रारंग ढांग - एक सो सो पुस्तक !
In reply to हे पुस्तक आमच्या ईच्छा यादीत by धन्या
In reply to धागा शतकी होणार हे नक्की. by आदिजोशी
In reply to असहमत by सहज
In reply to मलाही पुस्तक खूप आवडले. by पक्या
In reply to एक by रमताराम
किंबहुना इथे लष्कर ही एक प्रातिनिधिक व्यवस्था आहेअगदी बरोब्बर वर्मावर बोट ठेवलंत तुम्ही. व्यवस्थेच्या आंधळेपणामुळे कित्येक बळी पडतात. त्यांची समाधी म्हणून बांधलेले स्तंभ त्या चुकांची भरपाई करतात. ते स्तंभ बांधण्यासाठी व्यवस्थेबाहेर काम करावं लागतं. असं काम करण्यापोटी सन्मान होण्याऐवजी कोर्ट मार्शल होणं ही त्या रिजिडिटीची परिसीमा. एकदा अशी कर्मठ व्यवस्थेची घडी बसली की मग ती बदलण्यासाठी प्रयत्न करणंही अशक्य होतं हे या पुस्तकात अतिशय सहजपणे सांगितलेलं आहे. लष्कराच्या शिस्तीप्रमाणेच धार्मिक कठोरतेलाही हे लागू पडतं. यातला संघर्ष हा कुठेही शब्दबंबाळ झालेला नाही, साध्या प्रसंगांतून प्रवाहीपणे आलेला आहे. उत्तम संदेश, रंजक मांडणी, जिवंत पात्रं, पकड घेणारी कथावस्तू, एक वेगळी पार्श्वभूमी - चांगल्या पुस्तकात आणखी काय हवं?
In reply to एक by रमताराम
बाकी तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते. असोतुमच्या सहानुभूतीबद्दल आभारी आहे. :)
In reply to एक by रमताराम
ह्याबद्दल काय लिहावं? मलाही अतिशय आवडणारी कादंबरी. मुळात पेंढारकर सिनेमावाले...त्यामुळे ही कादंबरी एखाद्या पटकथेसारखी चित्रदर्शी आणि रोचक. श्रामो म्हणतात त्याप्रमाणे ऊंट मरणे वगैरे प्रसंग एकदम दिग्दर्शकाने घेतल्यासारखे सूचक. अशीच गुंतवून ठेवणारी शैली त्यांच्या "अरे संसार, संसार.." आणि "चक्रीवादळ" ह्या कादंबार्यातही दिसते. पण 'रारंग ढांग' ते रारंग ढांगच!!! ह्या इतक्या सुंदर कथेवर चित्रपट का नाही बनला हे खूप बर्षे माझ्यासाठी कोडेच होते. सुमित्रा भावे आणी सुनील सुकथनकर ह्यांच्याबरोबर एका "स्क्रिप्ट रायटींग' च्या कर्यशाळेत ह्याच्यावर उत्तर सापडले. सेन्सॉरने म्हणे परवानगी नाकारली कारण पुस्तकामुळे संरक्षण दलांबद्दल फारच निगेटीव्ह प्रतिमा होते. मी कॉलेजात ११-१२ वीत असतांना आमच्या मित्रांपैकी कित्येकांना डिफेन्स मधे जायचे भूत होते.... पण NCC तील seniors चे बेताल आणि मुजोर वागणे, त्यातल्या अधिकार्यांचे असंवेदनशील वर्तन ह्याबरोबरच 'रारंग ढांग' हे मला NDA पासून दूर ठेवण्याचे एक प्रबळ कारण होते. मला मानव आणि निसर्गापेक्षाही हा माणूस आणि व्यवस्था ह्यांच्यातला संघर्ष वाटतो. शेवटी विश्वनाथला विचारलेला प्रश्न "तुला अपेक्षित्/अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य तुला ह्या बाहेरच्या जगात तरी मिळेल का?" ह्या प्रश्नाने पुस्तकाच्या बाहेर अयुष्यातही खूप वेळा छळले आहे. मुळातील मनस्वी, स्वच्छंद स्वभावामुळे, "तुला जे मनापासून करायचे आहे, ते खरच करता येईल का?" हा प्रशन वेगवेगळ्या रुपात भेटतच राहतो! हिमालयातील उंचावरचे रस्ते बघतांना कुठेतरी 'रारंग ढांग' मनात घुटमळता राहिले... इथेच कुठेतरी विश्वनाथने 'ते' स्मारक बांधले असेल का असा वेडा विचारही मनात येऊन गेला! :) नंतर मग कधीतरी, कुठल्या ना कुठल्या कारणाने रारंग ढांग मधले मला भावलेले, कुठेतरी आत रुजलेल/रुतलेले प्रसंग मनात कळत-नकळत उमटत राहतात...कधी बोलतांना संदर्भ म्हणून (आणी समोरच्याने ते पुस्तकच वाचले नसेल तर मग एक अशक्य तगमग होते...) तर कधी एखाद्या ब्लॉग-पोस्टमधे माझीच अस्वस्थता व्यक्त करतांना. 'रारंग ढांग' मला आवडते ते मुलतः त्यातील विश्वनाथच्या अंतर्गत संघर्षामुळे...आणि कित्येक वेळा आयुष्यात प्रसंग/डिटेल्स वेगळे असले तरी प्रश्नांचा पॅटर्न बराचसा सारखा असतो असे वाटते. वेळ आल्यास, स्वतःला खरच योग्य वाटणार्या निर्णयामागे खंबीरपणे उभे रहाण्याची आंतरीक शक्ति मिळावी, किंबहुना ती मिळवावी अशी तीव्र इच्छा प्रत्येकवेळेस हे पुस्तक वाचतांना होते. तशी आंतरीक शक्ति माझ्याकडे आहे का? प्रामाणिकपणे सांगायचे तर ह्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर आजतरी माझ्याकडे नाही, पण ते तसे असावे ह्याची प्रेरणा देणार्या पुस्तकांत 'रारंग ढांग' चे स्थान खूपच वर आहे!अजून दोन लेख ह्या पुस्तकाविष्यी - http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6-%E0%A5%A7 http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%AF
In reply to एक by रमताराम
In reply to एक by रमताराम
In reply to एक by रमताराम
In reply to शैलीचे चोचले म्हणजे चावटपणा? by कौन्तेय
व्यं माडगूळकरांची पुस्तकं वाचून काय त्यांचा चावटपणाच नुसता घेतलात का?एकतर माडगुळकर चावट होते की नव्हते हे मला माहित नाही.. तरीही मी त्यांचा चावट्पणा घेतल्याचे तुम्हाला कुठे दिसले? की आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला?
In reply to शैलीचे चोचले म्हणजे चावटपणा? by कौन्तेय
In reply to व्यं माडगूळकरांची पुस्तकं by अप्पा जोगळेकर
In reply to सपशेल माघार! by कौन्तेय
स्वतःची चूक निदर्शनाला आल्यावरही तिच्याबद्दल काही न बोलता, मूळ मुद्द्याला बगल देत चर्चा तिरकी तिरकी चालवत राहण्याचा मिपा.चा प्रघात मी मोडत आहे याचीही मला रास्त कल्पना आहे. त्याबद्दलही क्षमा मागावी का?मला हा प्रश्न विचारलेला नाही असे समजतो. पण धागा मी काढल्याने व तुम्ही चावटपणाचे बालंट माझ्यावर घेतल्याने तुम्हाला उत्तर देण्याची तोशीस देतो. बाकी माझ्या मनात काहीही किल्मिष नाही याबद्द्ल खात्री बाळगा. :) अरे काय राजेहो.. बिलकुल बिनदिक्कत आरोप करा.. लोकांना भंडावून सोडा... टपल्या मारा ... मजा करा इथे मिपावर! पण त्यापूर्वी इथल्या खट - उध्दट समुदायातील सदस्याची आधी ओळख तर करुन घ्या ;-) कदाचित तुम्ही इथले शिनियर सदस्य असाल... पण तरीही ओळख तर झालीच पाहिजे ना? तुम्ही स्वत: ची चूक निदर्शनाला आल्यावरही... मू़ळ मुद्याला बगल देत चर्चा तिरकी तिरकी चालवत राहाण्याचा प्रघात मोडण्याबद्दल लिहीलं वगैरे लिहीलं आहे... मान्य आहे... एवढं म्हणालात तरी.. तोच तुमचा दिलदारपणा .. त्याबद्दल मी आभारीच आहे... क्षमा बिमा च्यायला आजच्या काळात हे शब्द वापरात तरी आहेत का त्याबद्दल साशंक आहे.. म्हणून नो कॉमेंट. माघार वगैरे घेऊ नका ;-) कारण मिपावर माघार! शक्य नाही. काय??
In reply to स्वतःची चूक निदर्शनाला by यकु
In reply to शीनीयर - टपल्या by कौन्तेय
In reply to हे पुस्तक मला आवडले की नाही by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to इतकी मिळ्मिळित प्रतिक्रिया by माझीही शॅम्पेन
In reply to >>इतकी मिळ्मिळित प्रतिक्रिया by विश्वनाथ मेहेंदळे
माझा पुढील धागा असेल. "शोले - एक टुकार आणि ओव्हररेटेड चित्रपटओके माझा पुढचा धागा असेल अण्णा ! एक डोक्या पासून पाया पर्यंत भ्रष्टचारी सामान्य मानव :) (मार खातोय आता ..पळा :))
In reply to हे पुस्तक मला आवडले की नाही by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to इतकी मिळ्मिळित प्रतिक्रिया by माझीही शॅम्पेन
अरे मीपकरानो जे पुस्तक आवडेल त्या बद्दल लिहाकीआयडीया चांगली आहे... लिहा राव.. लवकर लिहा.. मज्जा येईल..
In reply to मला हे पुस्तक प्रचंड आवडलेलं by बिपिन कार्यकर्ते
In reply to प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे by यकु
In reply to >>दुनियादारीनं पकड घेतलीय. मग by विश्वनाथ मेहेंदळे
मग रारंग ढांग आवडले नाही यात नवल नाहीब्वॉर्र्! ब्लडी सिव्हीलियन!! ;-)
In reply to मग रारंग ढांग आवडले नाही यात by यकु
हे पुस्तक आमच्या ईच्छा यादीत