मटा चे महान मद्यप्रेम!
मटा चे महान मद्यप्रेम!अंमळ गल्लत होते आहे का? कँपेन निट वाचली तर टाईम्स ग्रुपने कुठेही मद्यपान अथवा मद्यविक्रीला प्रोत्साहन दिल्याचे जाणवत नाही. हान, इंग्रजीचे मराठीत भाषांतर करताना कदाचित वापरल्या गेलेल्या शब्दांमुळे गैरसमज झाला असण्याची शक्यता आहे. सकाळीच टाईम्स ग्रुप मधील एका जबाबदार व्यक्तिशी ह्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी टाईम्सचा ह्या कँपेनमागचा उद्देश लक्षात आला. मुळात २५ वर्षे हा वयाचा आकडा कुणी आणि कुठल्या निकषावर निश्चित केला आहे ? वयाच्या १८ व्या वर्षी जो युवक ( / युवती) देश चालवणारे सरकार निवडू शकतो, सीमेचे रक्षण करु शकतो, वाहन परवाना काढू शकतो तो युवक मद्यपाना सारख्या वैयक्तिक निर्णयाच्या बाबतीत मात्र अपात्र कसा ठरु शकतो ? हा अधिकार त्याला का नाही ? आज हा निर्णय मद्यपाना संदर्भात घेतला गेला आहे. कदचित उद्या गाडी चालवणे, आईसक्रिम खाणे, शहराबाहेर पिकनिकला जाणे अशा टूकार कारणांसाठी देखील घेतला जाऊ शकेल. आणि ह्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते आणि ह्याचा फायदा शेवटी कोणाला होतो हे आपण जाणताच. वयाचा निकष, फक्त आणी फक्त वयाचा निकष ह्या एकाच मुद्याच्या विरोधात हे कँपेन सुरु करण्यात आलेले आहे. टाईम्स ग्रुपच्या कँपेनबद्दल गैरसमज नसावा म्हणुन हा खुलासा. ह्याच मुद्याच्या विरोधात अभिनेता इम्रान खान देखील न्यायालयात सरकार विरुद्ध लढत आहेच. धन्यवाद.
In reply to मटा चे महान मद्यप्रेम! अंमळ by परिकथेतील राजकुमार
टाइम्स म्हणते "It's my life. If you can't help, at least do not hinder." याच मटाने हेल्मेटसक्तीच्या कायद्याचे स्वागत केले होते. त्यावेळेस यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याला काय धाड भरली होती. आणि पिण्यावर बंधने आली तर नक्की काय hinder होणार आहे ते तरी नक्की कळु देत. It's my life. If you can't help या वाक्याचाही उद्देश कळत नाही. सरकारने नक्की काय हेल्प करणे टाइम्सला अपेक्षित आहे?
टाइम्स असेही म्हणते की संसदेत गदारोळ घालणार्या राजकारण्यांना आमच्यावर अशी बंढने घालणारे कायदे करण्याचा हक्क नाही. मग तसे म्हतले तर सरकारला एकही कायदा करण्याचा हक्क नाही. प्रत्येक कायद्यासाठी ही बोंब का नाही मारत? आणि समजा हा कायदा पृथ्वीराज चव्हाणांच्या डोक्यातुन निघाला आहे तर त्यांनी नक्की कधी असभ्य वर्तन केले आहे. ते त्यांच्या सज्जन वागणुकीसाठीच प्रसिद्ध आहेत ना?
टाइम्सचे असेही म्हणणे आहे की हा कायदा भ्र्ष्टाचार आणि पिळवणुकीचे आश्रयस्थान होइल. नक्की कसे? सध्याच्या कायद्याचीही जिथे नीटशी अंमलबजावणी होत नाही तिथे या कायद्याची काय होणार. मग पिळवणुक होइलच कशी. आणि कायदा मोडल्याबद्दल शिक्षा झाल्यास ती पिळवणुक कशी ठरेल.
टाइम्स एक गोष्ट मात्र बरोबर विषद करते: "This is not about drinking. This is about respect and liberty. This is about arbitrary and autocratic exercise of power"
वरीलपैकी अधोरेखित वाक्ये माझ्यामते महत्वाची आहेत. कायदे करा. पण त्याच्यामागे योग्य असे तर्क आणि युक्तिवाद असु देत. आणि दुर्दैवाने २५ वर्षाच्या वयोमर्यादेमागे ते नसल्यामुळे मी या कायद्याचा पुरस्कार करु शकत नाही
In reply to तारतम्य by मराठी_माणूस
भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या विरोधातील लेख मात्र भरभरुन छापतात.कै-च्या कै मुद्दा अमान्य , एकन्दरिन्तच टाइम्स समूहाने आंदोलनाच्या विरूढा साठी काय केल ते पहिले सांगा ? टाइम्स नाउ ने जितक कवरेज दिल तास इतर कोणीच दिल नाही !!!
In reply to भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या by माझीही शॅम्पेन
In reply to जुने अंक by मराठी_माणूस
In reply to आचार्य अत्रे आज हयात असते तर by नितिन थत्ते
In reply to अरेरे ... by छोटा डॉन
In reply to आचार्य अत्रे आज हयात असते तर by नितिन थत्ते
In reply to जरतर by मराठी_माणूस
In reply to टिळकांना पण सुपारीच व्यसन by परिकथेतील राजकुमार
In reply to टिळकांना पण सुपारीच व्यसन by परिकथेतील राजकुमार
In reply to जरतर by मराठी_माणूस
In reply to या संदर्भात हीही बातमी आठवली... by बहुगुणी
In reply to आवाज उठणे योग्यच! मात्र..... by ऋषिकेश
In reply to आवाज उठणे योग्यच! मात्र..... by ऋषिकेश
In reply to आवाज उठणे योग्यच! मात्र..... by ऋषिकेश
In reply to या चळवळीसाठी टाईम्सला पैसा by रामपुरी
In reply to मूळ मुद्दा, श्री. चतुरंग यांच्याशी सहमत by सर्वसाक्षी
मद्यपानोत्सुकांची तुलना सैन्यप्रवेशाचे ध्येय असलेल्या तरुणांशी करण्याला.हिंसा करण्यापेक्षा मद्यपान करणे वाईट का समजावे? सैन्य फक्त हिंसाच करते असं अजिबात नाही. देशाचं संरक्षण महत्त्वाचं आहेच आहे, शिवाय सैन्याने बांधलेले पूल, रस्ते, नैसर्गिक आपत्तींमधे सामान्य नागरीकांचं संरक्षण या सर्व गोष्टींसाठी सैनिकांबद्दल आदर आहेच; पण सैन्य हे लढाईसाठीच मुख्यत्त्वे आहे हा मुद्दा विसरता येत नाही. उगाचच "मायबाप" बनू पहाणार्या सरकारचा निषेध! अवांतरः अमेरिकेतल्या वास्तव्यात वॉर व्हेटरन्सना मदत करा म्हणून फोन आल्यावर तोंडात आलेलं वाक्य गिळलं, "व्हिएतनाम, इराक, अफगाणिस्तानात जाऊन बेछूट हिंसा करायला मी सांगितलं होतं का रे $%^&* ?"
In reply to "मायबाप" सरकारचा निषेध. by ३_१४ विक्षिप्त अदिती
चौथा स्तंभ?