हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका
लेखनविषय:
काव्यरस
हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका
ऊठ मर्दा ऊठ
आवळून घे मूठ
हाण त्याच्या टाळक्यात
पायामधला बूट
सत्तेपुढे शहाणपण
जेव्हा व्यर्थ जाते
माणुसकीचे लचके तोडून
लाचखोर खाते
पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
अन्यायाची सीमा जेव्हा
मर्यादेला लांघते
तुझे हक्क तुडवून
तिरडीवर बांधते
शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
पोशिंद्याच्या छाताडावर
हरामींच्या मौजा
तेव्हा राज्य करतात
लुटारूंच्या फौजा
सत्ता आणि दलालांची, कर ताटातूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
माय तुझी बैलावाणी
राबराबून मेली
गल्लीमध्ये मुळं अन्
दिल्लीमध्ये वेली
अभयाने शोध घे, कोणी केली लूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
गंगाधर मुटे
-------------------------------------------------
वाचने
4591
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
वाहवा... बरेच दिवसांनी
वाहव्वा मुटे साहेब
सह्ही!
मस्त जमलय हो
हाण्ण तिच्या ****!!!
लय भारी!! एकेक कडवं ठासून
आक्रमक विचार मांडण्यासाठी लय
In reply to आक्रमक विचार मांडण्यासाठी लय by राजेश घासकडवी
लय
वीररसपूर्ण छान आहे तडका.
खणखणीत
तडका उत्तम आहे... आवडेश...
तुमच्या कवितेतिल 'अन' शब्दाने
In reply to तुमच्या कवितेतिल 'अन' शब्दाने by सौन्दर्य
अन शब्दाचा परीणाम
दिवास्वप्न!!!
In reply to दिवास्वप्न!!! by पिवळा डांबिस
चप्पल
आभार
खुप छान!! मस्त
नागपुरी तडका...
श्री प्रमोद देव, मुंबई यांनी
मस्तं कविता आहे. जनतेनेच आता
नेत्यांना इथल्या आता देउ नका