मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खिद्रापूर चा कोपेश्वर मंदिर ( माहिति सोबत )

शाहिर · · कलादालन
खिद्रापूर : कृष्णा नदी तीरावर वसलेले सुंदर पण भग्न मंदीर .. या मे महिन्या मध्ये भेटीचा योग आला ..११ व्या शतकाच्या सुरुवातीला हे मंदीर शिलाहार राजा ( गन्दारादित्या , विजयादित्य आणि भोज २ रा ) कडून बांधण्यात आले .. पौराणिक कथा : देवी सती हि भगवान शिवाची पत्नी होती ..तिचे वडील राजा दक्ष यास भगवान शिव जावई म्हणून पसंत नव्हते .. दक्ष राजाने एकदा मोठा यज्ञ केला आणि शिव -सती ला बोलावले नाही ..सती ने याबद्दल राजा ला जाब विचारला असता त्याने शिवा चा अपमान केला ..ते सहन ना होऊन सती ने यज्ञा मध्ये उडी घेतली .. हे कळताच भगवान शिव क्रोधीत झाले ..आणि दक्ष राजा चा वध केला .. आणि कृष्णा तीरावर येऊन बसले ..तिथे भगवान विष्णू नी येऊन त्यांचा राग शांत केला .. म्हणून या मंदिरा ला "कोप + ईश्वर " कोपेश्वर म्हणतात .. विशेष म्हणजे या मंदिरा मध्ये नंदी नाही .. स्थापत्य : पूर्ण मंदिर ९६ हत्ती च्या पाठीवर कोरले आहे ..१०८ खांब आहेत तसेच कळसावर शिवलीलामृत कोरले आहे .. संपूर्ण मंदिर भर महाभारत आणि रामायणा मधले प्रसंग कोरले आहेत ..तसेच स्वर्ग मंडप ,यज्ञ मंडप (होमा चा धूर जाण्या साठी छत मध्ये उघडा गोल ठेवला आहे ) ..आणि गर्भ गृह आहे .. औरंगजेबा चा सरदार खैदर खान याने या मंदिरा ची तोड फोड केल्याचा ऐकण्यात आले .. आज हि हे मंदिर आपल्या प्राचीन वैभवाच्या खुणा जपत उभे आहे

वाचने 15044 वाचनखूण प्रतिक्रिया 30

प्रचेतस Mon, 06/27/2011 - 17:43
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर अतिशय सुंदर आहे. आता जरा मूर्ती भग्नावस्थेत असल्या तरी पुर्वीच्या वैभवाची स्पष्ट कल्पना येते. पुण्याजवळील भुलेश्वरच्या शिल्पकलेशी येथील काम बरेच साध्यर्म्य साधते.

In reply to by धमाल मुलगा

प्रचेतस Mon, 06/27/2011 - 21:51
हे माझे भुलेश्वरचे फोटो. शिल्पकला तर बर्‍यापैकी सारखीच वाटतीय. जैन, बौद्ध कलेची छाप तर असणारच रे, शेवटी हिंदू मंदिरांची शैली बौद्ध/जैन कलेतूनच उत्क्रांत झाली असावी आणि शेवटी त्यापेक्षाही जास्त उत्कर्षास पोहोचली.

In reply to by प्रचेतस

हरिप्रिया_ Tue, 06/28/2011 - 14:45
शैलीचे माहित नाही पण खिद्रापुराला कोपेश्वर मंदिरा सोबतच एक महावीरांच पण मंदिर आहे.. त्याच शैलीतले,त्याच काळातले.. एक मात्र नक्की दोन्ही मंदिर अप्रतिम आहेत...एकदा नक्की पाहून येण्यासारखी.. मस्त आहेत फोटो...

खुपच सुंदर शिल्पकला!! एकदा जायलाच हवे.... बाकी बर्‍याच मुर्ती जाणून बुजून विद्रुप केल्यासारख्या वाटतात. त्या मागे काही इतिहास आहे कां?

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

कवटी Fri, 07/01/2011 - 18:04
बाकी बर्‍याच मुर्ती जाणून बुजून विद्रुप केल्यासारख्या वाटतात. त्या मागे काही इतिहास आहे कां? तो औरंग्याचा खैदर्‍या का हैदर्‍या आलावता म्हणून लोवलय की वरती... तेज्यायला त्या खैदर्‍याच्या......

वाह व्वा शाहीर...लय भारी हो,काय अप्रतिम आहे मंदिर...नक्की जाऊन बघणार.फोटो भेट घडवल्याबद्दल धन्यवाद...

धमाल मुलगा Mon, 06/27/2011 - 18:38
छान आहे मंदीर. भग्न शिल्पे पाहून वाईट वाटलं. आपल्या लोकांना आपल्या सुंदर वास्तू सांभाळायची अक्कल नाही हेच खरे.

प्रियाली Mon, 06/27/2011 - 19:09
शिल्पांसोबत थोडी माहितीही हवी होती. निदान चित्रांना कॅप्शन्स तरी हवी होती.

मराठे Mon, 06/27/2011 - 20:29
फार फार वर्षांपूर्वी इथे गेलो होतो. आठवणी जागवल्याबद्धल धन्यवाद. जाणूनबूजून सुंदर मुर्ती विद्रूप करण्याची मानसिकता अजूनही गेलेली नाही (संदर्भः तालिबान्यांनी केलेले अफगाणीस्तानातील भव्य बुद्ध मूर्तींचे भंजन)

विकास Mon, 06/27/2011 - 20:54
खूप छान आहे... देवळाला कळस देखील दिसला नाही. ते तसेच आहे का कळ्स देखील भग्न केला गेला होता?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसा Mon, 06/27/2011 - 23:06
फोटो खूपच छान. पण जरा जास्त माहिती हवी होती.

५० फक्त Tue, 06/28/2011 - 06:17
मस्त फोटो आणि माहिती, जायचं कसं ते सांगाल का जरा, या महिन्यात जाउन येईन. आणि हो वल्ली म्हणतो तसं, भुलेश्वरच्या शिल्पकामाबरोबर तुलना करता येउ शकते अशीच शिल्पकला आहे. विशेषतः मंदिराला वेगळी भिंत न बांधता मुर्तींच्याच वापराने भिंत करणे.

In reply to by ५० फक्त

शाहिर Tue, 06/28/2011 - 11:13
कोल्हापूरहुन कोल्हापूर - मिरज महामार्ग हुन जावे ...नरसोबा ची वाडि हे प्रसिद्ध ठिकाण आहे..तिथे जावे .. तिथून कुरुंदवाड ला जाणारा रस्ता विचारावा ..तिथून सैनिक टाकळी मार्गे खिद्रापूर ला पोचता येते ..नरसोबाची वाडी हे सुद्धा सुंदर ठिकाण आहे ..कोल्हापूर हून अंतर ६०-६५ किमी असेल .. स्थानिका ना विचारातच गेलो होतो ..त्यामुळे अचूक माहिती नाही ...क्षमस्व

JAGOMOHANPYARE Wed, 06/29/2011 - 11:01
खिद्रापूर आमची सासुरवाडी.... दक्षयज्ञ खिद्रापुरपासून काही अंतरावर झाला. पार्वतीने नंदी तिथे पार्क केला होता. आणि त्यानंतर ती यज्ञात गेली. तो नंदी तिची वाट पहात तिथेच आहे. जवळ शिरगुप्पी की कुठले तरी गाव आहे. तिथे तो आहे.

अनुरोध Wed, 06/29/2011 - 14:06
आता मागच्याच आटवड्यात जौन आलो. फारच झकास (सुन्दर) अहे हे मन्दिर....(अनुस्वार देत येत नहिये क्रूपया कोणि सान्गावे...) अनुरोध

मालोजीराव Fri, 07/01/2011 - 13:28
कुठेच बांधकाम न करता एकावर एक कोरीव दगड रचून हे अद्भुत शिल्प उभारलंय,एकदा गेलेलो बघायला,छतावरील नक्षीकाम तर अप्रतिमच ! या भागात ठिकठिकाणी प्राचीन मूर्तींचे अवशेष सुद्धा वि‍खरू‍न प‍डलेले बघितले होते.या मंदिराला हेरीटेज दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. छायाचित्रे - भवानीसिंह घोरपडे - मालोजीराव