वड बोलला यमाला
लेखनविषय:
काव्यरस
वटपूजेनिमित्त आमच्या वडाच्या भावना व्यक्त करायचा हा प्रयत्न!
वड बोलला यमाला, "हा काय जाच आहे?
बांधून घ्यायला का मी एकटाच आहे?
पूजा इथे करावी, त्रागा घरी करावा
नवर्यास त्या म्हणावे, "तू बावळाच आहे!"
हा जन्म 'जी हुजूरी' करण्यात घालवी जो,
ऐसा गुलाम साती जन्मी हवाच आहे?
आंबे, फळे, सुपार्या अन् दक्षिणा भटाला,
दोरेच फक्त माझे? ही शुद्ध लाच आहे!
वैविध्य पाहु दे ना दोन्ही गटांस आता
सांगेन जन्म त्यांचा हा सातवाच आहे!"
वाचने
14217
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
क्रान्तिकारक
मस्तच :)
अमोल
वैविध्य पाहु दे ना दोन्ही गटांस आता सांगेन जन्म त्यांचा हा सातवाच आहे!"हेच काय ते खरे!! ;) बाकी कविता उत्तम आहे. मस्त जमलीये.
.
एकदम आवडली..
In reply to सही आहे.. by मस्त कलंदर
एकदम आवडली..ऑ ??? मत कविता ग तै. हलकी फुलकी झकास .
In reply to सही आहे.. by मस्त कलंदर
कोणी आहे का (प्रेमाचा माणूस ) तिकडे मकी चा प्रतिसाद वाचायला ? ;-)
क्रांती
तुम्हारा पेड तो एकदम बगावत पर उतर आया है :-)
In reply to सही आहे.. by मस्त कलंदर
खिक्क् !!
कडक....लै भारी...सेकंड लास्ट... ही शुद्ध लाच आहे...येक नंबर
बायकांनी वडाला फेर्या मारुन त्याच नवर्याचे सात जन्माचे बुकिंग केले तरी ते कॅन्सल करण्याचा उपाय पुरुषांकडे आहे.
पुरुषांनी येड्या बाभळीला उलट्या सात फेर्या माराव्यात :)
..कविता मस्त जमलीय..
मस्त!!
तुफ्फान!!!! :)
कविता मस्तंच .. बाकी हे वटपौर्णिमा , आणि तत्सम सण केवळ मुर्खपणाचे कळस आहेत , असे माझे मत आहे ;)
- पिंपळ
मस्त आवडली कविता, नेहमीपेक्षा वेगळं लिहिलंस तु, लिहित रहा ,आम्ही वाचत जाउ.
बिचार्या वडाला किती वर्षानी कोणीतरी समजून घेतलं ना!
मस्त विनोदी
छान!
कविता आणि विडंबन एकदमच साधल्यासारखं वाटलं! ;)
-(डेरेदार)रंगा
कवीता सुन्दर,
आज पेपर मध्ये बातमी वाचली बायको बरोबर नवर्यानेही वडाची पुजा केल्याचे.मस्तच ना,सुधारणा होती आहेना समजात.
विनित
:)
-दिलीप बिरुटे
सुंदर मस्त झकास
स्वतः एक स्त्री असूनही एवढं कटू सत्य मांडायचे धाडस केल्याबद्दल क्रांतीताईचे अभिनंदन!
मस्त.. उत्तम रचना
हा.. हा..
फारच छान. सगळी कडवी छान जमलीयेत.
हा जन्म 'जी हुजूरी' करण्यात घालवी जो,
ऐसा गुलाम साती जन्मी हवाच आहे? :O
वडाला फेर्या मारते राउन्ड बाय राउन्ड,
वडाला फेर्या मारते राउन्ड बाय राउन्ड,
पुढच्या जन्मी हाच पती,
शुड नॉट बी फाऊन्ड ;)
In reply to वडाला फेर्या मारते राउन्ड बाय by पर्नल नेने मराठे
पुढच्या जन्मी हाच पती, शुड नॉट बी फाऊन्डयु वील नॉट गेट एनिथिंग एल्स , प्लिज कम डाउन टु द ग्राउंड - कर्नल वडे बटाटे
In reply to पुढच्या जन्मी हाच पती, शुड by टारझन
:(
In reply to वडाला फेर्या मारते राउन्ड बाय by पर्नल नेने मराठे
काय कडक छकडी मारली राव...हा हा हा,ही ही ही...हू हू
तळ...ले...ले...पराठे
In reply to अगं बाबो by अत्रुप्त आत्मा
आता हे कोण अजुन नविन दिवे लावणारे :-/
In reply to आता हे कोण अजुन नविन दिवे by पर्नल नेने मराठे
दिवे जुनेच असतात हो,आपण नव्यानी लावायचे
नविन मिपाकरांच्या प्रतिक्रीये वर,असे पटकन नाही कावायचे....////....
In reply to पॉवर हाउस by अत्रुप्त आत्मा
दिवे जुनेच असतात हो,आपण नव्यानी लावायचे नविन मिपाकरांच्या प्रतिक्रीये वर,असे पटकन नाही कावायचे....////....भारीच राव...
In reply to पॉवर हाउस by अत्रुप्त आत्मा
क्रान्तीची कविता आणि दिवेकरांची प्रतिक्रिया दोन्ही आवडल्या!!!
:)
In reply to वडाला फेर्या मारते राउन्ड बाय by पर्नल नेने मराठे
चुचुकाकूचे चुचुकाकाच प्रयत्न करत असतील तिने वड पुजू नये म्हणून......सात जन्मांची जन्मठेप वाचावी म्हणून.
पुढच्या जन्मी हाच ब्लड हाऊंड
शुड नॉट बी फाऊन्ड .... ?
नाही म्हणालात हे त्याचं नशीब.
छान.
धन्यवाद मंडळी. आपल्या उस्फूर्त प्रतिसादांनी आमच्या कल्पनेतला वटवृक्ष मोहरून आला.
या रचनेची प्रेरणा आहे काल सकाळी चेपुवर वाचलेल्या धोंडोपंत आपटे यांच्या भिंतीवरच्या इलाही जमादार यांच्या ओळी आणि त्या अनुषंगानं घडलेल्या जालचर्चेतील इतर काव्यं, उखाणे, प्रतिसाद यांचं मनसोक्त रसपान! ते वाचून आमच्या कल्पनेच्या वडालाही या अशा पारंब्या फुटल्या!
In reply to धन्यवाद by क्रान्ति
फुटु दे,फुटु दे अशाच अजूनी पारंब्या
सुटु दे सुटु दे प्रतिक्रियांच्या गारंब्या
कितिही कुणी.... फोडू दे मुक्त टाहो
आपुला (चा)वट व्रुक्ष,सदा बहरत राहो...
उशीरानेच वाचली गेली कविता,
मस्तच! आवडली..
स्वाती
आवडली... लिखते रहो :)
कविता आवडली, आणखी थोडी विस्ताराने हवी होती.
क्रांतीताई,
कविता आवडली. मस्त आहे.
भारी कविता क्रांतीतै! :-)
वा मस्तच ,,,वट वट सवित्री ...!!!
रोकठोक उत्तर देणारी कविता आवडली हे वे.सां.न.ल.
पुढच्या वटपौर्णिमेला गावातल्या समस्त वटवृक्षांवर ह्याच्या छापील प्रती चिटकवण्यात येणार आहेत. बाकी मिसेस वटवृक्ष काय बोलल्या असाव्यात बरं... ;)
In reply to फर्मास.. by एस
'क्रांतिकारक' धागा वर काढण्याची आमची प्रेरणा :-D
वा! फार उत्तम केलेत!
मस्तच लिहिली आहे!! :))
धागा वर आणल्याबद्दल स्वॅप्स यांचे आभार!
अगदी