मोगरा सरबत
नमस्कार,
साहित्य :
पाव किलो मोगर्याच्या ताज्या कळ्या,
५ लिटर पाणी ,
अर्धा किलो साखर , चिमूटभर मीठ.
कॄति :
मोगर्याच्या कळ्या थंड पाण्यात स्वच्छ धुवून घेणे.
५ लिटर पाणी उकळण्यास ठेवा , चांगले उकळले की त्यात साखर घालून अजुन २० मि. उकळवावे.
चिमूटभर मीठ घालून पाणी गाळून घ्यावे.पूर्णं थंड झाल्यावर त्यात मोगर्याच्या कळ्या घालून झाकण ठेवून २ तास ठेवावे.
परत एकदा पाणी ५ मि. उकळवून घ्यावे ( फुलं काढून घेउन )
थंड झाल्यावर परत एकदा फुलं त्यामधे घालून अजून २ तास ठेवावे.
नंतर फुलं काढून टाकावी आणि गाळून एका बाटलीत भरुन फ्रीजमधे ठेवावे.
सर्व्ह करते वेळेस १ : २ भाग थंड पाणी मिक्स करून सर्व्ह करावे.
वाचने
4376
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
अरे वा,
मोगरा न फुलला...
In reply to मोगरा न फुलला... by मदनबाण
हो
अर्रर्रर्रर्ररे...........
In reply to अर्रर्रर्रर्ररे........... by प्राजु
गुलाब शरबत
कल्पना चांगली आहे