माझ्या शब्दांनी एवढे स्वस्त व्हायला नको होते!
लेखनविषय:
परवा, माळ्यावरची पुस्तके काढतांना
धुळमाखली डायरी,२० वर्षापुर्वीची..
अचानक खजिना हाती
लागल्यासारखी सापडली
तशी लेखणी तर
तुला बहाल केली होती
डायरी फक्त माझी होती
कव्हर सुंदर आहे म्हणत म्हणत
अवघी डायरी तुच जिंकुन घेतलीस
...मी मात्र शाई..शाई वेचत राहिले!
डायरी माझी, लेखणी माझी,
माझा तु, माझं ..माझं ..सर्वकाही
तसं काही विशेष मागितलं नव्हतं मी
तुझ्याकडे, भावनांशिवाय!
वाटलं होतं तु भावनांनी रंगवशील!
...तुझ्या भावना लाख महाग
असतील रे
पण माझ्या शब्दांनी
एवढे स्वस्त व्हायला नको होते!
वाचने
4999
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
आहाहा ! काय सुंदर आहे मुक्तक .. कविता अगदी हृदयातुन शब्दांना वाट करुन दिल्यामुळे इतकी फ्लॉलेस झालिये की आर्या१२३ जी ... जवाब नहि तुम्हाला ..
कोणतं कडवं निवडु ,... न कोणतं सोडु ?
सगळी कविताच आवडलीये ..
परवा, माळ्यावरची पुस्तके काढतांना धुळमाखली डायरी,२० वर्षापुर्वीची.. अचानक खजिना हाती लागल्यासारखी सापडलीएकदम साधा क्षण, पण ह्या क्षणाला तुम्ही अगदी चार ओळींत चक्क प्रत्यक्ष उभं केलंत. . आणि शेवटचं कडवं तर एकदम वास्तवाचं दर्शन घडवणारा.. अशी वन टु वन कंपॅरिझन केवळ आपणच करु जाणोत ! एक्सलंट कविता .. अजुन येऊ द्या
In reply to आहाहा ! काय सुंदर आहे मुक्तक by टारझन
सुंदर रसग्रहण.
:)
In reply to आहाहा ! काय सुंदर आहे मुक्तक by टारझन
टारु 




In reply to आहाहा ! काय सुंदर आहे मुक्तक by टारझन
प्रतिक्रिया दिली नसती तर अन्याय झाला असता.
In reply to प्रतिक्रिया दिली नसती तर by अरुण मनोहर
प्रतिक्रिया दिली नसती तर अन्याय झाला असता.कोनावर ?
In reply to प्रतिक्रिया दिली नसती तर by नरेशकुमार
कोणावर.
In reply to कोनावर नाही by गोगोल
''कण्व्हर्स' इज ऑल्सो ट्रू या 'ण्याया'नुसार 'कोनावर' हेच बरोबर आहे. :)
..तुझ्या भावना लाख महाग
असतील रे
पण माझ्या शब्दांनी
एवढे स्वस्त व्हायला नको होते!
छानच लिहिले आहेस ग!
छान आहे कविता. शिर्षक पण आवडले.
सुंदर!! :)
झक्कास मुक्तक्..खुपच आवडलं
प्रतिक्रिया दिली नसती तर अन्याय झाला असता.
---------------------------------------------------------------------------------
असेच म्हणतो.
छान.
शेवटल्या कडव्यातल्या सौद्यातली खोट फारच जिव्हारी लागल्यासारखी वाटते.
In reply to छान by धनंजय
असेच म्हणतो.
म्हणूनच आपल्याला जी आवडते त्यापेक्षा आपण जिला आवडतो त्या व्यक्तिवर प्रेम करावे असे म्हणतात. ;)
माझ्या शब्दांनी एवढे स्वस्त व्हायला नको होते!कसे दिले?
In reply to भाव by पंगा
कोनत्या मापाने पाहीजे ?
मंजे लीटर, किलो की मीटर.
.
.
लाट का माल, लाट का माल. सेल सेल सेल सेल, भव्य दिव्य सेल.
आता शब्द स्वस्त झाले म्हनल्यावर आता एका लेखावर एक फ्री मिळेल, नाही का !
सुंदर... :) आवडेश. :)
मस्त :)
अमोल केळकर
माझ्या शब्दांनी एवढे स्वस्त व्हायला नको होते!ओळ अतिशय छान .. कविता आनखिन खोल येवुद्या .. लिहित रहा... वाचत आहे
आवडली.
तशी पूर्ण कविताच नॉस्टॅल्जिक करतेय पण शेवटाचं कडवं आरपार छेदून जातंय!
छान रचना. खूप आवडली.
राघव
सुंदर.....
>>...तुझ्या भावना लाख महाग
असतील रे
पण माझ्या शब्दांनी
एवढे स्वस्त व्हायला नको होते!>>
हे खासच आवडले....
तुझ्या भावना लाख महाग
असतील रे
पण माझ्या शब्दांनी
एवढे स्वस्त व्हायला नको होते!
क्या ब्बात है!
खूपच छान, शेवटच्या ओळी अतिशय सुरेख आहेत
आहाहा ! काय सुंदर आहे मुक्तक