देवळातला शंकर
एकदा शंकर देवळात
कान उघडुन बसला
भक्तांच्या ललकाय्रा ऐकुन
खुदकन मनात हसला
भं...भोले..ही अरोळी
खरोखरच छप्परतोड
कुणाच्या मनाची जखम
तर कुणाचा नुसताच फोड
माझ्याकडे येणारे असेच
कुणी शांत,कुणी भेदरलेले
आयुष्याच्या कलहात
कुणी मिटलेले,कुणी विटलेले
होते काहो ती अरोळी..
जीवनरोगाचे औषध?
का थोड्या वेळाचं मलम
नी शेवटी नुसतीच खदखद
तुंम्ही म्हणाल या खेरीज
दुसरा जालीम उपाय काय?
का तुंम्हीही अमच्यासारखेच..?
समस्या आली...की बाय बाय
मी तुम्हाला सांगेन...की
मीही तुमच्यातलाच आहे
फार पूर्वी माणुस होतो
अता मात्र 'देव' आहे
मोडुन टाका ते देऊळ
अणी मुक्त करा मला
माझा आधार..कशाला?
एकमेकांचा घेऊ...चला..!
पुरे झालं माझं नाव
अणी माझ्या नावाची सत्ता
हज्जारो वर्ष हेच चाल्लय
तुंम्ही शेंगदाणे...नी...मी खलबत्ता !
या कूट समस्येवर
येकच जालीम उपाय
जे माझं देवपण गातात
त्यांच अजाबात ऐकायचं नाय
नायतर रहा मनःशांती मिळवत
ती मार्क्स ची अफुची गोळी
मंजे तुमी व्हाल सरपण
अणी भाजाल त्यांचीच पोळी
जात आहे...धर्म आहे..
त्यांना कुटायला कमी काय ?
बघा कधी समजलं तर...
पुन्हा भेटूच...सध्या.. बाय बाय...
वाचने
5879
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
मस्त रे.. सुंदर..
कविता आवडली.
In reply to कविता आवडली. by पैसा
@- याच्या पुढची पायरी म्हणजे
In reply to @- याच्या पुढची पायरी म्हणजे by अत्रुप्त आत्मा
पहिलेकडवे वाचून कविता कोणत्या
एका देवाचे आत्मवृत्त...
In reply to एका देवाचे आत्मवृत्त... by अभिजीत राजवाडे
अर्धवट राव,जाई,अणी अभिजीत
छान
मस्त
आवडली
वल्ली...मि.का..दोघांनाही
भटजी तुमचा धंदा बंद पडंन न हो
In reply to भटजी तुमचा धंदा बंद पडंन न हो by वपाडाव
@---भटजी तुमचा धंदा बंद पडंन
In reply to @---भटजी तुमचा धंदा बंद पडंन by अत्रुप्त आत्मा
:)
In reply to @---भटजी तुमचा धंदा बंद पडंन by अत्रुप्त आत्मा
चुकलो ओ साहेब.... जीव देउ का
In reply to चुकलो ओ साहेब.... जीव देउ का by वपाडाव
जीव
In reply to चुकलो ओ साहेब.... जीव देउ का by वपाडाव
@--- जीव देउ का आता?--- नका
दुर्दैव !
In reply to दुर्दैव ! by परिकथेतील राजकुमार
@--- मिपासारख्या प्रगल्भ ,
मस्त !!!
In reply to मस्त !!! by धन्या
@--- एखादे दिवशी एखादा देव