मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
देशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा
तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू ||धृ|| कित्येक लढले याच्यासाठी कितीकांनी दिधले प्राण याच्याचसाठी कितीकांनी फासात घातली मान देवासमान हा आम्हास त्याचा मान आम्ही राखू ||१|| क्रांतीकारी अन समाजसेवक हाती घेवून जातसे चालत शत्रूच्याही उरात बसती उंच पाहून याला धडकी न राहू मागे आपण चला बळ तिरंग्याचे आपण दावू ||२|| युद्ध जरी हो आज नसले भय देशावरी रोजच कसले दहशत घालती दहशतवादी फुकाची करती वादावादी झाला तिरंगा निमीत्त केवळ वाद सारे आता बाजू सारून देवू ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १५/०६/२०११

वाचने 4864 वाचनखूण प्रतिक्रिया 3

वाहीदा 15/06/2011 - 18:41
फुकाची करती वादावादी झाला तिरंगा निमीत्त केवळ वाद सारे आता बाजू सारून देवू या ओळी विशेष आवडल्या :-)