माझी म्हैस
एका डोळ्यानं आहे जरी थोडी तिरळी
माझी म्हैस गुणाची आहे काळी काळी ||धृ||
कात्रिना नाव तिचे फार शोभून दिसते
हाय बेबे! म्हटलं तर शेपूट हलवते
मला डाऊट हाय ती पार्लरला न्या म्हणते
जसं नटून सजून होईल ती गोरी गोरी ||१||
शिंगे तिची वाकडी घाटदार छान
दुरून बघीतले तर बदामाचे सिम्बॉल
प्रत्येक रेड्याला वाटते ते आव्हान
तिच्यासाठी गोठ्याबाहेर लावतात लाईन
योग्य वर तिला आता शोधा हो कुणीतरी ||२||
पाण्यात बसण्याची भारी तिला आवड
नदीवर जाते नेहमी ती काढून सवड
तिला रोज मी धुतो तरी रंग नाही जाणार
माहीत आहे मला पण तिला कोण सांगणार
यंदाच्या मिस इंडीयाची करा म्हणते तयारी ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/०९/२०११
काव्यरस
वाचने
4357
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
अ प्र ति म! पाभे यांना
१०१% नं सहमत!! संपुर्ण
In reply to अ प्र ति म! पाभे यांना by इंटरनेटस्नेही
पाषाणभेद -मस्त ,झकास
वर्णभेदी
अरे बापरे! आता मौजेच्या
In reply to वर्णभेदी by निनाद
हाहाहा... पाभे, झक्कास कविता.
In reply to अरे बापरे! आता मौजेच्या by पाषाणभेद
तुमची म्हस आनी तुमी दोगांन्ना
म्हैसत्री मंत्र
प्रिय चित्रगुप्त साधक,सदरहू
In reply to म्हैसत्री मंत्र by चित्रगुप्त
_/\_
In reply to प्रिय चित्रगुप्त साधक,सदरहू by पाषाणभेद
शक्तिदेवता
"भुकंबलीतमः वेदोपदेश" हा
In reply to शक्तिदेवता by चित्रगुप्त
पाभे फॉर्मात
In reply to "भुकंबलीतमः वेदोपदेश" हा by पाषाणभेद
गानं आवल्ड
लै ब्येस