संधिकाल
लेखनविषय:
संधिकाल
- - -
मीलनाचा संधिकाल
____________लाल झाला संधिकाल
:
पश्चिमेला लाल मोती-
____________शिंपल्यांचा संधिकाल
:
चांदण्यांनी शिंपलेला___
____________मोजक्याशा संधिकाल
:
कंजुषीने मोजलेल्या
____________दोन घटका संधिकाल
:
या दिनाच्या दोन घटना__
____________संधिकाल न् संधिकाल
- - -
वाचने
1790
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
बाकी चर्चा अन काथ्याकुटांच्या जंगी फडांत या नाजूक कवितेकडे कोणाचं लक्ष गेलं नाही बहुधा...
रचना सुबक आणि रेखीव झालेली आहे. आदल्या कडव्यातल्या शब्दाची ध्वनिक् पुनरावृत्ती (लाल, शिंपले, मोजले, घटका) छान साधली आहे. एक वेगळी लय देऊन जाते. संधिकाल शब्दावरचा श्लेषही आवडला. संध्याकाळ हा शब्द अर्थातच तो परिणाम साधत नाही.
इतरत्र दिलेला वरील प्रतिसाद पुन्हा इथे लिहिला आहे. पण इथे ही कविता वेगळ्या घाटात लिहिली आहे त्यामुळे या पुनरुक्तीला आणखीनच उठाव येतो. मधला एक कॉलम समान शब्दांनी जोडला गेलेला जाणवतो. मस्त.
वेगळ्याच मांडणीतली कविता आवडली, वाचताना मजा आली.
In reply to मजेशीर by दत्ता काळे
+१
असेच म्हणतो
परंतु शरदिनी ताईंनी ही कविता समजाउन सांगावी अशी विनंती करतो
चेतन
In reply to मजेशीर by दत्ता काळे
असेच म्हणतो. हाही प्रयोग आवडला.
शब्दन् शब्द सुंदर!!
खुप खुप आवडली.
नेहमीप्रमाणेच क्लासिक..!
तात्या.
कविता आवडली.