काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती
काव्यरस
रानातली वाट.. एक न संपणारा परिघ -२
कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी...
भरारल रान सारं, गंधाळली माती
गच्च ओल शिवार.. फुललेली कांती
हिरव्या पात्यावर,. मोत्यांची नक्षी
पांढर्याफटुक ढगांची रेशमी दुलई
काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती
बांधावर उभी कोवळी रानजाई
नटलेल्या सृष्टीवर आभाळाची प्रीती
कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी...
भरारल रान सारं, गंधाळली माती ||
झिम्माड गर्द रानात.. टिफण चालती
सर्जा-राजाच्या पायामधी भिंगरी फिरती
औंदाच्या पावसात बांधणार चारभिंती
घराच्या छप्पराला स्वप्न टांगली कौलांची
------------- शब्दमेघ ( १६ जुन २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ)
१. आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
३. टिपुर आशेचं दाणं
वाचने
4035
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
छान, सुरेख
शीर्षक वाचून गविंची खव आठवली.
गणेशा -खूप छान कविता.
खूप छान
फारच छान झाली आहे कविता.
मस्त कविता आहे.... पहिली दोन
In reply to मस्त कविता आहे.... पहिली दोन by किसन शिंदे
+१ असेच म्हणतो
वा! पावसाचा परिणाम फार झालेला
In reply to वा! पावसाचा परिणाम फार झालेला by नगरीनिरंजन
अहो
In reply to अहो by मिसळलेला काव्यप्रेमी
हो. अगदी बरोबर!
व्वाह!!
सुंदर..!
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे
काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती