कोलंबीचे सुके,कोलंबीचे दबदबीत आणि तळलेले सौंदाळे.
१)कोलंबीचे सुके.
साहित्यः-१)कोलंबी.
२)खवलेले खोबरे.
३)हळद.
४)तिखट.
५)मिठ.
६)बारीक चिरलेला कांदा.
७)२-३ आमसुले.
८)बटाट्याच्या लहान फोडी(optional)
कृती :-प्रथम कोलंबी साफ करुन घ्यावी.साफ करतांना डोकी कोलंबीलाच ठेवावी.काढू नये.म्हणजे त्याचा वास
सुक्याला चांगला येतो.
कोलंबी,चिरलेला कांदा,हळद्,तिखट,बटट्याच्या फोडी एकत्र करुन त्यात थोडे पाणी घालून शिजत ठेवावे.
अर्धवट शिजले की त्यात मिठ घालावे.पूर्ण शिजल्यावर खाली काढण्यापूर्वी दोन मिनिटे आधी आमसुले व
खोबरे घालावे. निट ढवळून खाली उतरवावे.
२)कोलंबीचे दबदबीत.
साहित्यः-१)कोलंबी(वरिलप्रमाणे साफ केलेली)
२)बारीक चिरलेला कांदा.
३)खवलेले खोबरे.
४)हळद.
५)तिखट.
६)मिठ.
७)८-९ काळी मिरी.
८)चिंच.
९)एक टेबलस्पून खोबरेल तेल्(फोडणीसाठी).
१०)बटाट्याच्या बारीक फोडी(optional)
कृती :-प्रथम एका भांड्यात खोबरेल तेल घालावे.तेल तापले की त्यात एक चमचा बारीक चिरलेला कांदा घालावा.
कांदा लालसर झाला की त्यात कोलंबी घालावी.त्यातच उरलेला बारीक चिरलेला कांदा(एक चमचा
वाटपात घालण्यासाठी बाजुला काढावा.)घालावा.तसेच हळद,तिखट,बटाट्याच्या फोडी व थोडे मिठ घालावे.
चांगले ढवळून थोडे पाणी घालून शिजत ठेवावे.मिक्सरच्या भांड्यात खवलेले खोबरे,काळी मिरी,कांदा व चिंच
थोडे पाणी घालून जाडसर वाटून घ्यावे.कोलंबी शिजली की हे वाटण त्यात घालावे.उरलेले चवीप्रमाणे
मिठ घालावे.ढवळून चांगले उकळले की गॅस बंद करावा.चपाती,भाकरी कशाहीबरोबर हे दबदबीत मस्त
लागते.
३)तळलेले सौंदाळे.
साहित्यः-१)सौंदाळे.
२)हळद.
३)तिखट.
४)तांदळाचा बारीक रवा(नसल्यास गव्हाचा रवा व थोडी कणिक)
५)मिठ.
६)तळण्यासाठी तेल.
कृती :-सौंदाळे साफ करून त्याला मिठ लावून ठेवावे.बाकी माश्यांपेक्शा जरा जास्त वेळ मिठ लावून ठेवावे लागतात.
मासे धुवून त्याला हळद,तिखट व चिमुटभर मिठ लावावे.तांदळाच्या रव्यात घोळवून तेलात चुरचुरीत तळावे.

वाचने
9305
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
वाह सौंदाळे अतिशय चविष्ट
वाह वाह
In reply to वाह वाह by विनायक प्रभू
होय,अस्सल कोकणी.
मस्तच...आवडले
छान.
छळ
In reply to छळ by कच्ची कैरी
अगदी
श्रावणमासि प्रत्येक
श्रावणमासि प्रत्येक
वा वा छान.
सौंदाळे म्हणजे कसले मासे ?
तोंपासु!