघ पैसाताई! त्याची मदत
In reply to हां. by पैसा
लिस्ट
In reply to अगं, कुठली आलिये मदत? आता by रेवती
वेळेत सांग म्हणजे झालं.
In reply to लिस्ट by प्रभो
आणखी एक लिस्ट कर. इथे आल्यावर
In reply to लिस्ट by प्रभो
हॅहॅहॅ....मी माझ्या भाच्याला
In reply to आणखी एक लिस्ट कर. इथे आल्यावर by प्राजु
मस्तच तोँपासु
प्रभो
धन्यवाद मंडळी...
छान
दिली असती मी.......पण याच्या
In reply to छान by चित्रा
अच्छा?!
In reply to दिली असती मी.......पण याच्या by रेवती
तसं मी कुण्णाला सांगणार
In reply to अच्छा?! by चित्रा
जगू द्या हो प्रभ्याला
In reply to तसं मी कुण्णाला सांगणार by रेवती
ही प्रभोबद्दल वाटणारी काळजी
In reply to जगू द्या हो प्रभ्याला by Nile
उपवधू
In reply to ही प्रभोबद्दल वाटणारी काळजी by रेवती
अलिकडे सिंगल आहे असे ऐकते
In reply to उपवधू by चित्रा
काय हे!
In reply to अलिकडे सिंगल आहे असे ऐकते by रेवती
च्यायला
In reply to काय हे! by Nile
मग काय तर, तेज्यायचं (का
In reply to च्यायला by श्रावण मोडक
पलीकडे
In reply to उपवधू by चित्रा
त्यात काय!
In reply to पलीकडे by श्रावण मोडक
तोंपासू
नवरात्र आहे
ते त्या चिकन ला जरा सुरी ने
तुमचं बरोबर आहे तै! आमचं
In reply to ते त्या चिकन ला जरा सुरी ने by सविता
झाली का रे हाफ शेंचुरी?
छान..!