कोयला चिकन
साहित्यः
चिकन - ५०० ग्रॅम
टोमॅटो - ३ टोमॅटोची प्युरी
काजुची पुड - १/४ वाटी
क्रिम - ४ चमचे
लाल तिखट - ३ चमचे
हळद - १ चमचा
गरम मसाला - २ चमचे
आले-लसुण पेस्ट - २ चमचे
लिंबुचा रस - १ चमचा
तुप - ४ चमचे
कोळसा - १
मिठ चवीनुसार
पाकृ:
१. चिकनला आले-लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद, मिठ व गरम मसाला लावुन marinate करावे.
२. पातेल्यात ३ चमचे तुप गरम करावे. त्यात marinate केलेले चिकन टाकुन २-३ मिनिटे परतावे.
३. त्यात टोमॅटोची प्युरी टाकावी व झाकन ठेवुन २-३ मिनिट ठेवावे.
४. प्युरी घट्ट झाल्यावर त्यात काजुची पुड व लिंबुचा रस टाकावा.
५. गॅस वर कोळसा ठेवुन लाल होइ पर्यंत गरम करावा.
६. चिकन शिजल्यावर त्यात क्रिम टाकुन गॅस बंद करावा.
७. चिकनच्या मधे एक वाटी ठेवावी. त्यात गरम कोळसा ठेवावा. त्यावर १ चमचा तुप सोडुन लगेच झाकण ठेवावे.
८. चिकन ५-१० मिनिटे तसेच झाकुन ठेवावे.
९. गरम नान किंवा रोटी सोबत चिकन serve करावे. चिकनला आलेल्या धुराच्या flavour मुळे चव खुप छान लागते. नक्की करुन बघा. :)
६. चिकन शिजल्यावर त्यात क्रिम टाकुन गॅस बंद करावा.
७. चिकनच्या मधे एक वाटी ठेवावी. त्यात गरम कोळसा ठेवावा. त्यावर १ चमचा तुप सोडुन लगेच झाकण ठेवावे.
८. चिकन ५-१० मिनिटे तसेच झाकुन ठेवावे.
९. गरम नान किंवा रोटी सोबत चिकन serve करावे. चिकनला आलेल्या धुराच्या flavour मुळे चव खुप छान लागते. नक्की करुन बघा. :)
वाचने
8307
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
अरेच्चा अगं मी आजच बनवले आणी पाकृ पोस्ट करणारच होते...काय योगा-योग आहे :) छान दिसतयं...मस्तं.
मी मुळ संजीव कपूरच्या पा़कृत थोडे बदल केले आहे आणी बनवली ही डीश.
मी केलेल्या पाकृचा फोटो देत आहे..

In reply to अरेच्चा अगं मी आजच बनवले by सानिकास्वप्निल
मस्त दिसतंय. तु सुद्धा पाक्रु टाक.
कोयला चिकन छान. बहुतेक चार्कोल ग्रीलवर केलं तर अजुन छान लागेल.
In reply to अरेच्चा अगं मी आजच बनवले by सानिकास्वप्निल
अरे वा.... मला महितच नव्हत... मस्त.. तु बहुतेक आख्खा गरम मसाला टाकलेला दिसतोय. हे पण मस्त लागत असेल. निशांतला हे कोयला चिकन खुप आवडलं.....
In reply to अरे वा.... मला महितच नव्हत... by Mrunalini
हो अगं मी जरा बदल केला पा़कृमधे...फोडणीत खडा-मसाला व कांदा घातला आणी चिकनला दही, आले+लसुण पेस्ट, हिरवी मिरची+पुदिना पेस्ट लावून मॅरिनेट केले.
दही असल्यामुळे मी क्रिम नाही घातले बाकी पाकृ तशीच बनवली.
हो मला आणी स्वप्निलला पण कोयला चिकन खुप आवडलं :)
अगदी सोप्पं आहे ना :)
In reply to अरेच्चा अगं मी आजच बनवले by सानिकास्वप्निल
वा! हि तर डबल ट्रिट! :D
आयला ....जबरदस्त.
दोन्ही पाकृ भन्नाट. रविवार सत्कारणी लागेल असे दिसतेय.
तोपासू, बालाग, लालाला,
कसमसे..... जला तो..... बुझा ना...... कोयला (चिकन ) हो गया मै.
पा़कृ भन्नाट आहे हो.
पण आम्ही पडलो गवताळ माणसे. जरा असेच लज्जतदार शाकाहारी पदार्थ पण द्या की जरा.
In reply to पा़कृ भन्नाट आहे हो. पण आम्ही by परिकथेतील राजकुमार
आमी बी तुमच्या सारखेच...परा-(ग)-... तरीपण तुमची उपमा जबरी आहे... ''गवताळ ''...आयला लय भारी.
In reply to पा़कृ भन्नाट आहे हो. पण आम्ही by परिकथेतील राजकुमार
बंद करा हो गवताळ राहणं... ब १२ जीवन सत्वाची कमतरता होईल!
दम लागेल, छातीत धडधडेल, चेहरा निस्तेज होईल, अकारण थकाल, चिडचिडे व्हाल!!!
नको नको नको.... त्या पेक्षा कोयला चिकन खाते व्हा!
In reply to बंद करा हो गवताळ राहणं... ब by सविता
बंद करा हो गवताळ राहणं... ब १२ जीवन सत्वाची कमतरता होईल! दम लागेल, छातीत धडधडेल, चेहरा निस्तेज होईल, अकारण थकाल, चिडचिडे व्हाल!!! नको नको नको.... त्या पेक्षा कोयला चिकन खाते व्हा!एक तर आम्ही आधीच १२ चे आहोत आणि त्यातुन MH 12 चे आहोत ;) त्यामुळे असल्या १२ ब वैग्रे जीवन सत्वाची काळजी नाही. असो.. आता तुम्ही म्हणताच आहात तर इकडे कोयला कुठे मिळतो ते बघावे लागेल.
In reply to बंद करा हो गवताळ राहणं... ब by परिकथेतील राजकुमार
१२ ब
१२ ब मधला खोचक वार आहाहा ... क्या केहेने. या पर्याने आमच्या पुण्याचे नाव सार्थ केले हो.
म्रुणालीनि आणी सानिका ताई ,
दोघिन्चे पाक्रु चे फोटो काय जबरी आलेत
मस्त ! :)
दोघींच्याही पाकृंचे फोटु सुरेखच.
अग तुम्ही दोघीनी का एकाच वेळी छळ चालवला आहे :D.
ते फोटो बघुन आत्ता दिवसभर काहीही चांगले लागणार नाही..
कुठुन सकाळीच हे वाचले :(.
बाकी रेसीपी आणि फोटो एक नंबर..
पाकृ सुंदर.
एक (लघु)शंका ही पाकृ चिकनच्या ऐवजी बटाटे घालुन चांगली लागेल काय?
मारतंय पब्लिक आता. पळावे परी लोभ असावा
मस्तच.
कालच घरी कोयला चिकन बनवले होते. क्रिम एवजी दही वापरले होते. एकदम झक्कास झाले होते.
धन्यवाद मृणालिनी व सानिका.अजुन असे नवे नवे प्रकार देत चला.
In reply to लई भारी by वेताळ
अरे वा.... मस्तच....
तोंडाला पाणी सुटले!
बडे जोरसे भूक लगी कोयला चिकन चाहिये मुझे अभी :)
मस्त तर्री दिसते आहे चिकन मध्ये. तो तवंग पाहूनच पोटात कावळे ओरडायला लागलेत.
अरेच्चा अगं मी आजच बनवले