ट्रू एअर स्पीड, ग्राऊंड स्पीड, सर्किट वगैरे...
इथे मी लेफ्ट साईडेड सर्किट पॅटर्न दाखवला आहे. २७ आणि ०९ हे रनवे नंबर्स आहेत. रनवे नंबर म्हणजे त्या रनवेचं तोंड ज्या बाजूला आहे ती दिशा. २७० डिग्री म्हणजे पश्चिम दिशा. त्यातलं शेवटचं शून्य काढून पहिले दोन आकडे वापरले जातात. त्याचप्रमाणे ०९ म्हणजे ९० डिग्री, अर्थात पूर्व दिशा.
या सर्किट पॅटर्नमधे आपण ०९ रनवे वापरुन सर्किट पॅटर्न दाखवला आहे. पूर्वेला तोंड करुन टेकऑफ घेतला जातो. टेकॉफनंतर नाकासमोर वर चढत जाण्याच्या भागाला अपविंड लेग म्हणतात.
अपविंड लेगमधून सरळ नाकासमोर एक्झिट घेऊन ठराविक उंची गाठायची आणि मग आपल्या गन्तव्यस्थानाची दिशा सेट करुन तिकडे तोंड वळवायचं, अशी एक एक्झिटची पद्धत आहे. किंवा मग काही ठिकाणी वर चढताचढताच डावीकडे वळून क्रॉसविंड लेग ही रेषा जॉईन केली जाते. क्रॉसविंड लेगमधून डावीकडे ४५ डिग्रीत एक्झिट घेण्याचा आणखी एक प्रकार आहे.
आता एक पूर्ण सर्किट करुन पाहूया.. अशी एकामागून एक सर्किट्स उड्डाण शिकताना केली जातात. त्यामुळे टेकॉफ आणि लँडिंगसहित सर्वच प्रकारची उत्तम प्रॅक्टिस होते.
टेकऑफ घेतला.. अपविंडमधे एक हजार फुटापर्यंत वर चढत गेलो. मग काटकोनात पण स्मूथ असं डावीकडे वळण घेतलं. क्रॉसविंड जॉईन केला.. दोन हजार फुटांची उंची गाठली. पुन्हा डावं वळण घेऊन रनवेला समांतर पण उलट दिशेत प्रवास सुरु केला. दोन हजार फुटांवर इंजिन पॉवर अॅड्जस्ट करुन विमान स्थिर केलं. आता रनवे आपल्या डाव्या हाताला दिसतोय. इथे आपण कंट्रोल टॉवरला रेडिओवर सांगतो. उदा. "पुणे, व्हिक्टर किलो अल्फा ऑन लेफ्ट डाउनविंड जीरो नाईन.." म्हणजेच अहो पुणे टॉवरवाले काका, मी रनवे ०९ च्या डाव्या डाउनविंड लेगमधे आहे.
टॉवर आपल्याला सांगतो:" व्हि़क्टर किलो अल्फा, पुणे... रिपोर्ट ऑन फायनल्स.."
म्हणजे जेव्हा फायनल लेगला पोचाल तेव्हा सांगा.
डाउनविंड लेगमधे आपण रनवे पार करुन थोडे पुढे गेलो की साधारण आपल्याला रनवेचं ०९ टोक "एट ओ क्लॉक" पोझिशनमधे दिसायला लागतं, असा एक पॉईंट येतो. या ठिकाणी पुन्हा स्मूथली डावं वळण घ्यायचं. याच सुमारास इंजिन पॉवर आयडल किंवा बंद करायची. त्यामुळे विमान खाली उतरायला लागतं.
उतरत उतरत आणि वळत वळत क्रॉसविंडच्या उलट दिशेत असलेल्या "बेस लेग" नावाच्या रेषेला जॉईन व्हायचं.
बेस लेगला काटकोनात असलेला लेग म्हणजे फायनल लेग. उतरणं चालूच आहे. फायनल लेगमधे आलात की दूर रनवे तुमच्या नाकासमोर दिसेल. रनवेच्या सेंटरलाईनशी विमानाचं नाक लावून धरत उतरणं चालू ठेवायचं. गरजेनुसार उतरण्याचा रेट वाढवायचा. रनवेचा आकडा हे आपलं टचडाऊन करण्याचं टारगेट असलं पाहिजे. त्याच्या आधी टच केलं तर अंडरशूट झालात, म्हणजे दगडधोंड्यात थेट घुसलात..
त्या टार्गेटच्या पुढे गेलात तर ओव्हरशूट..मग टचडाऊन झाल्यावर रनवेची उरलेली लांबी तुम्हाला पुरणार नाही.
अशा दोन्ही वेळी लँडिंग म्हणजे क्रॅशच.. (मेंगलोर क्रॅश ओव्हरशूटमुळे झाला होता..)
फायनलवर आल्यावर पुन्हा टॉवरला सांगायचं की मी फायनलवर आहे. मग तो तुम्हाला लँडिंग क्लियरन्स देईल आणि लँडिंगसाठी उपयोगी आकडेरुपी माहितीही देईल..
टचडाऊन केलंत की थोडं पुढे जाऊन टॅक्सीवेवर विमान वळवा आणि एप्रनमधे पार्क करा, किंवा परत सलग टेकऑफ घेऊन आणखी सर्किट करा.
जर बाहेरुन प्रवास करुन या विमानतळावर येत असलात तर जनरली डाउनविंड लेगमधे ४५ डिग्रीमधे जॉईन व्हायचं असतं. बाकी पुढे तसंच.
रनवेची दिशा बदलली की लेफ्ट साईडेड पॅटर्न राईट बनू शकतो...
....................
ओव्हर..
In reply to एक शंका. वारा २०० किमी वेगाने by विजुभाऊ
In reply to एक शंका. वारा २०० किमी वेगाने by विजुभाऊ
In reply to मला ऑफिसच्या पार्किंग मध्ये by ५० फक्त
In reply to आवडत आहे. by विसुनाना
In reply to याही भागात एकदम इण्टरेस्टिंग by मी ऋचा
In reply to ओ गविभाऊ, by मिसळपाव
In reply to आवडले by स्मिता.
In reply to +१ by ऋषिकेश
आता विमानात बसलो की कोणत्या वेळी वैमानिक काय करत असेल याचे अंदाज करून शेजारची वर इंप्रेशन मारता येईलवरील वाक्यावरुन हा प्रतिसाद ऋषिकेश चिंदरकरांनी दिल्या सारखा वाटतो..... - कम्युनिस्ट (वपाडाव)
In reply to मस्त लेख by योगी९००
In reply to तुम्ही म्हणता त्यामधे by गवि
In reply to >>लँडिंग आणि टेकॉफ by नितिन थत्ते
In reply to मी मुंबई विमानतळावर फ्लाईट by गवि
In reply to पाऊण तास एकदाच डिले झालेला by रेवती
In reply to मोबाईल सिग्नलमुळे तसा काही by गवि
In reply to माहितीपूर्ण लेखमालिका! बहुतेक by पिवळा डांबिस
In reply to माहितीपूर्ण लेखमालिका! बहुतेक by पिवळा डांबिस
माहितीपूर्ण लेखमालिका! बहुतेक माहिती मला नवी असल्याने आवडली. गवि, पुढील भागांसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!!!! (बाकी त्या खट्याळ नायल्याला ह्या धाग्यापुरता का होईना पण अभ्यासू नायल्या केल्याबद्दल अनेक धन्यवाद!!!!)असेच म्हणतो :). लेख आवडला, गवि. सोबत दिलेली आकृती आणि छोट्या, सुटसुटीत वाक्यांमुळे समजायला सोपा वाटला.
In reply to सहीच आहे... वाचुन हिथ्रो by अंतु बर्वा
In reply to सहीच आहे... वाचुन हिथ्रो by अंतु बर्वा
In reply to सहीच आहे... वाचुन हिथ्रो by अंतु बर्वा
In reply to माहितीपूर्ण लेखमालिका ! by रामदास
In reply to माहितीपूर्ण लेखमालिका ! by रामदास
हवाई सुंदर्यांबद्दलही चार शब्द लिहावे असे म्हणून बघतो.काका आत्ता ट्यूब पेटली की एयर इंडिया मध्ये मध्यमवयिन (किवा ओल्ड वाइन) हवाईसुन्दरीना का निवृत्त करत नाहीत ते :) (उड्डाण प्रेमी) शॅम्पेन
In reply to एक शंका : पूर्व दिशेला ९० by बिपिन कार्यकर्ते
In reply to ०००, ०९०, १८०, २७० असे तीन by गवि
In reply to मस्त माहिती by कपिलमुनी
बळी पडलेलं डॉर्नियर २२८-२१२ विमान असं असतं.
नंबर दोन आणि तीनचे छायाचित्र : जालावरुन साभार.
या अपघातात, तरुणी सचदेव, आणि तीच्या आईचाही मृत्यू झाला आहे. तरुणी सचदेव म्हणजे 'आय लव्ह यू रसना'... असे म्हणत आपल्या निरागस हास्याने जाहिरातीतून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ‘रसना गर्ल’
एक शंका. वारा २०० किमी वेगाने