झट्पट आप्पे
- २ वट्या मुगाची डाळ (सालीसकट or सालीशिवाय) दोन तास भिजत घाला.
- दोन तासानन्तर डाळ साधारण दुप्पट होइल.
- जास्तिचे पाणी काढुन हि डाळ, २ मिरच्या, २ लसुण पाकळ्या, १/२ इन्च आल, बारीक चिरलेलि कोथिम्बिर, चविनुसर मीठ आणि किन्चित हिन्ग घालुन mixer मधुन वाटुन घ्या.
- हे मिश्रण जाड्सरच राहु द्या.
- आता वरुन थोडे जीरे, बरिक चिरलेला कान्दा घालुन आप्पे-पात्रामधे आप्पे बनवा.
मी हे Maggie Hot n Sweet Ketchup बरोबर serve केले. तुम्हि हे पुदिन्यच्या चट्णी बरोबर अथवा ओल्या खोबर्याच्या चट्णी बरोबर serve करु शकता.
हि अतिशय सोप्पी, tasted आणि tested पा.क्रु. आहे!!
मिसळपाव वर माझ हे पहिल-वाहिल लेखन आहे. तेव्हा चुक भुल देणे घेणे!
वाचने
10360
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
मिपावर स्वागत आहे.
पहाटे पहाटे असले फोटोविरहीत पाकृ चे लेख बरे वाटतात.
हा घ्या फोटो!!
In reply to हा घ्या फोटो!! by नव-वधू
तमाम नाईट शिप्ट करणार्या आय टी कामगार बंधूंकडून आपला जाहिर निषेध. पोटात भुकेने खड्डा पडल्यानंतर असल्या चमचमीत पाकृ दाखविणे हा आंतरजालावरील एक गुन्हा समजण्यात यावा.
तांदूळ-उडिद डाळ किंवा रव्याचे आप्पे ठाऊक होते. हे मुगाच्या डाळीचे वेगळेच दिसतात. करून पहायला हवे.
आप्पे जसे तिखटमिठाचे करतात तसेच गोडाचे देखिल करता येतात. तेही छान लागतात.
फोटोवरून छान झाले असावेत याचा अंदाज येतोय.
फोटो आणि पाकृ छान
सोपी पाककृती
फोटो पण छान
आप्पेपात्र कस असत?
ईडली बनवायला वापरतात तस असत का?
In reply to सोपी पाककृतीफोटो पण by जाई.
एक प्रकारचा तवा आहे असे म्हणायला हरकत नाही.
पुर्वी बिडाचे असे. आता निर्लेपचेसुद्धा मिळते.
ते वापरायला (आणि कॅलरी कॉन्शस असणा-यांसाठी) फारच चांगले आणि सुटसुटीत असते.:) :-) :smile:
अजून फोटो येथे बघा.
In reply to आप्पेपात्र by चिंतामणी
दगडी सुद्धा असायचे.
In reply to आप्पेपात्र by चिंतामणी
येस्स
तवाच आहे
धन्यवाद
फोटो आणि पाकृ दोन्ही उत्तम
फोटो आणि पाकृ दोन्ही उत्तम
फोटो आणि पाकृ दोन्ही उत्तम
माउस खराब झाल्याने प्रतिक्रिया रिपीट झाल्या
क्षमस्व
मूगडाळीचे आप्पे कधी खाल्ले नाहीत करुन बघावे लागतील.
Positive Comments बद्दल ध्यन्यवाद!! आप्पे पात्राचा फोटो कोलज च्या right bottom ला आहे. मी non-stick वपरते. पण आईकडे बीडाचे पात्र वापरतात.
छान. असं आप्पेमेकर आणलं पाहीजे.
बाकी तुम्ही नववधु कधीपर्यंत राहणार? नाही म्हणजे नंतर नाव बदलणार का?
वा आवडलं, छान आमच्याकडे साधारण इडलीचं जे पिठ असतं त्याचेच करतात,
असो, तवा छान आहे........ आणि पाक्रुपेक्षा मला त्या करणा-यांची भांडी जास्त आवडतात असा इतिहास आहे.
@ शिल्पा ब, तुम्हि वर अप्पेमेकर लिहिलंय ते वाचताना एकदम अप्पा जोगळेकर वाचलं, आणि जाम हसु आलं. असो.
नक्की करुन पाहिन..विकांताला
खुपच मस्त आहे गं... मी ह्याच मिश्रणाचे घावन करते. आता एकदा आप्पे करुन बघितले पाहिजेत. :)
मिपावर स्वागत आहे. पहाटे