मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गगनावरी तिरंगा ....!!

गंगाधर मुटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
तिरंगा गगनावरी तिरंगा ....!! गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!! तू प्राण भारताचा, शक्‍ती ध्वजा-पताका संगे हिमालयाला येण्यास मार हाका समवेत घे सह्यांद्री, मेरूस ये म्हणावे ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!! साथीस ब्रम्हपुत्रा, गोदावरी नि यमुना धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!! तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी ही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी आता अभय मनाच्या धुंदीस या जपावे ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!! . गंगाधर मुटे

वाचने 3555 वाचनखूण प्रतिक्रिया 10

नंदू Sun, 08/15/2010 - 11:36
वाचून जरा बुचकळ्यात पडलोय. गगनांबर म्हणजे काय बुवा? भारतभर फक्त मराठी वस्तीच का दिसावी? इतर देशबाधवांचे काय? बाकी समयोचित कविता. नंदू

गंगाधर मुटे Mon, 08/16/2010 - 07:43
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद. गगनांबर म्हणजे काय बुवा? गगन म्हणजे अंबर म्हणजे आकाश. गगनांबरी हा शब्द उलगडून नाही सांगता येणार पण गगनात किंवा अंबरात म्हणण्यापेक्षा गगनांबरी या शब्दाचे फिलिंग जरा वेग़ळे असते. तसेही आपण दैनंदिन जीवनात फार-फार, खुप-खुप, आयाबाया वगैरे शब्द वापरत असतोच. त्याचे कारण एकच की फिलिंग जरा वेग़ळे असते. भारतभर फक्त मराठी वस्तीच का दिसावी? इतर देशबाधवांचे काय? कवितेत फक्त मराठी वस्तीच दिसावी असे म्हटलेले नाही. सर्वत्र मराठी वस्तीही दिसावी असा त्याचा अर्थ अपेक्षित आहे. तरी पण लिहितांना काय व्यक्त केले यापेक्षा वाचतांना काय व्यक्त होते,हे महत्वाचे आहे. म्हणुन बदल केलेले आहे. आणि तशी विनंती संपादक मंडळास केली आहे. तृटी लक्षात आणुन दिल्याबद्दल आभारी आहे.